RSS ला नवा विचार देणारे भारत रत्न नानाजी देशमुख

Nanaji Deshmukh

समाजसेवक आणि संघ नेता म्हणुन नानाजी देशमुखांची ओळख सर्वदुर आहे शिवाय भारताच्या ग्रामीण विकासात त्यांच्या अभुतपुर्व योगदानामुळे आजही त्यांचे स्मरण केले जाते.

नानाजी देशमुखांना – Nanaji Deshmukh देशातील सर्वोच्च बहुमान ’भारत रत्न’ मरणोत्तर देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नानाजी देशमुख दुसरे स्वयंसेवक आहेत ज्यांना हा ’भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे.

Nanaji Deshmukh

RSS ला नवा विचार देणारे भारत रत्न नानाजी देशमुख – Nanaji Deshmukh Biography

11 ऑक्टोबर 1916 साली महाराष्ट्रातील (मराठवाडा) हिंगोली जिल्हयात कडोळी या गावी नानाजी देशमुखांचा जन्म झाला. नानाजी सुरूवातीपासुनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाशी जोडले गेले होते. हिंदु राष्ट्रवादाची विचारधारा असलेल्या संघाला नानाजींनी नवा विचार दिला . . . . .

“मी स्वतःकरता नाही, आपल्या लोकांकरता आहे”

RSS स्थापनेत नानाजींची महत्वपुर्ण भुमिका – Rashtriya Swayamsevak Sangh Founded

नानाजींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (K. B. Hedgewar) यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. नानाजी बालपणापासुनच त्यांच्या संपर्कात होते. हेडगेवारांनी देखील नानाजींच्या सामाजिक प्रतिभेला ओळखले होते, त्यांनीच नानाजींना संघात येण्याकरीता प्रेरीत केले होते.

हेडगेवार नेहमी संघाच्या विचाराला नानाजीं समोर ठेवत त्यामुळे नानाजी फार प्रभावीत होत. 1940 साली हेडगेवारांचे निधन झाले. पुढे बाबा साहेब आपटेंच्या मार्गदर्शनात नानाजी आग्रा इथे संघाचे कामकाज पाहु लागले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उभे करण्याची जवाबदारी चांगल्या त.हेने पार पाडली आणि आपले संपुर्ण जीवन संघाला समर्पित केले.

नानाजींनी जनसंघाला उत्तरप्रदेशाची राजनैतिक शक्ती बनविले.

राजनैतीक संघटनेच्या रूपात जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हां गोळवलकरांनी नानाजींना उत्तरप्रदेशातील भारतिय जनसंघाच्या महासचिव पदाचा पदभार सोपविला.

नानाजी देशमुखांच्या तळागाळातील कार्यामुळे उत्तरप्रदेशात संघाला स्थापीत करण्यात त्यांनी मोलाची भुमिका बजावली आणि 1957 पर्यंत जनसंघाने उत्तरप्रदेशात सर्व जिल्हयांमधे आपली संघटना उभी करून त्याला मजबुत केले.

यामुळे भारतीय जनसंघ उत्तरप्रदेशातील एक प्रमुख राजनैतिक शक्तीच्या रूपात पुढे आला.

नानाजी देशमुखांनी मंत्रीपद स्विकारले नाही

आणीबाणी संपल्यानंतर जेव्हां निवडणुका झाल्या त्यावेळी नानाजी देशमुख उत्तरप्रदेशातील बलरामपुर येथुन एमपी म्हणुन निवडुन आले, त्यावेळी 1977 मधे जनता पार्टीचे सरकार बनले आणि मोरारजी देसाई भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी नानाजींसमोर मंत्री होण्याचा प्रस्ताव ठेवला.

परंतु नानाजी देशमुखांनी हा प्रस्ताव फेटाळला. या प्रस्तावाला नकार देतांना ते म्हणाले ज्या लोकांनी वयाची 60 ओलांडली आहेत त्यांनी सरकारच्या बाहेर राहुन समाजसेवा करावयास हवी. पुढे नानाजींनी आपले संपुर्ण जीवन समाजाच्या सेवेत आणि भारतातील लहान लहान गावांची दशा दिशा बदलण्यात समर्पित केले.

नानाजी देशमुखांनी देशाच्या ग्रामिण क्षेत्रातील विकासात आपले योगदान दिले. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार ने नानाजींना राज्यसभेचे सदस्यत्व दिले होते. वाजपेयी सरकारच्या काळातच त्यांना शिक्षा, स्वास्थ्य आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या क्षेत्रात महत्वपुर्ण योगदानाकरीता पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

नानाजी देशमुख, भारताचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या राष्ट्रवादी विचारधारेने प्रभावित होऊन समाज सेवेच्या क्षेत्रात आले होते. सरस्वती शिशु मंदिर शाळेची स्थापना नानाजींनी सर्वप्रथम गोरखपुर येथे केली होती, आज ही शाळा भारतात सर्व ठिकाणी आहे.

आपल्या भ्रमंती दरम्यान नानाजी 1989 ला चित्रकुट येथे आले आणि येथेच स्थायीक झाले. त्यांनी चित्रकुट ला आपली कर्मभुमी बनविले आणि आपले संपुर्ण जीवन चित्रकुट च्या विकासाकरता व्यतीत केले.

नानाजी देशमुखांचे निधन – Nanaji Deshmukh Death

27 फेब्रुवारी 2010 ला नानाजी देशमुखांचे निधन झाले.

नानाजींनी देहदानाचे संकल्पपत्र फार आधीच भरले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे पार्थिव आयुर्विज्ञान संस्थेला दान देण्यात आले. नानाजी देशमुखांचे त्यांच्या कार्याकरता आज देखील स्मरण केले जाते.

Read More:

Baba Amte Biography

लक्ष्य दया: तुमच्या जवळ नानाजी देशमुख बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “नानाजी देशमुख – Nanaji Deshmukh Biography ला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट:  नानाजी देशमुख – Nanaji Deshmukh यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here