एक कप कॉफी मिळते ५ हजार रुपयांना, पहा कशी बनते हि कॉफी

Most Expensive Coffee in the World

अनेक वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया हि खूप वेगवेगळी असते, जगात अश्याच अनेक वस्तू आहेत कि या वस्तूंना बनविताना आपण पहिले असणार, मग त्या वस्तू घरात सजविण्यासाठी असोत किंवा घरातील किचन मधील एखादा खाण्याचा पदार्थ असो.

असे बरेचशे पदार्थ आपण पाहिले असतील पण हत्तीच्या शेणातून निघणाऱ्या गोष्टीपासून बनते आपल्या किचन मधील एक विशेष गोष्ट तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि हत्तीच्या शेणापासून कोणती गोष्ट बनविल्या जाते जी आपल्या किचन मध्ये असते,

तर चला जाणून घेवूया.

एक कप कॉफी मिळते ५ हजार रुपयांना, पहा कशी बनते हि कॉफी – Most Expensive Coffee in the World

Most Expensive Coffee in the World
Most Expensive Coffee in the World

 

जगातील सगळ्यात महाग कॉफी – World Most Expensive Coffee

ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी (Black Ivory Coffee) हि जगातील सगळ्यात महाग कॉफिंपैकी एक आहे, या कॉफी ला एका विशिष्ट पद्धतीने बनविल्या जाते. यां कॉफीचा बाजारात एक विशिष्ट भाव आहे, कारण हि कॉफी बनविण्यासाठी एक आगळी वेगळी पद्धत करावी लागते,

या एक किलो कॉफी ची किंमत ६७-६८ हजार रुपये प्रती किलो आहे, आणि या एक कप कॉफी साठी आपल्याला कमीत कमीत ४-५ हजार रुपये मोजावे लागतात. आता आपण म्हणणार कि एक कप कॉफी साठी इतके पैसे का मोजावे लागतात,

तर मी आपल्याला सांगू इच्छितो कि एक किलो कॉफी साठी कमीत कमी ३४-३५ किलो कॉफीचे बिन्स लागतात, यावरून आपण समजू शकणार कि हि कॉफी एवढी महाग का आहे तर.

कशी बनते हि कॉफी? – How to Make Black Ivory Coffee

कॉफी बनविण्याची पद्धत हि जवळ जवळ सारखीच असते. जसे कॉफीच्या झाडाला लागलेल्या बिन्स तोडून आणायच्या आणि त्याला बारीक करून त्याची कॉफी बनवायची, पण हि कॉफी त्याप्रकारे बनत नाही. हि कॉफी बनविण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो.

सर्वात आधी या कॉफीच्या कच्या फळांना हत्तीला खाऊ घातल्या जाते, त्यांनतर हत्ती च्या पोटामध्ये या बिन्स चांगल्या प्रकारे पचतात आणि त्यांच्यात असलेला कडू पणा निघून जातो, आणि त्यानंतर हत्ती आपले शेण बाहेर टाकतो,

तेव्हा हत्तीच्या शेणामध्ये ह्या बिन्स बाहेर येतात, त्यानंतर ह्या बिन्स ला जमा केले जाते, आणि जमा करून या बिन्स ला उन्हात वाळू घातले जाते, वाळल्यानंतर कुठे या बिन्स ना पिसून याची कॉफी बनविली जाते.

या कॉफी ची चव हि चहा आणि कॉफी यांच्या मिश्रणासारखी लागते. सोबतच जेव्हा हत्ती या बिन्स ना खातो तेव्हा हत्ती च्या पाचन क्रियेतील एन्झाइम बिन्स च्या प्रोटीन ला तोडण्याचे काम करतात. सोबतच हत्ती केळी आणि इतर फळ खातो तर त्यांचा अर्क काही प्रमाणात या बिन्स ला लागतो आणि या कॉफीचा कडूपणा निघून जातो.

अश्या प्रकारे ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी चे निर्माण होते. या कॉफीचे उत्पन्न उत्तरी थायलंड मध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या कॉफीचे उत्पन्न काढणाऱ्या डन्किन नावाच्या व्यक्तीला त्यांच्या मित्रांनी सुरुवातीला खूप चिडविले होते.

तरी सुद्धा त्यांनी आपल्या प्रोडक्ट वर काम करण्याचे थांबविले नव्हते, हार नव्हती मानली, आज त्यांची कॉफी जगात प्रसिद्ध झालेली आहे, सोबतच हि कॉफी फक्त ५ स्टार हॉटेल्स आणि मोठमोठ्या रिसोर्ट मधेच मिळते. यावरून आपण या कॉफीचे महत्व आणि तिच्या किमती विषयी समजून गेलेच असणार.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन माहितीपर लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत, आपल्याला हा लेख कसा वाटला आपण आम्हाला सोशल मिडीयावर कळवू शकता.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top