विदेशी कंपन्यांचे CEO आहेत भारतीय

Top CEO in World

शीर्षक वाचल्यावर आपल्याला माहितीच झाले असेल कि, मी या लेखामध्ये आपल्याला नेमके कशाविषयी सांगणार आहे, हो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहात अश्या काही भारतीय व्यक्तींविषयी जे सर्व जगाला चालविण्याची ताकद ठेवतात.

म्हणजेच जगातील सर्वोच्च कंपन्यांना चालवितात.

तसेच त्यांनी भारताचे नाव जगात उंचावले आहे.

त्यामुळे आज जगात भारताला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

विदेशी कंपन्यांचे CEO आहेत भारतीय – Top Indian CEOs in the World

Top Indian CEOs in the World

हे ८ भारतीय जगातील टॉप कंपन्यांचे CEO – World’s Top 8 CEO Is Indian List

तर चला जाणून घेऊ त्या व्यक्तींविषयी ज्यांनी विश्वात भारताचा मानाचा तुरा रोवला आहे.

  • सुंदरराजन पिचाई – Sundar Pichai

सुंदरराजन पिचाई यांना सुंदर पिचाई म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांचा जन्म दक्षिण भारतातील मदुराई येथे १० जून १९७२ रोजी झाला.

आज ते पूर्ण जगातील प्रसिध्द गुगल चे कार्यकारी अधिकारी आहेत.

गुगल मध्ये त्यांची नियुक्ती २००४ मध्ये मटेरियल इंजिनियर म्हणून झाली होती, तेव्हापासून पिचाई हे  गुगल मध्येच कार्यरत आहेत.

त्यांच्या कामाची सराहना करत गुगल ने १० ऑगस्ट २०१५ ला त्यांची बढती करत त्यांना गुगल चे कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली.

सुंदर पिचाई यांची एक वर्षाची कमाई हि जवळ जवळ लाखों अमेरिकी डॉलर एवढी आहे.

आज ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत, आज संपूर्ण भारत देशाला त्यांच्या वर गर्व आहे.

  • शंतनू नारायण – Shantanu Narayen

शंतनू नारायण यांचा जन्म हैद्राबाद मध्ये २७ मे १९६३ रोजी झाला, त्यांच्या शिक्षणाची सुरुवात हि हैद्राबाद पब्लिक स्कूल मधूनच झाली, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन मधून त्यांनी त्यांची इंजिनियर ची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे MBA चे शिक्षण California च्या विद्यापीठातून पूर्ण केले.

त्यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर पदवी घेतली, आज ते ADOBE SYSTEMES  कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत, ADOBE SYSTEMES   हि एक अमेरिकन कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी आहे, शंतनू नारायण यांच्या करियर ची सुरुवात APPLE सारख्या मोठ्या कंपनी पासून झाली आहे.

त्यांनतर २००७ मध्ये ADOBE SYSTEMES  कंपनीने शंतनू नारायण यांना कंपनीचे कार्यकारी अधिकारी बनवले.

तसेच २०१९ मध्ये भारत सरकार द्वारा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

आज त्यांची एका वर्षाची कमाई हि जवळ-जवळ मिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे.

  • सत्या नडेला – Satya Nadella

सत्या नडेला यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६७ मध्ये हैद्राबाद येथे झाला, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे हैद्राबाद पब्लिक स्कूल बेगमपेट येथे झाले. त्यानंतर इंजिनियरिंग ची पदवी घ्यायच्या अगोदरच ते अमेरिकेला त्यांचे काम्पुटर सायन्स मध्ये मास्टर पदवी घेण्याकारीता निघून गेले आणि १९९० मध्ये त्यांनी ती पदवी मिळवली सुद्धा.

त्यांनतर MBA ची पदवी त्यांनी शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझिनेस युनिवर्सिटी येथून घेतली.

मायक्रोसॉफ्ट मध्ये त्यांची नियुक्ती व्हायच्या अगोदर ते १९९२ मध्ये सन मायक्रोसिस्टम टेक्नोलॉजी मध्ये मेंबर म्हणून कामाला होते.

त्यानंतर ४ फेब्रुवारी २०१४ ला सत्या नडाला यांची मायक्रोसॉफ्ट मध्ये CEO म्हणून निवड झाली आणि ते कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

  • संजय मल्होत्रा –  Sanjay Malhotra

संजय मल्होत्रा यांचा जन्म उत्तर प्रदेश च्या कानपूर मध्ये २७ जून १९५८ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे दिल्ली मधील सरदार पटेल विद्यालय लोधी रोड ला झाले. त्यांनतर त्यांनी त्यांचे कॉलेज चे शिक्षण Birla Institute of Technology and Science, Pilani  येथून पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कम्प्युटर सायन्स यामध्ये California च्या विद्यापीठातून मास्टरची पदवी प्राप्त केली.

आज ते अमेरिकेतील कंपनी SanDisk  चे कार्यकारी अधिकारी आहेत, ते जानेवारी २०११ पासून त्या कंपनी मध्ये CEO म्हणून कार्यरत आहेत.

  • राजीव सुरी – Rajeev Suri

राजीव सुरी यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६७ रोजी आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे झाला. ते मध्य एशियातील कुवाईत देशामध्ये त्यांचे संगोपन झाले.

त्यांनी इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन्स मध्ये मनिपाल विद्यापीठातून त्यांनी इंजिनीरिंग ची पदवी प्राप्त केली.

नोकिया मध्ये कार्यरत व्हायच्या अगोदर त्यांनी बर्याच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केले आहेत, त्या काही कंपन्या भारतीय, नायजेरिया येथील होत्या.

त्यानंतर २००९ मध्ये नोकिया कंपनीने त्यांना कंपनीचे CEO बनवले. ते आता फिनलँड च्या एस्पू शहरात राहतात. त्यांची वर्षाची कमाई हि करोडो रुपये आहे.

  • निकेश अरोरा – Nikesh Arora

निकेश अरोरा यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. त्यांचे वडील AIR FORCE ऑफिसर होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण हे AIR FORCE स्कूल मध्ये झाले. त्यांनतर त्यांचे पदवी चे शिक्षण हे वाराणसी मधील इंडिअन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये पूर्ण केले.

त्यांनी त्यांची MBA ची डिग्री बोस्टन च्या नॉर्थ इस्टन विद्यापीठातून पूर्ण केली.

विप्रो मध्ये नोकरी केल्यांनतर त्यांनी २००४ मध्ये गुगल ला जॉईन केले होते.

तसेच त्यांनी गुगल मध्ये माजी कार्यकारी तसेच जापानच्या सॉफ्टबँक समूहाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले आहे.

आता ते अमेरिकेच्या सायबर सिक्युरिटी कंपनी पॅलो अल्टो नेटवर्क कंपनीचे CEO म्हणून कार्यरत आहेत.

  • दिनेश पलीवाल – Dinesh Paliwal

दिनेश पालीवाल यांचा जन्म आग्र्याला  १७ डिसेंबर १९५७ रोजी झाला होता. त्यांनी त्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण हे उत्तराखंडच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुड़की येथून पूर्ण केले.

इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट चे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना अमेरिकेच्या मियामी विद्यापीठ ऑक्सफर्ड मधून स्कॉलरशिप सुद्धा मिळालेली होती.

आता ते अमेरिकेच्या नामांकित कंपनी हरमन इंटरनॅशनल इंडस्ट्री चे कार्यकारी अधिकारी आहेत,

  • अजयपाल सिंग बंगा – Ajaypal Singh Banga

अजयपाल सिंग बंगा ह्यांचा जन्म शिक्षणाचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये १९६० मध्ये झाला. त्यांचे वडील हे भारतीय सेनेत जनरल या पदावर कार्यरत होते, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे हैद्राबाद पब्लिक स्कूल बेगमपेठ येथून झाली होती,

त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिवर्सिटी मधून त्यांची अर्थशास्त्राची पदवी पूर्ण केली.

तसेच त्यांनी त्यांचे MBA चे शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून पूर्ण केले.

१९८१ मध्ये Nestle कंपनी पासून त्यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात केली. तसेच त्यांनी पेप्सिको सारख्या कंपनी साठीही काम केले आहेत.

आजच्या स्थितीत ते पूर्ण जगामध्ये वापरल्या जाणाऱ्या अमेरिकी कंपनी Master Card  चे CEO म्हणजेच कार्यकारी अधिकारी आहेत.

त्यांना भारत सरकार ने २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले आहे.

तर हे आहेत काही भारतीय जे संपूर्ण देशात भारताचे नाव उंचावत आहेत, आणि जगातील मोठ्या कंपन्यांना आपल्या बुद्धीच्या बळावर चालवत आहेत, प्रत्येकाला गर्व वाटेल अश्या भारतीय नागरिकांवर.

आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल,आवडल्यास ह्या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारात शेयर करायला विसरू नका.

मी आणखी असेच माहितीपर लेख आपल्यासाठी घेऊन येत राहील, आमच्यावर असेच प्रेम करत रहा.

धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here