तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर

Vithabai Narayangaonkar

‘लाज धरा पाव्हणं जरा जना मनाची, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ १९८२ साली आलेल्या भामटा चित्रपटातील या लावणीतून तमाशा कलाकारांचा जीवनप्रवास किती संघर्षमय असतो हे आपल्याला दिसून येते.

पण पोटासाठी न नाचता कलेसाठी नाचणाऱ्या होत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई. तमाशा पटलावरील एक अजरामर नाव.

विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर याचे जीवन – Vithabai Narayangaonkar Information in Marathi

नाव: विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर
जन्म (Birthday): 1 जुलै 1935
गाव: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर
निधन: 15 जानेवारी 2002

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर बायोग्राफी – Vithabai Bhau Mang Narayangaonkar Biography in Marathi

विठाबाई यांचे पूर्ण नाव विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांचे वडिल व काका तमाशाचा फड चालवायचे. त्यांचा जन्म कलाकारांच्या घरात झाला होता. विठाबाईंनाही नृत्याची आवड असल्यामुळे बहिण केशरबाई यांच्या तालमीत त्या तयार झाल्यात.

त्यावेळी यात्रा १० ते १५ दिवस असायच्या आणि या यात्रेंमध्ये तमाशाचे फड लागत असत. विठाबाई रंगाने जरी सावळ्या असल्या तरी देखण्या होत्या. तमाश्यातील लावणी, वग इत्यादी कलाप्रकारांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

त्यावेळी तमाशाला आत्ता सारखं कलेच्या नजरेन पाहत नसत. पण तरीही विठाबाईनी तमाशा या कलाप्रकारावर जीवापाड प्रेम केले. त्यांचा एक प्रसंग तर कलेवर असणार त्यांचं प्रेम याचं एक जिवंत उदाहरणच आहे.

एकदा फडात विठाबाई गरोदर असतांनाही स्टेजवर नाचत होत्या आणि अचानक त्यांना बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या पण त्यांनी नाचणे सुरूच ठेवले आणि त्याचवेळी स्टेजच्या मागे जाऊन त्या बाळंत झाल्या बाळाची नाळ दगडाने ठेचून परत आल्या मुलगा झाल्याची बातमी देत पुन्हा नाचू लागल्या आणि त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना हात जोडत नाच थांबविण्याची विनंती केली. या प्रसंगातून विठाबाईंनी रसिकांच्या मनात आपले अढळस्थान निर्माण केले.

पुढे लावणी कलाप्रकारात आपले भरीव योगदान सुरूच ठेऊन या कलेला जिवंत ठेवण्यास हातभारच लावला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेले. नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या विठाबाई जीवनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये मात्र उपेक्षितच राहिल्या. आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांची परिस्थिती फार वाईट झाली होती. आजारपणात त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच १५ जानेवारी २००२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांना मिळालेले पुरस्कार – Achievement Vithabai Narayangaonkar

१९५७ आणि १९९० मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक मिळाले होते.

विठाबाईच्या नावाने देण्यात येणारे पुरस्कार – Vithabai Narayangaonkar Award

महाराष्ट्र शासनाने २००६ पासून त्यांच्या नावाने ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरु केला. दरवर्षी हा पुरस्कार लोककला, तमाशा क्षेत्रात भरीव कामगिरी, योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Vithabai Narayangaonkar

प्र. १. विठाबाईंचा जन्म कोठे झाला?

उ. विठाबाईंचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला.

प्र. २. विठाबाई कुठल्या कला प्रकाराशी संबंधित होत्या?

उ. विठाबाई तमाशा या कला प्रकाराशी संबंधित होत्या.

प्र. ३. विठाबाईंना १९५७ आणि १९९० साली कुठला पुरस्कार मिळाला?

उ. त्यांना राष्ट्रपती पदकाने पुरस्कृत करण्यात आले.

प्र. ४. विठाबाईंनी नृत्याची तालीम कुणाकडून घेतली?

उ. विठाबाईंनी नृत्याची तालीम त्यांची बहिण केशरबाई यांच्याकडून घेतली.

प्र. ५. महाराष्ट्र शासनाकडून तमाशा कलाप्रकारात भरीव कामगिरी व्यक्तींना कुठला पुरस्कार देण्यात येतो?

उ. ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ हा पुरस्कार देण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here