संजय राऊत यांच्या विषयीची संपूर्ण माहिती

Sanjay Raut chi Mahiti

संजय राऊत हे नाव महाराष्ट्राकरता नविन नाही. शिवसेनेसारख्या मोठया पक्षाचे ते नेते असुन राज्यसभेचे खासदार म्हणुन त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनीधीत्व केलय.

मुंबई येथुन प्रकाशित होणाऱ्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ चे कार्यकारी संपादक म्हणुन ते  कार्यरत आहेत.

२०१९ साली प्रदर्शित झालेल्या “ठाकरे’’ ( शिवसेना प्रमुख आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ) या चित्रपटाचे लेखन संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांची माहिती – Sanjay Raut Biography in Marathi

Sanjay Raut

संजय राऊत यांच्या अल्पपरिचय – Sanjay Raut Information in Marathi

नाव:  संजय राजाराम राऊत
जन्म: १५ नोव्हेंबर १९६१
जन्मस्थान: अलिबाग जि. रायगड
शिक्षण: बी.कॉम मुंबई विद्यापीठ
व्यवसाय:  पत्रकार, लेखक
पक्ष:  शिवसेना
वडील:  राजाराम राऊत
आई: सविता राजाराम राऊत
पत्नी:  वर्षा संजय राऊत
अपत्य:  दोन मुली
आवड:  वाचन लेखन, सामाजिक कार्यात सहभाग, खेळ आणि चित्रपट

संजय राऊत यांना मिळालेली पदं – Sanjay Raut Positions Held

 • २००४ त्यांनी राज्यसभेची निवडणुक लढली.
 • २००५ साली शिवसेना नेता.
 • ऑक्टोबर २००५ ते मे २००९ नागरी उड्डयन मंत्रालयात सल्लागार समिती सदस्य.
 • २०१० साली राज्यसभेवर पुन्हा निवड.
 • २०१० साली अन्न मंत्रालय सदस्य, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण सदस्य, ऊर्जा मंत्रालयात सल्लागार समितीवर निवड.
 •  महाराष्ट्रातील खासदार म्हणुन राज्यसभेवर ५ जुलै २०१० ला नियुक्ती.

संजय राऊत यांचे विवाद – Sanjay Raut’s Controversies

 • संजय राऊत यांच्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळते.
 • फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट मुळे दोन मुलींवर झालेल्या पोलिसी कारवाईवर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया “आम्ही पोलिसी कारवाईचे समर्थन करतो’’ यामुळे नवा वाद निर्माण झाला होता.
 • २०१५ साली  “मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढुन घ्यावयास हवा ’’ मुस्लिम मते फक्त व्होट बॅंक म्हणुन वापरली जातात या त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.
 • बरेचदा त्यांची वक्तव्ये वाद निर्माण करतांना दिसतात.

संजय राऊत यांचे प्रकाशित झालेली पुस्तके – Sanjay Raut Books

 • १९८९ मध्ये शुन्य सारे
 • १९८९ मध्ये सच्चाई
 • १९९४ मध्ये रोखठोक
 • १९९६ मध्ये मुंबई माफिया
 • १९९७ मध्ये निशान धोरणी मराठी
 • १९९८ मध्ये चेकमेट
 • २००१ मध्ये एकवचनी
 • २००१ मध्ये अग्रलेख
 • २००४ मध्ये बिहारी माफीया

हि त्यांची काही प्रकाशित पुस्तके आहेत.

या लेखामुळे आपल्याला संजय राउत यांच्या विषयी आणखी माहिती झाली असेल, असेच नवीन लेखांविषयी माहिती साठी जुळलेले राहा आमच्या सोबत.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here