क्रिकेटर रोहीत शर्मा च्या जीवनाची प्रेरणात्मक कहानी

Cricketer Rohit Sharma mahiti

एक भारतिय क्रिकेटर रोहीत शर्मा ! रोहीत उजव्या हाताचा फलंदाज असुन कधी कधी संधी मिळाल्यास उत्तम गोलंदाजी देखील करतो. स्थानिक पातळीवर तो मुंबई इंडियन्स करीता सामना खेळतो. IPL मधे तो मंुबई इंडियन्स चा कर्णधार देखील आहे.

Rohit Sharma Information in Marathi

क्रिकेटर रोहीत शर्मा च्या जीवनाची प्रेरणात्मक कहानी – Rohit Sharma Information in Marathi

वयाच्या 20 व्या वर्षी रोहीत ने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी ला सुरूवात केली. विश्लेषकांनी फार लवकर रोहीत च्या फलंदाजीतील वैशिष्टय ओळखले आणि त्याची भारतिय संघातील खेळाडु म्हणुन निवड केली.

23 जुन 2007 ला त्याने आयरलॅंड विरूध्द एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. 2013 साली एकदिवसीय सामन्यात रोहीत सामन्याच्या सुरूवातीला येणारा फलंदाज बनला आणि तेव्हांपासुन आजतागायत रोहीत सामन्याच्या सुरूवातीला येत फलंदाजीचे प्रदर्शन करतो आहे.

नोव्हेंबर 2013 मधे कोलकत्ता येथील ईडन गार्डन मैदानावर पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधे त्याने वेस्ट इंडिज विरूध्द लागोपाठ 2 शतकं ठोकले. ईडन गार्डन वर त्याने 177 धावांची पारी खेळली होती आणि दुस.या कसोटीत वानखेडे स्टेडियम वर नाबाद 111 धावांची पारी खेळली होती.

पहिला कसोटी सामना खेळण्यापुर्वी रोहितने 108 एकदिवसीय सामने खेळले होते.

काकांनी केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे रोहीत 1999 साली क्रिकेट कॅंप मध्ये सहभागी झाला. या कॅंप मध्ये रोहित चे प्रशिक्षक दिनेश लड हे होते. त्यांनी रोहित ला आपली शाळा बदलुन स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत येण्यास सांगितले, तेथे दिनेश लड प्रशिक्षक म्हणुन कार्यरत होते व त्याठिकाणी क्रिकेट खेळण्याकरीता सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जात होत्या.

रोहीत ने त्या कॅंप मधे आॅफ स्पिनर म्हणुन प्रशिक्षण घ्यावयास सुरूवात केली होती आणि कधी कधी तो फलंदाजी चा अभ्यास देखील करायचा. प्रशिक्षक लड यांनी रोहीत मधे गोलंदाजी पेक्षा फलंदाजीचे गुण ओळखले. लड त्याला नेहमी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करीता पाठवायचे. गिल्स शील्ड शालेय क्रिकेट स्पर्धेत रोहीत ला फलंदाजीत यश मिळाले.

तेव्हां सुरूवातीलाच फलंदाजीकरीता जाऊन आपल्या पहिल्याच सामन्यात रोहीत ने शतक ठोकले होते.

रोहीत शर्माचा विवाह – Rohit Sharma Marriage

आपल्या बालपणीची मैत्रिण रितीका हिच्याशी रोहीत 13 डिसेंबर 2015 ला विवाह बंधनात अडकला.

रोहित शर्माचे विक्रम – Rohit Sharma Record

  1. 2013 – 14 मधे व्दिपक्षीय एकदिवसीय सामना मालिकेत आॅस्ट्रेलिया विरूध्द त्याने एका मालिकेत 491 धावा बनविल्या होत्या. आॅस्ट्रेलियात एका मालिकेत बाहेरच्या खेळाडुन काढलेल्या या सर्वाधिक धावा होत्या.
  2. 13 नोव्हेंबर 2014 ला रोहीत एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. त्याने कोलकत्त्याच्या ईडन गार्डन वर श्रीलंके विरूध्द 264 धावा काढल्या.
  3. एकदिवसीय सामन्यात दोन व्दिशतक (200) ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.
  4. एका खेळात चैकार आणि षट्काराने सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत त्याने शेन वाॅट्सन चा विक्रम देखील मोडित काढला. एकाच सामन्यात त्याने 186 धावा चैकार आणि षट्कार मारून काढल्या.
  5. 33 चैकार एकाच सामन्यात मारून रोहित शर्मा सर्वाधिक चैकार मारणारा फलंदाज ठरला.
  6. 11 आॅक्टोबर 2015 ला रोहित शर्मा ने कानपुर येथे दक्षिण अफ्रिके विरूध्द 150 धावा बनविल्या, एकाच सामन्यात एका खेळाडुने याठिकाणी काढलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या.
  7. रोहित शर्मा ने एकाच सामन्यात 16 षट्कार मारत एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम केला. पुढे एबी डिविलिअर्स ने वेस्ट इंडिज विरूध्द 16 षट्कार मारत या विक्रमाची बरोबरी केली होती आणि त्यानंतर क्रिस गेल ने देखील झिम्बाॅम्बे विरूध्द 16 षट्कार ठोकले होते.
  8. IPL मधे हैट्रिक चा रेकाॅर्ड.
  9. 12 जानेवारी 2016 ला पर्थ येथे रोहित ने आॅस्ट्रेलिया विरूध्द खेळल्या जाणा.या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नाबाद 171 धावा काढल्या होत्या. आॅस्ट्रेलियात कुणा बाहेरच्या खेळाडुने एका सामन्यात काढलेल्या हया सर्वाधीक धावा होत्या.
  10. 2 आॅक्टोबर 2015 मधे टी.20 क्रिकेट मधे शतक मारणारा रोहित शर्मा दुसरा भारतिय फलंदाज बनला शिवाय एका टी.20 त भारतातर्फे सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज देखील ठरला. त्याने 66 चेंडुत 106 धावा काढल्या. सुरेश रैना नंतर रोहित शर्मा दुसरा भारतिय आहे ज्याने (कसोटी, एकदिवसीय, टी.20) आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या तिनही प्रकारात शतक ठोकले आहे.

Read More:

Note : तुमच्याजवळ About Rohit Sharma In Marathi मधे अधिक Information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे वाटल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये लिहा आम्ही ती माहिती अपडेट करू.

जर आपल्याला Life History  Of  Rohit Sharma in Marathi Language आवडली तर आम्हाला अवश्य Whatsapp  आणि Facebook वर Share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here