चिकू ने बनविले महाराष्ट्रातील या व्यक्तीला करोडपती, एक नाविन्यपूर्ण व्यवसायाची सुरुवात

Success Story of Mahesh Suri

म्हणतात ना “योग्य वेळी, योग्य दिशेने केलेली मेहनत आपल्याला यशस्वी बनविण्यासाठी पुरेशी असते.”

असाच एक स्टार्टअप आपल्याला मुंबईतील पालघर च्या बोर्डी गावच्या एका व्यक्तीने केल्याचे पहायला मिळते. या व्यक्तीचे नाव आहे महेश चुरी. आपण आतापर्यंत बरेच लोकांना व्यवसाय करताना पाहिले असेल पण महेश यांनी चिकूच्या जोरावर आज बाजारात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, एवढंच नाही तर त्यांच्या येथून तयार झालेले चिकूचे २१ प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स मार्केट मध्ये विकल्या जात आहेत, आपण आजपर्यंत चिकू ला लोड गाडीवर किंवा एखाद्या विशिष्ट दुकानात विक्री होताना पाहिले असेल, पण चिकू चा उपयोग करून एखादी व्यक्ती जीवनात करोडपती बनू शकते हे आपण ऐकले नसेल.

तसे पाहिले असता आपण चिकू ला एक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी चांगले असणारे फळ म्हणून ओळखतो, आणि भारतामध्ये या फळांचे बऱ्यापैकी उत्पादन होताना आपल्याला दिसतं. चिकू मध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज या सारखे तत्व पाहायला मिळतात. सोबतच चिकू मध्ये व्हिटॅमिन्स ए,बी,सी, आणि ई पाहायला मिळतं. चिकूला सालीसोबत खाणे योग्य मानल्या जात. कारण चिकूच्या साली मध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले पोषकद्रव्ये असतात.

चिकूच्या व्यवसाय करणाऱ्या करोडपती महेश चुरी याची कहाणी – Story of Mahesh Churi, a millionaire from Chiku Buisness in Marathi 

Story of Mahesh Suri, a millionaire from Chiku Buisness
Story of Mahesh Suri, a millionaire from Chiku Buisness

 

आपल्या महाराष्ट्रातील पालघर च्या बोर्डी येथील चिकू च्या शेतीला २०१६ मध्ये जीआईजी टॅग मिळाला आहे. या गावचे महेश चुरी हे एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. यांची एक कंपनी आहे त्या कंपनीचे नाव सुमो इलेक्ट्रिकल आहे. या कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल कामे चालू असतात, पण या कंपनीच्या व्यतिरिक्त त्यांची आणखी एक कंपनी आहे ज्या कंपनी मध्ये त्यांनी नवीन स्टार्टअप सुरू केला होता. ही कंपनी चिकू पासून तयार होणाऱ्या २१ वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचे निर्माण करून ४ आऊटलेट्स च्या माध्यमातून बाजारात विकते.

या आधी चुरी यांना अपयशाचा सामना सुध्दा करावा लागला, सुरुवातीला त्यांनी स्वतःची ग्राइंडिंग मशीन चे निर्माण करून चिकू ची पावडर बनविण्याची शक्कल लढवली पण ती कल्पना यशस्वी झाली नाही. त्यांनंतर त्यांनी या गोष्टीला अपयश न समजता, त्यांनी त्याचा अभ्यास करून उत्तम प्रोडक्शन करून स्वतःचे एक ब्रँड तयार केले आणि याच ब्रँड चे २१ वेगवेगळे प्रॉडक्ट्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले, त्यांनंतर त्यांना या व्यापारातून करोडो रुपयांची उलाढाल पाहायला मिळाली. सोबतच त्यांना या व्यवसायातून १ कोटी रुपयांचा फायदा सुध्दा झाला.

आज हा व्यवसाय खूप मोठा झाला आहे. या व्यवसायामुळे तेथील बऱ्याच महिलांना रोजगार मिळाला आहे. सोबतच तेथील युवावर्गाला सुध्दा या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या कंपनीचा कच्चा माल हा त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील नैसर्गिक रित्या पिकलेले चिकू असतात, त्यामुळे त्यांनाही फायदा होतो. आणि बाजारात या चिकू पासून बनलेले २१ प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स विकल्या जातात.

या स्टार्टअप किंवा व्यवसायाला पाहून आपल्याला एवढं कळलं असेल की सुरुवात कठीण असली, तरी सुध्दा सतत करण्यात आलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतातच. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here