स्वच्छता अभियानावर एक सुंदर निबंध

Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

“स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी,” हे वाक्य तर आपण ऐकले असणारच, ज्याच्या घरी स्वच्छता असेल त्याच्या घरीच लक्ष्मीचा वास असतो. अशी आपल्याकडे मान्यता सुद्धा आहे, स्वच्छतेला आपल्या येथे सुरुवाती पासूनच जास्त महत्व दिल्या जात होते, पण काही काळानंतर लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगावे लागत आहे, तर आजच्या लेखात आपण स्वच्छतेविषयी निबंध पाहणार आहोत.

स्वच्छता अभियानावर एक सुंदर निबंध – Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi
Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi

२ ऑक्टोबर २०१४ ला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेची सुरुवात केली, या मोहिमेची सुरुवात तर आता झाली, पण स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा गांधीजी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करायचे तेव्हा त्यांच्या सोबत गरीब, श्रीमंत, मोठमोठे नेते मंडळी, स्वयंसेवक, सर्वजण हातामध्ये झाडू घेऊन रस्त्यावर निघायचे. आणि सफाई करायचे.

जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या अभियानाची सुरुवात केली, तेव्हा देशात सगळीकडे “एक पाऊल स्वच्छतेकडे” पाहायला मिळालं. तसेच “क्लीन इंडिया ग्रीन इंडिया” यासारखी अनेक नवनवीन घोषवाक्यें सुद्धा पाहायला मिळाली. यापासून देशात बऱ्याच प्रमाणात बदल आला आहे, आणि ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेच.

या मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयामध्ये या मोहिमेविषयी जास्त प्रमाणात जागरुकता पाहायला मिळाली, तसेच या मोहिमेचा उद्देश हाच आहे कि संपूर्ण देश स्वच्छ झाला पाहिजे. या मोहिमेची सुरुवात इसवी सन १९९१ ला झालेली होती पण तेव्हा या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मनमोहन सिंह यांनी सुद्धा १९९९ ला “निर्मल भारत” अभियानाची सुरुवात केली होती पण तेव्हा सुद्धा हि मोहीम जास्त प्रमाणात कारगीर ठरली नाही,

पण जेव्हा नरेंद्र मोदींनी या अभियानाला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण देशातून या मोहिमेला चांगला प्रतीसाद मिळाला.

स्वच्छता आवश्यक का आहे? – Importance of Cleanliness

आपल्याला बऱ्याच देशांमध्ये असलेली स्वच्छता माहिती आहे, आणि त्या देशांची प्रगती सुद्धा आपण पाहून आहोत, प्रत्येक देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात तेथील नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असतो जर प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना असेल तर तो देश एक दिवस नक्कीच विकसित होतो.

तर आपल्या देशात सुद्धा स्वच्छता अभियानाची सुरुवात करून लोकांना स्वच्छतेविषयी जागरूक केल्या गेलं, त्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजले, एवढचं नाही तर स्वच्छता का आवश्यक आहे, हे सुद्धा लोकांना समजायला लागले, स्वच्छतेमुळे बरेचशे फायदे आहेत, जसे आपण आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली तर एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, आणि कामात मन सुद्धा लागतं, रोगराई आपल्या पासून दहा हात दूर राहते, जर रोगराई चे प्रमाण कमी झाले तर आपल्याला इतर खर्चांच्या ओझ्याखाली दबण्यापासून वाचू शकतो.

स्वच्छता अभियानाने पडलेला प्रभाव – Swachh Bharat Abhiyan Result

जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती झाडू घेतला तेव्हा बरेच जणांना हि गोष्ट एक स्टंट सारखी वाटली पण त्या गोष्टीमुळे आज देशावर एक नवीन प्रभाव पडताना आपल्याला दिसत आहे, स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ने ६० हजार कोटींपेक्षा जास्त पैसा मंजूर केला आहे, सोबतच या अभियानासाठी भारत सरकारने स्पेशल अ‍ॅप आणि वेब साईट बनवली आहे, ज्यामध्ये याविषयी सर्व माहिती मिळते,

या योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला १२,००० रुपयांचे दिल्या जात आहे, त्यामध्ये केंद्र सरकार ९,००० रुपये देत आहे, आणि राज्य सरकार ३,००० रुपये. या अ‍ॅप च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात लाखो कुटुंबांनी शौचालये बांधली आणि त्याचा वापर सुद्धा करत आहेत, अनेक जिल्ह्यांमधील गावे आता हागणदारीमुक्त झाली आहेत.

स्वच्छतेमध्ये आपलं योगदान कसे देऊ शकतो?

आपल्या दैनंदिन जीवनात आपण आजूबाजूला कश्या प्रकारे स्वच्छता ठेवू शकतो,

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपल्याजवळ असलेले खाद्यपदार्थाचे पाकिटे, तसेच पाण्याच्या बाटल्या, आणि आणखी काही गोष्टी ह्या तेथे रस्त्यावर न टाकता त्या कचरा कुंडीत टाकाव्या. आणि तेथे कचरा कुंडी दिसली नाही तर आपण तो कचरा आपल्या जवळ ठेऊन नंतर आपल्या सोबत घरी घेऊन यावे आणि घरच्या कचरा कुंडीत टाकावा.

घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा, आणि आपण शहरात राहायला असणार तर सकाळी येणाऱ्या नगरपालिकेच्या गाडीमध्ये त्याला टाकून द्यावे. आणि आपण खेड्यात राहायला असणार तर त्या कचऱ्याचे योग्य ठिकाणी व्यवस्थापन करावे.

कोणी तुमच्या समोर कचरा करत असणार तर त्याला कचरा करण्यापासून थांबवावे. आणि त्याला कचऱ्याला कचरा कुंडीत टाकायला सांगावे. होईल तेवढे कचरा न करण्याचा प्रयत्न करा कारण स्वच्छता ठेवण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करावी लागेल. म्हणतात ना आपण बदललो तरच देश बदलेल बस तसच काहीतरी.

तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि निबंधांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top