पब्लिक मध्ये करावी लागणार हि गोष्ट. अजबच आहे ना हि कल्पना!

Japan Made a Transparent Public Toilet

जपान म्हणावं आणि हाथ जोडावे कारण एकापेक्षा एक नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी जपान ला ओळखल्या जात. जपान असा एक देश आहे त्या देशावर कितीही संकटे आली तरी सुद्धा तो नव्याने उभा राहतो, मग ते हिरोशिमा नागासाकी वर झालेला अणुबॉम्ब च्या हमल्यातून उभे राहणे होय किंवा एखाद्या भूकंपातून बाहेर येणे होय.

या सगळ्या समस्यांमधून जपान स्वतःच्या आत्मबळावर बाहेर तर येतोच, तसेच तो नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जगात ओळखल्या जातो, असाच एक नवीन प्रयोग जपान आपल्या देशात करत आहे हा प्रयोग जपान सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी करत आहे.

पब्लिक मध्ये करावी लागणार हि गोष्ट. अजबच आहे ना हि कल्पना! – Japan Made a Transparent Public Toilet

Transparent Public Toilet
Transparent Public Toilet

हा प्रयोग नसून एक उपक्रम आहे जो जपान संपूर्ण देशात राबविताना दिसत आहे. आता आपल्याला वाटत असेल कि असा कोणता उपक्रम जपान ने हाती घेतला आहे. तर चला पाहूया काय आहे हा उपक्रम.

जपान ने सार्वजनिक ठिकाणी काही काचाचे टॉयलेट उभे केले ज्यामधून आरपार दिसणार आहे, आरपार दिसणार तर कोण जाणार या टॉयलेट मध्ये असाही एक नवा प्रश्न येथे उभा राहतो, पण ते जपान आहे आणि जपान ने केलेल्या गोष्टींमध्ये काहीना काही तथ्य तर असणारच आहे ना.

तसेच यामध्ये सुद्धा एक तथ्य आहे ते असे कि पब्लिक टॉयलेट मध्ये लोक स्वच्छता बिलकुल ठेवत नसतात, आणि या गोष्टीवर उपाय काढत जपान च्या नॉन प्रोफिट निपॉन फाउंडेशन ने जपान ची राजधानी टोकियो च्या पार्क मध्ये हे पब्लिक टॉयलेट उभे केले आहेत,

आरपार दिसणाऱ्या टॉयलेट मध्ये कोण जाणार?

या लेखाला वाचल्या नंतर आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडला असेल कि आरपार दिसणाऱ्या टॉयलेट मध्ये कोण जाणार तर आपल्याला मी सांगू इच्छितो कि हे टॉयलेट जरीही पूर्णपणे पारदर्शक असले तरीही या टॉयलेट मध्ये लावलेले काच हे रंगीबेरंगी आहेत आणि जेव्हा एखादी व्यक्ती आतमध्ये जाते तेव्हा दरवाजा लॉक केल्यानंतर या टॉयलेट चे जे पारदर्शी काच आहेत ते अपारदर्शी बनतात, आणि बाहेरून आतमधील काहीही पाहता येत नाही, परंतु आतमधून बाहेरचं सर्वच दिसेल.

असे टॉयलेट उभे करण्यामागील कारण

सगळीकडे माहिती आहेच कि पब्लिक टॉयलेट चा वापर लोक कश्या प्रकारे करतात काही सांगायची हरकतच नाही. जसे पब्लिक टॉयलेट मध्ये गेल्या बरोबर आपल्या नाकाला रुमाल लावावा लागतो. आपण समजू शकता लोकांना स्वच्छता ठेवण्यासाठी सांगावे लागते, यावर उपाय काढत जपान मध्ये हे टॉयलेट उभे करण्याचा निर्णय घेतला.

जेणेकरून जेव्हा या टॉयलेट मध्ये कोणीही नसेल तेव्हा या टॉयलेट मध्ये असलेली अस्वच्छता दिसून येईल सोबतच जर आपण या टॉयलेट मध्ये घाण करून निघता तर आपल्याला लोक पाहतील यामुळे हे
टॉयलेट अश्या प्रकारे बनविल्या गेले आहे.

तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता हे टॉयलेट कश्या प्रकारे आहे या टॉयलेट मध्ये अपंगांसाठी तसेच महिला आणि पुरुष या तिन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी या खास टॉयलेट चे निर्माण केलेले आहे. हे टॉयलेट काही दिवसातच एक चर्चेचा विषय सुद्धा बनले होते.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपण आपल्या मित्रांना शेयर करून त्यांना हि गजब माहिती द्यायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You so Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top