टीम इंडियाचा सुपर हिरो कर्णधार विराट कोहली यांचा जीवनपरिचय

Virat Kohli yancha Jivan parichay 

विराट कोहलीला कोण ओळखत नाही? असा एकही भारतीय आणि क्रिकेट प्रेमी शोधून देखील सापडणार नाही ज्याने विराट कोहली हे नाव ऐकलं नसेल किंवा त्याला खेळतांना पाहिलं नसेल. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू असून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनंतर विराट असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेट संघाला मजबुती दिली आणि आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं.

आपल्या खेळातील प्रदर्शनाने आबाल-वृद्धांच्या मनात त्याने हक्काचं स्थान निर्माण केलंय. विराटला भारतीय क्रिकेट संघाचा बेक-बोन म्हंटल्या जातं कारण तो उजव्या हाताने खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर व सर्वाधिक प्रतिभावान आणि हुशार खेळाडूंपैकी एक आहे. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून शेकडो तरुणांचा स्टाईल आयकॉन देखील झाला आहे.

भारतीय क्रिकेट खेळाडू…विराट कोहली – Virat Kohli Information in Marathi

Virat Kohli Information in Marathi
Virat Kohli Information in Marathi

विराट कोहलीचा जीवन परिचय – Virat Kohli History in Marathi

नाव (Name) विराट प्रेम कोहली
जन्म (Born) 5 नोव्हेंबर 1988
जन्मस्थान (Birthplace) दिल्ली
टोपणनाव (Nickname) चिकू
आई (Mother) सरोज कोहली
वडील (Father) प्रेमजी
पत्नी (Wife) अनुष्का शर्मा (बॉलीवुड अभिनेत्री)

विराट कोहली माहिती – Virat Kohli Biography in Marathi

भारतीय क्रिकेट संघातील या दिग्गज खेळाडूचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात झाला. वडील प्रेम कोहली हे एक क्रिमिनल लॉयर होते तर आई सरोज कोहली या गृहिणी होत्या. विराटला एक मोठा भाऊ विकास आणि मोठी बहिण भावना देखील आहेत.

विराट जेंव्हा अवघ्या तीन वर्षांचा होता अगदी तेंव्हापासून त्याच्या आवडत्या खेळांमध्ये क्रिकेट फार आवडीचा खेळ होता. तो जसा-जसा मोठा होत गेला, क्रिकेटची त्याची आवड वाढत गेली. त्याच्या वडीलांनी त्याचा क्रिकेटकडचा कल ओळखला होता, ते त्याला रोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी घेऊन जात असत.

विराट कोहलीचे शिक्षण – Virat Kohli Education

कोहली चे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूल येथून झाले. शिक्षणात विराट सर्वसामान्य होता आणि त्याचे संपूर्ण लक्ष कायम क्रिकेटकडेच होतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील त्याची आवड पहाता अवघ्या 9 व्या वर्षी त्याला क्रिकेट क्लबमधे पाठविण्यास सुरुवात केली.

जेणेकरून क्रिकेट मधील बारकावे त्याला शिकता यावेत. अगदी सुरुवातीपासून सगळं लक्ष क्रिकेटवर असल्याने विराटने 12वी पर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष क्रिकेट वर केंद्रित केलं. दिल्लीत विराटचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा हे होते, व सुमित डोंगरा नामक अकेडमीतून पहिला सामना खेळला.

विराट कोहलीची कारकीर्द – Virat Kohli Career

विराट कोहली हा उजव्या हाताचा खेळाडू असून 2002 मधे अंडर-15 स्पर्धा तो खेळला. त्यानंतर 2006 साली त्याची निवड अंडर-17 मधे झाली. त्यानंतर त्याच्या खेळात मोठा बदल अनुभवायला मिळाला, 2008 ला विराट ची निवड अंडर-19 करता झाली. विराटची अंडर-19 विश्वकप स्पर्धा मलेशिया इथं पार पडली आणि या स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्या नंतर विराटची निवड वन डे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता झाली होती.

त्याने हा सामना श्रीलंके विरुद्ध खेळला होता. आणि त्यानंतर 2011 ला त्याला क्रिकेट विश्वकप खेळण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि त्यात देखील भारताला विजय मिळाला. त्यानंतर विराट लागोपाठ सामने खेळू लागला. आता त्याचा समावेश उत्तम फलंदाजांमध्ये होऊ लागला आणि आज तो क्रिकेट जगतात चांगलाच प्रसिद्ध झालाय.

विराट कोहलीची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द – Virat Kohli One Day Match Career

2011 साली विराट कोहलीने कसोटी क्रिकेट शृंखलेत आपलं स्थान निर्माण केलं  होतं. नंतर त्याने एकदिवसीय सामन्यात 6 व्या स्थानावर फलंदाजीस सुरुवात केली.

त्या दरम्यान त्याला दोनदा पराजयाचा देखील सामना करावा लागला परंतु आपल्या पराजयाने तो कधीही  खचला नाही किंवा निराश देखील झाला नाही. उलट तो पराजयातून शिकत गेला आणि आपल्या खेळात तो अधिकाधिक उत्कृष्ट बनत गेला. आणि त्यानंतरच्या सामन्यात त्याने 116 धावा केल्या.

या सामन्यात भारताला विजय मिळाला नाही पण विराट एकमेव शतक बनविणारा भारतीय खेळाडू ठरला.

पुढे विराट कोहली ने कॉमनवेल्थ बैंक ट्राएंगुलर सिरीज मधे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंके विरूद्धचे सामने जिंकत 7 पैकी 2 सामन्यांमध्ये यश मिळवले.

तसेचया  सिरीज मधे फायनलला जाण्यासाठी श्रीलंके विरुद्ध 321 धावांचे लक्ष्य होते.

यात विराट ने 133 धावा काढत भारताला विजय मिळवून दिला आणि मैन ऑफ द मैच हा खिताब पटकावला.

त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याला सलग खेळण्याच्या संधी मिळत होत्या. 2012 साली एशिया चषक करता व्हाइस-कैप्टन म्हणून त्याला निवडण्यात आलं. या दरम्यान त्याला कर्णधार बनविण्या संदर्भात देखील चर्चा झाली होती.

तेंव्हा असं म्हंटल्या गेलं की विराट असंच खेळत गेला तर भविष्यात तो भारतीय संघाचा कर्णधार असेल.

आणि त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनविण्यात आलं.

पाकिस्तान विरोधात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विराटने 148 चेंडूत 183 धावा काढल्या आणि या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करीत 330 धावांचा रेकॉर्ड बनविला. त्याला पुन्हा एकदा मैन ऑफ द मैच बनविण्यात आलं.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधे विराट कोहलीची कारकीर्द – Virat Kohli IPL Career

विराट कोहलीने 2008 साली IPL चा पहिला सामना खेळला. त्या दरम्यान रॉयल चेलेंजर्स, बैंगलोर ने (RCB) विराट ला आपल्या संघाकरता 20 लाखांमध्ये विकत घेतलं होतं.

त्यावेळी या संघाने 13 सामन्यांमध्ये 165 धावा काढल्या होत्या आणि 15 धावांचा एवरेज होता. 2009 साली विराट ने RCB ला फायनल पर्यंत पोहोचवले.

त्या वेळी अनिल कुंबळे ने देखील विराट च्या खेळाचे खूप कौतुक केले होते. परंतु अद्याप सुद्धा भारतीय संघात विराट चे नाव नियमित झाले नव्हते. 2014 मधे विराट चे IPL मधील प्रदर्शन विशेष नव्हते. त्यावेळी तो केवळ 37 च्या एवरेज वरच खेळला. या दरम्यानच महेंद्र सिंग धोनीने कसोटी सामन्यांच्या कर्णधारपदावरून निवृत्ती घेतली, त्यानंतर कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला बनविण्यात आलं.

कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपली जवाबदारी फार चांगल्या तऱ्हेने निभावली आणि आपल्या संघाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर विराट 500 धावांचा रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी झाले.

Virat Kohli Cricket Career

2016 च्या एशिया चषक आणि टी-20 मधे भारतासाठी, तसच IPL स्पर्धेत RCB  करता झालेल्या सामन्यात विराट ने शानदार प्रदर्शन केले.

विराटच्या खेळण्याच्या पद्धतीने क्रिकेट रसिक त्याच्याकडे आकर्षिल्या जाऊ लागले. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती.

2018 ला तर विराट कोहलीला IPL  मधे तब्बल 18 करोड रुपयांमध्ये विकत घेतल्या गेलं.

या व्यतिरिक्त विराट कोहलीने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन करून अनेक विक्रम नोंदवले.

परंतु काही सामन्यात त्याला पराजयाला देखील सामोरे जावे लागले.

संपूर्ण विश्वात केवळ 8 क्रिकेट खेळाडूंनी 20 ODI मधे शतक झळकवले आहे आणि त्या 8 खेळाडूंमध्ये विराट कोहलीचे नाव आहे.

विराट 20 ODI मधे शतक  झळकवणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याच्या पूर्वी सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला आहे. क्रिकेट मधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी नंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 3 वर्षात सलग 1 हजाराहून अधिक धावा काढणारा चौथा क्रिकेटर ठरला आहे.

विराट कोहली हा खेळाडू 1000, 3000, 4000, आणि 5000  धावांचा रेकॉर्ड बनविणारा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे.

शिवाय रिचर्ड समवेत रेकॉर्ड ची तुलना करता विराट 5000 धावा काढणारा सर्वाधिक वेगवान आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी देखील एक ठरला आहे.

एक नजर विराट कोहली ने केलेल्या विक्रमांवर – Virat Kohli Records

 • 2011 साली विराट ने विश्वकप स्पर्धेत शतक झळकवले आहे.
 • वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ODI मधे 100 धावा काढणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.
 • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 1000, 3000, 4000, आणि 5000, धावा काढणारा तो पहिला खेळाडू आहे.
 • 2013 साली विराट ने जयपूर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध, केवळ 52 चेंडूत शतक पूर्ण केलं.
 • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7500 धावा बनविणारा तो सर्वाधिक वेगवान भारतीय क्रिकेटर आहे.

विराट कोहली ला मिळालेले पुरस्कार – Virat Kohli Awards

आज विराट कोहली यशाच्या शिखरावर पोहोचलेला आपल्याला दिसतोय. परंतु इथपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा नक्कीच नव्हता.

विराट अनेक विवादात देखील अडकला, क्रिकेट मधील आपल्या योगदाना करता त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं…

 • 2012- पिपल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
 • 2012- आईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द ईयर अवॉर्ड
 • 2013- अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
 • 2017- सीएनएन- आईबीएन इंडियन ऑफ द ईयर
 • 2017- पद्मश्री अवॉर्ड
 • 2018- सर गर्फीएल्ड सोबर्स ट्रॉफी ने विराट कोहली ला सन्मानित करण्यात आलं.

विराट कोहलीचा विवाह – Virat Kohli Marriage

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत डिसेंबर 2017 ला विराट विवाह बंधनात अडकला. विराट कोहली आपल्या लुक मुळे देखील कायम चर्चेत रहातो. आजचा तरुण वर्ग विराट ला मोठ्या प्रमाणात फॉलो करतांना दिसतो. विराट आपल्या फिटनेस ला घेऊन देखील फार सजग असतो.

विराट अश्याच तऱ्हेने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम करत राहो आणि भारताचे नाव असंच उंचीवर नेत राहो याच माझी मराठी टीम कडून शुभेच्छा…!

लक्ष्य दया: तुमच्या जवळ विराट कोहली बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा विराट कोहली यांचे जीवन चरित्र  – Virat Kohli Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top