लेक वाचवा विषयी काही मराठी स्लोगन

Stri Bhrun Hatya Slogan in Marathi

अस म्हटल्या जात कि मुलगी शिकली प्रगती झाली, पण मी म्हणतो शिक्षणा पहिले तिचा जन्म होऊ देणे महत्वाचे आहे, बर्याच लोकांच्या भावना अशा आहेत, कि मुलगी घराला ओझे असते, पण लक्षात ठेवा जर मुलगा हा तुमच्या घराचा दिवा असेल तर मुलगी हि त्या दिव्याची वात आहे, आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात बाजी मारली आहे.

ते बस चालवणे असो कि विमान सर्वच क्षेत्रात महिलांनी आज प्रगती केली आहे, काही महिलांवर तर घराची संपूर्ण जबाबदारी असते, तरी त्या न डगमगता कष्ट करत राहतात, आणि आपल्या परिवाराची जबाबदारी एका कर्तबगार कर्त्या पुरुषासारखी निभावत असतात, समाजातील अश्या स्त्रियांना माझी मराठी चा मानाचा मुजरा.

काही दुर्बुद्धी असणारे लोक स्त्रीभृणहत्येचे पाप करतात, त्यांना एवढेच सांगणे आहे सोडा हि दुर्बुद्धी आणि  घेऊ द्या जन्म तिला, तुम्ही एवढे काम करा ती जन्माला येऊन तुमचे नाव उंच करण्याचे काम करेल.

लेक वाचवा विषयी काही मराठी स्लोगन – Save Girl Slogan in Marathi

slogans on save girl in marathi

 

काही मराठी घोषवाक्ये मुलींविषयी – Lek Vachava Ghosh Vakya

तर आज आपण काही घोषवाक्ये पाहणार आहोत, ज्यामुळे समाजामध्ये मुलींविषयी तसेच स्त्रीभृणहत्ये विषयी जागरुकता पसरेल,

तर चला पाहूया काही घोषवाक्ये!

  1. मुलगा मुलगी एक समान, दोघांना हि शिकवा छान.
  2. मुलीचे शिक्षण म्हणजेच प्रगतीचे लक्षण.
  3. मुली शिक्षण घेतील, आणि समृध्द होतील.
  4. चला करू एकच ध्यास, स्त्रीभृणहत्या मिटवू हमखास.
  5. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली तर खेद नको.
  6. मुलींना समजू नका भार, आहेत त्या जीवनाचा आधार.
  7. मुलगी नाही कोणतीही आपत्ती, ती तर आहे देशाची संपत्ती.
  8. ज्या घरी मुलगी झाली, समजा स्वतः लक्ष्मी आली.
  9. मुला पेक्षा मुलगी बरी, उजेड देई दोन्ही घरी. 
  10. आनंदी असेल नारी, तर सुख फुलेल घरो घरी.
  11. घेऊन एकच नारा, बनवा समाज जागरूक सारा.
  12. मुलगा असेल तुमचा वारस, तर मुलगी आहे जीवनाची पारस.
  13. आनंदी आनंद गडे, जेव्हा मुलगी अंगणी बागडे. 
  14.  केला जर तिचा लहानपणी खून, कशी मिळेल तुमच्या मुलाला सून.
  15. वाढवेल ती तुमचा मान, म्हणूनच करा मुलीचा सन्मान.
  16. सृष्टी असेल जपणे, तर आवश्यक आहे मुलीला वाचवणे.
  17. आई पाहिजे, बहिण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको.
  18. मुलगी आहे देवाचा उपहार, जगायचा द्या तिला अधिकार.
  19. मुलगी वाचावा, मुलगी शिकवा. 
  20. मुलगी वाचवणे आहे, भृणहत्या थांबवणे आहे.

हि घोषवाक्ये आपल्याला मदत करतील समाजात भृणहत्येला रोखण्यासाठी, मुलगी हि आपल्यावर भार आहे असे समजू नका. तिला चांगले शिकवा आणि भविष्यात ती तुमचा सहारा बनेल.

मुलीला फक्त आपल्या प्रेमाची गरज असते, तिला आणखी कोणत्याही गोष्टीची गरज नसते. म्हणून तिला हव्या असलेल्या प्रेमाला तिला द्या.

सोबतच एक मंत्र मनी ठाणून घ्या भृणहत्या करणार नाही आणि भृणहत्या होऊही देणार नाही.

आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल, तर या लेखाला आपल्या मित्रांशी शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top