फिरण्यासाठी ऋतु पावसाळा आणि वरंधा घाट, नक्की भेट द्या या घाटाला

Varandha Ghat Information in Marathi

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे तेथील वातावरण देखील खूप सुंदर बनलं आहे. हिरवीगार झाडे, उंचच्या उंच डोंगरमाळा, उंचावरून पडणारे धबधबे तसचं, त्या हिरव्यागार परिसरात आढळणारे निरनिराळे प्राणी, पक्षी, फळे, फुले यामुळे तेथे जणू काही स्वर्गच अवतरल्या सारख वाटते. आज आपण अश्याच एका नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत.

YouTube video

वरंधा घाटा विषयी संपूर्ण माहिती – Varandha Ghat Information in Marathi

पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर असणारा २० किमी लांबीचा डोंगराळ घाट मार्ग म्हणजे “वरंधा घाट” होय. पुण्यावरून भोरमार्गे महाडला जातांना हा घाट लागतो. पश्चिम घाट पर्वतरांगांच्या सीमेवर वसलेल्या या वरंधा घाटात अनेक प्रकारची रमणीय धबधबे, तलाव आणि घनदाट जंगल असून त्यात विविध प्रकारची जंगली प्राणी आपणास पाहायला पहायला मिळतात.

पर्यटक प्रेमीना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आनंद देणारा हा घाट असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी येतात. सहयाद्री पर्वताच्या मध्यभागी स्थित असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभागून हा घाट कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडांच्या मध्यभागी समर्थ रामदासस्वामी यांची शिवथरघळ आहे.

वरंध हा घाट पुण्यापासून सामारे ११० किमी दूर असून महाडपासून सुमारे २५ किमी दुरिवर आहे. या घाटाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या घाट रस्त्यावर असलेलं वाघजाई माता मंदिर, या मंदिराजवळून आपणास डोंगर माध्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची तसचं, खोलवर दऱ्या खोऱ्यांची सुंदर प्रलोभनीय दृश्ये आपल्या दृष्टीस पडतात.

Varandha Ghat Information in Marathi
Varandha Ghat Information in Marathi

पुण्यावरून कोकणाच्या दिशेने जातांना आपणास सुमारे ३००० फुटांच्या खोल दऱ्यांमुळे मानवी वस्त्यांची अतिशय खडबडीत खोरी निर्माण झाल्याचे निर्दर्शनास येते. तसचं, वरंध घाटाच्या उताराच्या दिशेने माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे वसली आहेत. तर घाटाच्या वरच्या देशेला भुते आहेत अशी येथील नागरिकांची भावना आहे. घाटाच्या मध्ये वाघजाई नावाचे भूत आहे.

वाघजाईच्या समोर एक उंच डोंगर असून तो डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्या डोंगराच्या चहुबाजूने धबधबे कोसळतात. या घाटातील दोन्ही अंगाचे डोंगर म्हणजे कावळ्या उर्फ मनमोहन गड किल्ला. तसचं, या गडाच्या वाघजाई कडील डोंगर गडामध्ये नऊ खोदीव टाकी असून दुसऱ्या बाजूने देखील अश्याच स्वरुपाची काही टाकी आणि शिबंदीच्या घराचे अवशेष दिसून येतात.

डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला हा घाट इ.स. १८५७ साली ब्रिटिशांनी दुरुस्त केला होता. या ठिकाणी जाण्यासाठी पुण्यावरून बसची सुविधा उपलब्ध असून खाजगी वाहनांची ये जा देखील दिवसभर सुरूच असते. निसर्ग प्रेमींसाठी खूप आकर्षक पर्यटन स्थळ असल्याने आपण या ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्ग चित्र पाहण्यासाठी जावू शकता. धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top