पपई फळाची माहिती मराठी

Papaya chi Mahiti

आपल्या परिसरात आढळणारे आणखी एक फळझाड म्हणजे पपई होय. पपई हे फळ सर्वांनाच आवडते. पपई खाण्यास गोड व आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्यात विटामिन ए, विटामिन सी, फायबर तसेच ऍन्टीऑक्‍सिडं हे घटक आहेत.

पपई फळाची माहिती मराठी – Papaya Information in Marathi

Papaya Information in Marathi
Papaya Information in Marathi
हिंदी नाव : पपीता
इंग्रजी नाव : Papaya

पपईची झाडे साधारणपणे आठ ते दहा फूट उंच वाढतात. याचे खोड सरळ वाढते. खोडाचा रंग पिवळट पांढरा असतो. हे झाड भरभर वाढते. याची पाने हिरव्या रंगाची असून छत्रीसारखी चारी बाजूला पसरलेली असतात. पानांना लांब देठ असते. हे देठ पिवळट पांढऱ्या रंगाचे असते. झाडाच्या खोडाच्या वरच्या बाजूला फळे लागतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. आतील गर पिवळसर नारिंगी रंगाचा असतो. या फळाच्या आतमध्ये बिया असतात. त्यांचा रंग काळा असतो.

वैशिष्ट्य :

पपईच्या झाडांना फांद्या नसतात. खोडालाच लांब देठ असलेली पाने येतात. या पानांच्या कडेने नक्षी असते.

पपई चे महत्वाचे फायदे – Benefits of Papaya 

  • विटामिन सी हे जास्तीत जास्त पपई मधून मिळते जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
  • पपई मध्ये असलेल्या फायबर मुळे भुकेवर नियत्रण होऊन वजन घटवण्यास मदत होते
  • विटामिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारस मदत होते.
  • पपई मध्ये गोडवा असला तरी त्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना लोकांनी पपई खाणे हितकारक आहे .
  • ऍन्टीऑक्‍सिडं घटक असल्याने कर्करोगापासून बचाव करण्यास खूप मोठी मदत होते.
  • महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असल्यास त्यांनी पपई खाल्यास त्रास कमी होतो
  • शरीरातील पचनक्रिया सुधारते.
  • पपई खाल्याने थकवा तसेच ताण-तणाव कमी होतो.
  • पपई मध्ये विटामिन सी व फायबर असल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते .
  • विटामिन सी घटक मुळे सांधे ना आराम मिळतो व त्यावरील सूज कमी होते .

औषधी उपयोग :

अन्नपचनासाठी पपई खावी. पित्तनाशक म्हणून या फळाचा उपयोग केला जातो. गजकर्णावर तसेच कातडीच्या रोगांवर कच्च्या पपईचा चीक लावावा. टी.बी., दमा, खोकला तसेच पोटाच्या अनेक विकारांवर पपई गुणकारी आहे. कच्च्या फळाची भाजी खाल्ल्याने यकृत विकार बरे होतात. पपईच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.

इतर माहिती :

पपई हे फळ अतिउष्ण आहे. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. कच्च्या पपईची भाजी करतात. पिकलेली पपई चवीला गोड, रुचकर असते. बहुतेक शेतकरी पपईच्या बागा करतात. पपईला बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले अर्थार्जन होते. हल्ली पपईची झाडे दारातसुद्धा लावली जातात.

पपई बद्दल प्रश्न – Quiz of Papaya

Q. कच्ची पपई खाल्याने काय होऊ शकते? 

उत्तर: कच्च्या पपईमध्ये लेटेक्स घटक असून पपेन एन्झाईम असते, कच्च्या पपईचे जास्त प्रमाणात सेवन झाले तर अन्ननलिकेचा म्हणजेच घश्या मध्ये खवखवल्या सारखे होऊन त्रास होऊ शकतो तसेच मळमळ व उलट्या सुद्धा होऊ शकतात.

Q. पपई च्या पानाचा उपयोग चेहऱ्या साठी करतात?

उत्तर: हो, या पानात विटामिन ए व पपेन एन्झाईम असल्याने हा त्वचेवरील डेड स्कीन काढून चेहरा कोमल व मुलायम बनवते.

Q. पपई कधी खावी?

उत्तर: पपई थोडी उष्ण असल्याने ती उन्हाळात खाणे टाळावे, थंडी च्या दिवसात पपई खावी.

Q. पपई च्या पानाचा रस कश्यासाठी उपयुक्त आहे?

उत्तर: डेंगू झाल्यास पपई च्या पानाचा रस घेतात कारण त्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here