बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन”

Raksha Bandhan Information in Marathi

“बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है… प्यार के दो तार से संसार बांधा है”

“मेरे भैय्या.. मेरे चंदा.. मेरे अनमोल रतन… तेरे बदले मै जमाने की कोई चिज ना लुं”

या सारखी गाणी रेडिओ वरून ज्यावेळी ऐकायला येतात….बहिण भावाच्या नात्याला अधोरेखीत करतात आणि समिप येऊन ठेपतो या पवित्र आणि निर्मळ नात्याचा सण…. रक्षाबंधन!

Raksha Bandhan Information in Marathi

बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन” –  Raksha Bandhan Information in Marathi

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीने फार आधीपासुन या बहिण भावाच्या नात्याला सुरेख पध्दतीने चित्रीत केले आहे. या गोष्टींचे आज रक्षाबंधन या सणाच्या निमीत्ताने प्रकर्षाने स्मरण होते आहे.

तसं पाहाता बहिण भावाच्या पवित्र नात्याला शब्दबध्द करणं तसं अवघड काम. कारण या नात्यामधे काय नाही? प्रेम आहे, आपुलकी आहे, वात्सल्य आहे, प्रसंगी वाद भांडण आणि मारामारी देखील! पण या उदात्त नात्याची सर इतर कोणत्याही नात्याला नाही हे नक्की!

दिवाळीला साजरी होणारी भाउबीज आणि श्रावणात साजरा होणारा रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) तसे अगदी सारखेच. बहिण भावाच्या नात्याला अधोरेखीत करणारे हे उत्सव.

बहिण भाऊ जवळ असले तर ठिकच अन्यथा रक्षाबंधनाच्या या सणाला भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाऊन त्याला राखी बांधते आणि भाऊ देखील तीचे रक्षण करण्याचे वचन देतो एकमेकांना त्यांच्या आवडत्या वस्तु भेटस्वरूपात देखील दिल्या जातात.

मुळात उत्तर भारतात साजरा होणारा हा सण आता सर्वत्र साजरा होत असल्याचे आपण पाहातो.

रक्षाबंधनाची प्रथा कधीपासुन सुरू झाली याबाबत निश्चित काळ जरी माहित नसला तरी देखील अनेक कथा या सणाशी जोडल्या गेल्या आहेत.

पुराणकथा – Raksha Bandhan Story in Marathi

1) रक्षाबंधनाच्या या सणाशी पारंपारिक कथा देखील निगडीत आहे. एकदा देवांमधे आणि राक्षसांमधे युध्द सुरू होते. या युध्दा दरम्यान देवांचा पराभव आणि दानवांचा विजय होतो की काय अशी परीस्थिती निर्माण झाली त्यावेळी देवादिदेव इंद्रदेवांना त्यांच्या पत्निे ने ’इंद्राणी’ ने मनगटावर एक संरक्षक धागा बांधला व दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला.

दैत्यांना हरवुन देवांचा विजय या धाग्यामुळे झाला अशी समजुत रूढ झाली आणि पुढे रक्षाबंधनाची ही प्रथा सुरू झाली. परंतु काळाच्या या ओघाता आता बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो अशी प्रथा रूढ झाली आहे.

2) महाभारतातील कथेत सांगीतल्या प्रमाणे श्रीकृष्ण द्रौपदीचे नाते देखील बहिण भावाचे होते… आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केल्यानंतर ज्यावेळी चक्र पुन्हा भगवान श्रीकृष्णाच्या हातावर आले त्यावेळी त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यातुन रक्त वाहु लागले. द्रौपदीने क्षणाचा विलंब न करता आपल्या भरजरी पितांबराला फाडत श्रीकृष्णाच्या बोटावर चिंधी बांधली.

या ऋणाला जागत ज्या समयी भर सभेत दुःशासन द्रोपदीचे चिरहरण (वस्त्रहरण) करत होता त्यावेळी श्रीकृष्णाने द्रोपदीला वस्त्र पुरवले आणि तिची अब्रु राखली. तेव्हांपासुन रक्षाबंधन या पर्वाला साजरे करण्याची प्रथा सुरू झाली.

3) मेवाड प्रांताची राणी कर्णावती हीने बहादुरशहापासुन आपली आणि आपल्या राज्याची अब्रु राखण्याकरीता मोघल शासक हुमायूँ ला राखी पाठवली होती आणि राखीचा मान ठेवत राजा हुमायॅु ने बहिणीचे आणि तिच्या मेवाड राज्याचे रक्षण केले होते.

सामाजिक एकोपा जपण्याकरता रक्षाबंधनासारखे सण फार मोलाचे ठरतात. राखी केवळ एक धागा नसुन पवित्रता, स्नेह आणि शीलाचे रक्षण करणारे एक पवित्र बंधन आहे. या रक्षाबंधनामुळे कित्येक मन एकमेकांशी जोडली जातात. मनं जवळ येतात त्यांना भावनिक ओलावा प्राप्त होतो. या सारखा पवित्र सण इतर कोणत्याही धर्मात पहायला मिळत नाही. केवळ रक्ताच्याच नात्यातच नव्हे तर हा सण इतर नाती वृध्दींगत करण्यास देखील प्रोत्साहीत करणारा आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ रक्षाबंधन बद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top