भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या विषयीची माहिती

Prakash Ambedkar Mahiti

प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख नेते आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातु असुन बहुजन समाजाचे महत्वाचे नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते.

‘बाळासाहेब आंबेडकर’ म्हणुन देखील प्रकाश आंबेडकरांना प्रेमाने संबोधण्यात येतं.

प्रकाश आंबेडकर यांच्या विषयीची माहिती – Prakash Ambedkar Biography in Marathi

Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर यांचा अल्पपरिचय – Prakash Ambedkar Information in Marathi

नाव:  प्रकाश यशवंत आंबेडकर
जन्म:  १० मे १९५४
शिक्षण:  एलएलबी
शालेय शिक्षण:  सेंट स्टेनिसलाओस हायस्कुल मुंबई
महाविद्यालयीन शिक्षण:  सिध्दार्थ कॉलेज मुंबई
वडिल:  यशवंत आंबेडकर
आई:  मिराबाई आंबेडकर
पत्नी:  अंजली आंबेडकर
मुलगा:  सुजात आंबेडकर
राजकीय व्यवसाय: राजकारणी व वकील
पक्ष: भारिप बहुजन महासंघ

प्रकाश आंबेडकर राजकीय करियर – Prakash Ambedkar Political Career

बौध्द दलित आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते म्हणुन प्रकाश आंबेडकर कित्येक वर्षांपासुन कार्य करतायेत.

ते संसदेतील राज्यसभेचे आणि लोकसभेचे सांसद राहीलेले आहेत.

१९८२ नंतर डॉ प्रकाश आंबेडकरांनी अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजनैतिक आंदोलनांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला आणि या आंदोलनांचे नेतृत्व केले.

त्यांचे लहान बंधु आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे नेता आहेत.

प्रकाश आंबेडकर यांचा वकीलीचा व्यवसाय असुन ते १३ व्या लोकसभेचे सदस्य होते. अकोला लोकसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.

प्रकाश आंबेडकर हे बहुजनांचे नेते असुन एका मोठया वर्गाचे ते प्रतिनीधीत्व करतात. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतांना १९९८ व १९९९ ला लोकसभा निवडणुक झाल्यावर अकोला लोकसभा मतदारसंघातुन ते लोकसभेवर निवडुन गेले होते.

भारिप बहुजन महासंघाची स्थापना –  Bharipa Bahujan Mahasangh Establishment

भारिप बहुजन महासंघाची स्थापना प्रकाश आंबेडकरांनी १९८४ साली अकोला येथे केली. भारतातील हा एक राजकीय पक्ष असुन निळा भीम ध्वज हे या पक्षाचे प्रतिक आहे.

या पक्षाची स्थापना होण्यापुर्वी दलितांची स्थिती विदारक होती. ठिकठिकाणी त्यांना मारहाण करण्यात येत होती व त्यांच्यावरची अत्याचार वाढले होते. पडिक जमिन वाहिल्यावर होणारी मारहाण, गुरे चारल्यास मारहाण अश्या अत्याचारांना दलितांना सामोरे जावे लागत होते.

हे पाहाता बाळासाहेब आंबेडकरांना सर्व दलितांना एकत्रित आणणे महत्वाचे वाटु लागले आणि त्याकरता एखाद्या संघटनेची आवश्यकता होती आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या पक्ष निर्मीतीमुळे दलितांना संरक्षण मिळाले आणि जिवण जगणे सुसहय झाले.

तर आज आपण माहिती पहिली भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची,

आपल्याला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करायला विसरू नका,

तसेच आमच्या फेसबुक पेज माझी मराठी ला भेट द्यायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top