डाळिंब फळाची संपूर्ण माहिती

Dalimb Information in Marathi

लाल रंगाचे आकर्षक फळ, त्याची दाणे सुद्धा लाल रंगाची, पाणीदार व चवीला गोड लागणारी.

डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात,त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इ.असे गुणधर्मी असलेले डाळिंब.

डाळिंब फळाची संपूर्ण माहिती –  Pomegranate Information in Marathi

Pomegranate Information in Marathi
Pomegranate Information in Marathi
हिंदी नाव : अनार
इंग्रजी नाव : Pomegranate

डाळिंबाच्या झाडांची उंची साधारणपणे बारा ते पंधरा फूट असते. याचे खोड धुरकट तांबड्या रंगाचे असते. या झाडाच्या फांद्यावर काटे असतात. पाने हिरवी व दोन-तीन इंच लांब असतात. या झाडाची फुले लाल रंगाची असतात. फळे गोल असतात. फळाला वरून साल असते. आतमध्ये अनेक पापुद्रे असतात. त्यात असंख्य दाणे असतात, ते दाणे लाल व गुलाबी रंगाचे असतात.
डाळिंबाचे रसानुसार गोड, आंबट गोड आणि आंबट असे तीन प्रकार पडतात.

जाती: व्यवहारात डाळिंबाच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्कती डाळिंबे व ‘बेदाणा’ जातीची काबुली डाळिंबे.

डाळिंबाचे औषधी उपयोग – Benefits of Pomegranate

डाळिंबाची फळे, फुले, मूळ, फळांवरील साल यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो,

 1. डाळिंबाचे फळ रुचिवर्धक, भूक वाढविणारे आहे.
 2. लहान मुलांना अतिसार झाला असेल तर कोवळ्या फुलांचे चूर्ण शेळीच्या दुधात द्यावे.
 3. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.
 4. खोकला झाला तर डाळिबाचा रस उपयुक्त आहे. या फळाच्या सालाच चूर्ण कफनाशक आहे.
 5. नाकातून रक्तस्राव होत असल्यास सालीचे चूर्ण उपयोगी पडते.
 6. डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून प्यायल्याने पित्त कमी होते.
 7. हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखी च्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी रोज डाळिंबाचे सेवन करावे.
 8. गरोदरपणात स्त्रियांना भरपूर फायदे होतात.
 9. केस गाळण्याची समस्या दूर होते. कुरळे, कोरडे व निर्जीव केस मजबूत बनण्यास मदत होते.
 10. त्वचे साठी सुद्धा हे उपयोगी फळ आहे.
 11. मूतखडा चा त्रास (किडनी स्टोन ) यापासून बराच आराम मिळतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंब  खावे.
 12. वजन कमी करण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे.
 13. या झाडापासून दाडिमाष्टक चूर्ण, दाडिमडिघृत, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्यतेल, दाडिमावलेह ही आयुर्वेदिक औषधे बनविली जातात.

 

इतर माहिती : बारा महिने येणाऱ्या या फळाच्या सततच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा विशेष फायदा होतो. असे हे बहुगुणी डाळिंबाचे झाड अंगणात लावतात.

डाळिंब फळाबद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – Quiz question about Pomegranate

प्रश्न. डाळिंबाचे इंग्रजी ,हिंदीत व शास्त्रीय नाव काय ?

उत्तर: डाळिंबाचे इंग्रजीत Pomegranate तर हिंदीत अनार व शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनेटम् आहे.

प्रश्न. डाळिंबातील महत्वाची पौष्टिक घटक आणि खनिजे कोणती आहेत?

उत्तर: डाळिंबात मुबलक घटक प्रमाणशीर असतात,त्यात पाणी, ऊर्जा, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर तर व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 आणि खनिजांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त इ.असे गुणधर्मी असलेले डाळिंब.

प्रश्न. डाळिंब खाण्याचे कोणते तोटे ?

उत्तर: डाळिंब जास्त खाल्याने गॅस, खोकला, त्वचेवर खाज किवा पुरळ येऊ शकतात. तसेच जी रुग्ण औषधे घेत असतील त्यांना side effect होऊ शकतात. त्यामुळे डाळिंब हे योग्य सल्ल्याने खावी.

प्रश्न. डाळिंबचे उत्पादन क्षेत्र कोणते ?

उत्तर: भारत तसेच आफ्रिका, काबुल व इराण येथे होते. डाळिंबापासून उत्पादनात कंपन्या जाम, ज्यूस, फ्रूट सँडल तयार करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top