शरद पवार यांची माहिती

Sharad Pawar Mahiti

राजकारणातील मुरब्बी आणि जुने व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार! राजकारणाशिवाय शरद पवार साहित्य,सांस्कृतिक, शिक्षण आणि क्रिडा अश्या विविध क्षेत्रात आपल्याला सहज वावरतांना दिसतात. भारतीय राजकारणात शरद पवारांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.

१९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, आणि १९९३ ते १९९५ या काळात शरद पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा मान सर्वप्रथम त्यांनाच मिळाला आहे.

शरद पवार यांची माहिती – Sharad Pawar Biography in Marathi

Sharad Pawar

शरद पवार यांचा अल्पपरिचय – Sharad Pawar Information

नाव:  शरद गोविंदराव पवार
जन्म: १२ डिसेंबर १९४०
जन्मस्थान:  बारामती जि.पुणे
पत्नी:  प्रतिभा पवार
कन्या:  सुप्रीया सुळे
राजकीय पक्ष: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

शरद पवार यांचे व्यक्तिगत जीवन – Sharad Pawar Family History in Marathi

पवार साहेबांचा राजकारणातला प्रवेश शालेय जिवनापासुनच झाला. १९५६ साली शाळेत असतांना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता. महाविद्यालयात असतांना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणुन देखील ते सक्रिय होते, येथुनच त्यांच्या राजकीय जीवन प्रवासाला सुरूवात झाली.

विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमाला त्यावेळेसचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या समोर शरद पवारांनी जे भाषण केले ते भाषण ऐकुन मुख्यमंत्री महोदय फार प्रभावित झाले आणि त्यांनी शरद पवारांना युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगीतले. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्र राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.

यशवंतराव चव्हाण वेळोवेळी पवार साहेबांना मार्गदर्शन करीत असत. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणुन पवार यांच्याकडे पाहिल्या जाऊ लागले. पवार साहेब १९६७ ला बारामती मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. वयाच्या २९ व्या वर्षी वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात शरद पवारांचा राज्यमंत्री म्हणुन समावेश झाला.

वसंतदादा पाटील हे १९७८ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री झाले.

यशवंतराव चव्हाण यांच्यासारखेच वसंतदादा पाटील देखील शरद पवारांचे मार्गदर्शक होते, पण पवार साहेब कॉंग्रेस  पक्षाचे.

शरद पवार यांच राजकीय करियर – Sharad Pawar Political Career

पवार साहेबांनी वैचारिक मतभेदांमुळे भारतिय राष्ट्रीय कॉंग्रेस मधुन काढता पाय घेतला आणि १० जुन १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

१९९९ साली महाराष्ट्रात ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामधे कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते.

त्या सुमारास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ची आघाडी झाली आणि विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे नविन मुख्यमंत्री झाले.

२००४ साली ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष केंद्रामधे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस सरकार मधे समाविष्ट झाला.

२००४ साली २२ मे ला देशाचे कृषीमंत्री म्हणुन पवारांनी शपथ घेतली. पुढे त्यांच्याकडे कृषी, अन्न आणि सार्वजनिक वितरण, ग्राहकांशी संबंधीत बाबी या खात्यांची देखील जवाबदारी देण्यात आली परंतु २०१० मधे जेव्हां आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले त्यावेळी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली.

राजकारणा व्यतिरीक्त शरद पवारांचे क्रिकेट क्षेत्र देखील आवडीचे आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर पवार साहेब २९ नोव्हेंबर २००५ साली निवडुन आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सुत्र १ जुलै २०१० ला पवार साहेबांनी स्विकारली. हे

पद भुषवणारे ते दुसरे भारतीय ठरले त्यांच्या पुर्वी जगमोहन दालमियांनी हे पद भुषवले होते.

शरद पवारांचा शिक्षणक्षेत्राशी देखील निकटचा संबंध आहे.

विद्या प्रतिष्ठान बारामती, कृषी विकास प्रतिष्ठान बारामती, रयत शिक्षण संस्था सातारा, वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट मांजरी पुणे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगांव बारामती यांसारख्या शिक्षण संस्थांच्या कार्यात त्यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. २०१० साली शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच २०१९ च्या निवडणुकीमुळे सुद्धा ते पूर्ण भारतात चांगल्या चर्चेत होते, आज त्यांना महराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हटल्या जात आहे, अश्या कर्तुत्वान पुरुषाला माझी मराठीचा मानाचा मुजरा.

आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top