मुळ्याची माहिती

(Radish)Mulyachi Mahiti

मुळा हा कंदमुळे भाजीतील प्रकार आहे. फार प्राचीन काळापासून भारतात व इतर देशांतही मुळ्याची लागवड केली जाते. मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. त्यामुळेच खाण्यात याचा सलाद, कोशिंबीर, मध्ये खाणे जास्त आवडते. मूल्याचे काय फ़ायदे, उपयोग, अशीच बरीच माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

मुळ्याची माहिती – Radish Information in Marathi

Radish Information in Marathi

हिंदी नाव : मूला
इंग्रजी नाव : Radish

मुळ्याच्या पिकासाठी लालमिश्रित मऊ जमीन लागते.

मुळ्याच्या झाडाची उंची दीड ते दोन फूट असते. मुळ्यांच्या पानांना उग्र वास असतो. रंग हिरवा असतो. मुळा हे एक कंदमूळ आहे, ते जमिनीच्या खाली वाढते. मुळ्याचा आकार एका टोकाला निमुळता असतो; त्याची लांबी साधारणत: दीड फूट एवढी असते. मुळ्याचा रंग पांढरा असतो.

महाराष्ट्रात मुळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघते. पुणे जिल्ह्यात मुळा भरपूर प्रमाणात पिकतो.

उपयोग व फायदे – Radish Benefits

  1. कच्चा मुळा खाल्ल्याने शरीराला ‘अ’ व ‘क’ ही जीवनसत्त्वे मिळतात.
  2. कच्चा मुळा खाल्ल्याने पोटदुखी थांबते.
  3. मुळ्याची कोशिंबीर व मुळ्याची भाजी तयार करतात,
  4. मुळा घालून पराठे, थालीपीठ तयार करतात.

तोटे : उपाशीपोटी मुळा खाल्ल्यास छातीत दुखते, मुळा रात्री खाल्ल्यास तोंडाला उग्र वास येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here