साम, दम, दंड, भेद हे शब्द सर्वात आधी कोणी वापरले होते? जाणून घ्या या लेखात.

बऱ्याच गोष्टींची सुरुवात पुरातन काळात झाल्याची लक्षात येते, आपण ज्या रूढी, प्रथा पाळतो त्यांची सुरुवात सुद्धा जुन्या काळातच झाली आहे. अश्याच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या का सुरु झाल्या आणि कोणी सुरु केल्या या गोष्टीची माहिती आपल्याला आणखीही झाली नाही,

एखादी व्यक्ती सरळ सांगण्याने ऐकत नसेल तर बरेचदा साम दाम दंड आणि भेद या गोष्टींपैकी कोणत्याही एखाद्या गोष्टीचा वापर आपल्याला करावा वाटतो, पण काय आहे हे साम दाम दंड भेद.

साम, दम, दंड, भेद या गोष्टींची सुरुवात कुठून झाली? पहा येथे – Saam Daam Dand Bhed Meaning

Saam Daam Dand Bhed Meaning
Saam Daam Dand Bhed Meaning

तर चला आजच्या लेखात आपण पाहूया या गोष्टींचा उल्लेख सर्वात आधी कोठे झाला ते.

पुराणात या गोष्टीचा सर्वप्रथम उल्लेख.

सर्वात आधी या गोष्टीचा उल्लेख प्रल्हाद आणि त्याचे पिता यांच्या मध्ये झालेल्या संवादामध्ये या गोष्टींचा उल्लेख पाहिल्या जातो, जेव्हा प्रल्हाद आपल्या गुरुकडून आपले शिक्षण पूर्ण करून घरी येतो तेव्हा हिरण्यकश्यपू त्याच्या जवळ येऊन विचारतो कि,

आमच बाळ काय शिकून आल त्याच्या गुरु कडून, तेव्हा प्रल्हाद हिरण्यकश्यपू ला सांगतो कि, माझ्या गुरूने मला, साम, दाम, दंड, भेद या गोष्टींविषयी शिकविले. आणि या गोष्टीचे काम आपल्याला आपल्या शत्रूंशी लढण्याच्या कामात येते, पण मला वाटते मला या गोष्टींची काही गरजच नाही,

कारण मला माझ्या गुरूने हे शिकविले कि चराचरात विष्णू भगवंत आहेत, आणि चराचरात जर विष्णू भगवंत आहे तर मला कोणत्याही व्यक्तीपासून कशी काय भीती असणार, यामुळे मला साम दाम दंड भेद या गोष्टींची जराही आवश्यकता नाही असे वाटते.

साम, दाम, दंड, भेद या गोष्टीचा उल्लेख सर्वात आधी येथे पुराणात झालेला आपल्याला दिसतो,

साम दाम दंड भेद म्हणजे काय?

या शब्दांचा अर्थ खूप सोपी आहे, या शब्दांना आचार्य चाणक्यांनी आपल्या एका ग्रंथात लिहिले, कि सज्जन माणसाला सन्मान देऊन, लोभी माणसाला धन, विद्वान माणसाला तर्क आणि विश्लेषण, सोबतच एखाद्या बदमाश व्यक्तीला दंड देऊन आपल्या बाजूला केल्या जाऊ शकते.

साम शब्दाचा अर्थ स्तुती, दाम या शब्दाचा अर्थ पैसा, दंड शब्दाचा अर्थ शिक्षा. आणि भेद शब्दाचा अर्थ भीती. या सगळ्या गोष्टींचा असा अर्थ होतो कि एखादी व्यक्ती आपल्या विचारांना प्राधान्य देत नसेल किंवा जनहितासाठी असलेल्या निर्णयाला विरोध करत असेल तर बरेच वेळा काही महान लोक इतिहासात या गोष्टींचा वापर करताना आपल्याला दिसले आहेत.

साम, दाम, दंड, भेद. या सर्व गोष्टींचा वापर आपण आपल्या जीवनात सुद्धा करू शकता, आचार्य चाणक्यांनी या सर्व गोष्टींचा उपयोग करून अखंड भारताचे निर्माण केले होते.

आजही आपल्या देशाचा शत्रू जर संभाषणाची भाषा समाजत नसेल तर आपल्या देशाने त्या देशाच्या विरोधात या नीती मुल्यांचा आधार घेणे गरजेचे आहे,

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here