मोदिजींच्या वोकल फॉर लोकल अभियानाला खरे उतरत आहेत, महाराष्ट्रातील हे स्टार्ट-अप

Vocal For Local

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव चीन मधून सुरु झाला होता, काही लोकांचे असे म्हणणे होते कि कोरोनाला चीन ने स्वतः बनवून संपूर्ण जगामध्ये ह्या महामारीला पसरविले.

यांनतर भारत सरकार ने आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरु करत सुरक्षिततेच्या दृष्टीने चीन चे ५९ अ‍ॅप बॅन केले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “वोकल फॉर लोकल” आणि “लोकल टू ग्लोबल” असा संदेश देत देशाच्या जनतेला स्वदेशी वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर करायला सांगितले होते.

कारण आपण जर देशात बनविलेल्या वस्तूंचा वापर वाढवला तर देशातील पैसा देशातच राहणार, आणि देशातील लोकांना रोजगार मिळण्यास मदत होईल, मोदिजींच्या या विचारांना ऐकल्यानंतर देशातील बऱ्याच कंपन्यां आत्मनिर्भर अभियानाला चांगला प्रतिसाद देत देशातील वस्तूंना एक नवा बाजार देत लोकांपर्यंत त्या वस्तूंना पोहचवत आहेत.

भारताकडे खूप जास्त प्रमाणात सामर्थ्य आहे, आपण हे यावरून समजू शकता कि आपल्या देशात सुरुवातीला “N-95” मास्क आणि पीपीई कीट बनत नव्हते, पण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्या नंतर आपल्या देशात दिवसाला लाखो मास्क बनविल्या जात आहेत. यावरूनच आपण आपल्या देशाचे सामर्थ्य ओळखू शकतो.

देशात असेच १००% स्वदेशी वस्तूंचे निर्माण केल्या गेले आहे. आणि अनेक स्टार्टअप उदयास आले आहे, आपल्याला विचार आलेला असेल कि आजचा लेख असा का आहे तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो कि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही असे मराठमोळे स्टार्टअप आहेत जे “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” साठी तयार आहेत.

म्हणजेच चक्क आपल्या महाराष्ट्रातून विदेशात वस्तूंची निर्यात होईल. तर असेच महाराष्ट्राचे काही नवीन स्टार्टअप आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्यांच्या वर आपल्याला बऱ्याच वस्तूंची खरेदी करता येईल. आशा करतो आपल्याला हा लेख आवडणार आणि हे लोकल ब्रँड आपल्याला आंतराष्ट्रीय दर्जाच्या वस्तूंचा अनुभव देऊन जातील.

तर चला पाहूया असे काही नवीन स्टार्टअप.

मोदिजींच्या “वोकल फॉर लोकल” अभियानाला खरे उतरत आहेत, महाराष्ट्रातील हे स्टार्ट-अप – Vocal For Local

Vocal For Local
Vocal For Local

१) वाइस ट्रॉली – Wise Trolley

वाइस ट्रॉली हि एक महाराष्ट्रातील नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. हि कंपनी महाराष्ट्रात बऱ्याच वेळेपासून काम करत आहे, या कंपनीच्या वेब साईट वर आपल्याला कपड्यांची खरेदी करता येते, कपड्यांमध्ये आपल्या आवडतीचे प्रिंट केलेले टी-शर्ट, लेडीज आणि जेन्ट्स या दोन्ही प्रकारात मिळून जातात. सोबतच खरेदी  केलेले कपडे आपल्या घरापर्यंत आपल्याला फ्री शिपिंग मध्ये मिळून जातात.

या वेब साईट वर असलेले सर्व प्रोडक्ट हे स्वदेशी आहेत, आपल्यालाही कमी किमतीत चांगल्या दर्जाचे कपडे पाहिजे असतील तर आपण या https://wisetrolley.com/ वेबसाईट वर जाऊन खरेदी करू शकता.

२) ओर्गानिको – Organico

ओर्गानिको हे सुद्धा एक महाराष्ट्रीयन ब्रँड आहे. या स्टार्टअप ला सोलापूरच्या पूजा कौल ने सुरु केले होते, या स्टार्टअप मध्ये तिने गाढवाच्या दुधापासून बनलेले साबण तयार केलेले आहे, त्यांचा असा दावा आहे कि गाढवाच्या दुधात ते सर्व विटामिन असतात जे आपल्या शरीराला आवश्यक तर असतातच आणखी ते शरीराची त्वचा मऊ ठेवतात. यांचे प्रोडक्ट सुद्धा आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता, हा स्टार्टअप २०१७ पासून सुरु केलेला आहे.

यांच्या या https://organiko.in/  वेब साईट वर जाऊन आपण त्यांचे प्रोडक्ट विकत घेऊ शकता.

३) पेरीउर्जा – Periurja

पेरीउर्जा हा सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील एक स्टार्टअप आहे जो सोलर एनर्जी वर काम करतो आहे. या स्टार्टअप मध्ये आपल्याला सोलर विषयीचे प्रोडक्ट मिळून जातील. हि कंपनी मुंबई च्या परेल भागात आहे. या कंपनीचे सोलर प्लांट खूप लोकांनी वापरले आहे आणि त्याचे रिव्यू सुद्धा दिलेले आहेत.

या कंपनीविषयी अधिक माहिती साठी आपण त्यांच्या या http://periurja.com/ वेबसाईट वर जाऊन त्यांच्या विषयी माहिती मिळवू शकता.

४) नेचर बास्केट – Nature Basket

नेचर बास्केट हि सुद्धा महाराष्ट्रातील एक कंपनी आहे जी मुंबई मध्ये स्थित आहे, आणि हि कंपनी सुद्धा ऑनलाईन प्रोडक्ट घरपोच देण्याचे कार्य करते. यामध्ये आपल्याला बरेचशे प्रोडक्ट पाहायला मिळतील, बेकरीचे प्रोडक्ट तसेच घरघुती आवश्यक असणारे प्रोडक्ट सुद्धा यांच्या वेब साईट वर उपलब्ध आहेत.

आपल्याला यांच्या विषयी आणखी माहिती साठी आपण https://www.naturesbasket.co.in/ या वेब साईट वर जाऊन माहिती घेऊन जाऊ शकता.

५) एको जनरल इन्शुरन्स – Acko General Insurance

एको जनरल इन्शुरंस हि एक इन्शुरंस कंपनी आहे. हि कंपनी सुद्धा महाराष्ट्रातीलच आहे, २०१६ पासून हि कंपनी त्यांची सर्विस देत आहेत. ज्याप्रमाणे आपण इतर इन्शुरंस काढतो त्याचप्रमाणे या कंपनीच्या माध्यमातून आपण आपल्या वाहनाचे म्हणजेच बाईक, कार, किंवा टैक्सी सोबतच हेल्थ इन्शुरंस सुद्धा उपलब्ध आहे. या कंपनीचे ऑफिस आपल्याला गोरेगाव इस्ट मध्ये भेटून जाणार, आतापर्यंत या कंपनीचे  एकूण ग्राहक ४.५ कोटी झाले आहेत,

या कंपनी विषयी अधिक माहिती साठी आपण या https://www.acko.com/ वेब साईट वर जाऊन भेट देऊ शकता.

आशा करतो आपल्याला या लेखाची थोडीफार मदत होईल, आपण स्वदेशी गोष्टींना पुढे करत जगात मोठे होऊ शकतो, हा लेख आवडला असेल तर आम्हाला कळवा, आपल्याला असे लेख आवडत असतील तर आम्ही आपल्यासाठी असे आणखी काही लेख घेऊन येऊ, त्याचसोबत आपल्याला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल ते सुद्धा कळवा, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top