Wednesday, September 17, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भगवान शिवाची पूजा करतांना चुकुनही करू नका या गोष्टी

Shiv Pooja Vidhi

 देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण पूजेमध्ये बर्याच सामग्रींचा वापर करतो.

हिंदू धर्मानुसार सर्व देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री सांगितल्या गेली आहे.

आपण देवी-देवतांना प्रसंन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीची सामग्रीच नाही तर प्रत्येक गोष्ट एक वेगळ्या आणि विशेष प्रकारे करत असतो.

आपण आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वराला जे आवडते ते अर्पण करत असतो.

आणि काही आवश्यक गोष्टी ईश्वराच्या समोर प्रसाद म्हणून ठेवत असतो. आपला असा विश्वास असतो

कि त्या गोष्टींमुळे ईश्वर प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना तसेच इच्छा आकांक्षा पूर्ण करतील.

आणि सोबतच त्यांचा आशिर्वाद आपल्याला लाभेल. म्हणून आपण आवश्यक ती सामग्री देवाला अर्पण करत असतो.

अस म्हटल्या जात कि ३३ कोटी देवांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता हे भगवान शिव आहेत. आणि ते वरदान सुद्धा लवकर देऊन जातात.

तसेच सर्वात अगोदर देवतांमध्ये संतापहि भगवान शिव यांनाच येतो.

आपण पौराणिक कथांमध्ये ऐकले असेलच कि भगवान शिवाच्या क्रोधामुळे खूप असुर तसेच काही देवताही भस्म झाले होते. तसेच काहींना नुकसान हि झाले होते.

देवी-देवातांमध्ये त्यांच्या क्रोधाचा सामना कोणालाही करता आला नव्हता.

त्याचं रौद्र रूप खूप भयंकर होते तसेच पाहायला खूप भीतीदायक होते.

ज्यामुळे कोणतेही देवता त्यांच्या क्रोधाला सामोरे जाण्यास घाबरत असत.

आज आपण अश्या काही गोष्टी पाहणार आहोत ज्या पुराणात सांगितल्या आहेत ज्या भगवान शिव यांना आपण त्यांच्या पूजेत अर्पण करू शकत नाही.

असं म्हटल्या जातं कि जर आपण ह्या गोष्टींचा उपयोग भगवान महादेवाच्या पूजेत केला तर भगवान महादेव आपल्यावर कोपु शकतात.

मग त्यासाठी आपण त्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ आणि आपल्या हातून असे काही घडू नाही याची काळजी सुद्धा घेऊ.

भगवान शिवाची पूजा करतांना चुकुनही करू नका या गोष्टी – Shiv Puja Vidhi in Marathi

Shiv Puja Vidhi

१) कुंकू – Kumkum

हिंदू धर्माच्या संस्कृतीत कुंकवाला विवाहित स्त्रीचा एक दागिनाच म्हटल्या गेले आहे.

विवाहित स्त्री आपल्या पती च्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या भांगात कुंकू भरत असते.

आपल्याला माहित आहे भगवान शंकरांचे रूप हे विध्वंसक आहे, त्यामुळे आपण कुंकवाला भगवान शंकराच्या लिंगावर वाहू शकत नाही.

आणि या गोष्टीचा उल्लेख पुराणात सुद्धा आला आहे. म्हणून शिवलिंगावर कधी कुंकू वाहू नये.

२) हळद – Turmeric

हळद हि आपल्या दैनंदिन जीवनातील खूप महत्वाचा घटक आहे. आणि आयुर्वेदात सुद्धा हळदीचे महत्व सांगितल्या गेले आहे,  हळदीला महिलांच्या सुंदरतेला वाढविण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे आपण हळदीला भगवान शंकराच्या पिंडीवर वाहू शकत नाही.

३) शंकाने पाणी वाहू नये – Congestion should not flow water

भगवान शंकर यांच्या पूजेच्या सामग्रीमध्ये आपण शंकाचा उपयोग करू शकत नाही.

कारण असे आहे कि एके काळी दैत्यराज दंभ यांनी तपश्चर्या करून भगवान विष्णू यांना प्रसन्न केले होते त्यानंतर भगवान विष्णू यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले तेव्हा दैत्यराज दंभ यांनी भगवान विष्णूंना वरा मध्ये असा पुत्र मागितला जो शूर पराक्रमी असून त्रैलोक्यावर अजेय राहील.

त्यांना शंखचूड नावाचा मुलगा सुद्धा झाला. काही कालांतराने शंखचूड मोठा झाला.

त्यानंतर शंकचूड या दैत्याने सर्व देवतांवर अत्याचार तसेच त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यानंतर सर्व देवगन हे त्राहीमाम करत करत भगवान शंकरांकडे गेले. त्यांनतर भगवान शंकरांनी शंखचूड राक्षसाला आपल्या त्रिशुलाने भस्म केले.

त्यांनतर शंखचूड राक्षसा च्या राखेपासून शंकाची निर्मिती झाली म्हणून भगवान शंकरांच्या पूजेत शंखाचा उपयोग केल्या जात नाही.

४) नारळाचे पाणी – Coconut Water

 भगवान शंकराच्या पिंडेवर नारळ अर्पण केल्या जाऊ शकते, परंतु नारळाचे पाणी अर्पण करू नये.

असं म्हटल्या जाते कि नारळाला लक्ष्मी मातेच्या रुपात पाहतात, म्हणून भगवान शंकराच्या पिंडेवर नारळाचे पाणी वाहू शकत नाही.

५) तुळशीचे पाने वाहू नये – Don’t Use Basil Leaves

तसे पाहले असता कोणत्याही पूजेच्या कार्यक्रमात तुळशीचे पाने आपण वापरतो. परंतु भगवान महादेवां च्या पूजेत आपण त्या पानांचा उपयोग करू शकत नाही, भगवान शंकरांनी जालंदर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाची पत्नी तुळस बनून गेली. त्यासाठी भगवान शंकराच्या पूजेला तुळशीचे पाने वाहू नयेत.

६) केतकी चे फुल – Ketaki’s flowers

पौराणिक कथांच्या अनुसार केतकीच्या फुलांनी भगवान ब्रम्हदेवांच्या खोटे बोलण्यात साथ दिली होती. त्यामुळे भगवान शंकर त्यापासून नाराज झाले होते आणि फुलांना श्राप दिला होता कि शिवलिंगावर कधीही केतकी चे फुले चढवले जाणार नाही. त्यामुळे शंकरांच्या पिंडेवर कधीही केतकी चे फुल वाहील्या जात नाही.

आशा करतो या लेखामुळे आपल्याला पुराणातील काही गोष्टींना जाणण्यास मदत झाली असेल आपण याच प्रकारच्या लेखांसाठी आमच्याशी जुळलेले रहा आम्ही आपल्यासाठी असेच नवीन लेख घेऊन येत राहू.

सोबतच आपला अभिप्राय आम्हाला कळवा.

आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved