वैनगंगा नदीची माहिती

Wainganga Nadi

मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमधील छिंदवाडा या ठिकाणी वैनगंगा नावाची प्रसिद्ध नदी उगम पावते.

वैनगंगा नदीची माहिती – Wainganga River Information in Marathi

Wainganga River Information in Marathi
Wainganga River Information in Marathi
नदीचे नाव वैनगंगा
राज्य महाराष्ट्र
उगमस्थान मैकल पर्वतरांगा, जि. शिवणी, मध्यप्रदेश
लांबी 569 कि.मी.
उपनद्या कन्हान, अंधारी, चुलबन, खोब्रागडी ई.
नदीवरील प्रकल्प गोसेखुर्द, ता. पवनी, जि. भंडारा (महाराष्ट्र)

मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवणी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत वैनगंगा नदीचा उगम आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ भागातून वाहणारी ती एक महत्त्वाची मोठी नदी आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून ती वाहते.

उगमानंतर ती दक्षिणवाहिनी होते. मध्य प्रदेशातून ती महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यात वाहत येते. येथे तिला ‘बावनथरी’ नावाची एक उपनदी येऊन मिळते.

पुढे नागपूर जिल्ह्यातून वाहत येणारी कन्हान नावाची प्रमुख उपनदी तिच्या प्रवाहात सामील होते. शिवाय ‘चुलबन’ नावाची आणखी एक उपनदीही तिला येऊन मिळते.

नागपूर जिल्ह्यातील आंभोरा याठिकाणी ‘वैनगंगा’, ‘कन्हान’ आणि ‘आंब’ या नद्या एकत्र येऊन सुंदर असा त्रिवेणी संगम झालेला पाहावयास मिळतो.

त्यानंतर पुढे वाहणाऱ्या वैनगंगेस पश्चिम बाजूकडून ‘वर्धा’ नावाची नदी तीला येवून मिळते. यानंतर वैनगंगा-वर्धा संगमानंतर हा प्रवाह प्राणहिता या नावाने पुढे प्रवाहित होतो.
प्राणहिता गोदावरीला जाऊन मिळते.

वैनगंगेच्या खोऱ्याने मोठा प्रदेश व्यापला आहे. वैनगंगेच्या खोऱ्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा प्रदेश येतो. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गोंड आदिवासी जमाती वास्तव्याला आहेत.

त्यांचे संपूर्ण जीवनच निसर्गावर अवलंबून आहे. म्हणूनच वैनगंगा नदी ही त्यांच्या जीवनाचा मोठा आधार आहे.

गोसेखुर्द हा महाराष्ट्रातील एक मोठा प्रकल्प वैनगंगा नदीवरच बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 250800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

वैनगंगा नदीच्या पाण्याचा उपयोग अनेक भागांना झाला आहे. वैनगंगेचे खोरे आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्धी पावले आहे. नवेगाव, शिवनी, घोडाझरी, असोलमेंढा, चोरखमारा आणि बांदलकसा हे मोठे तलाव वैनगंगेच्या खोऱ्यातच आढळून येतात.

‘नवेगाव’ आणि ‘ताडोबा’ या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने असून ती पर्यटकाची आवडती सहलीची ठिकाणे बनली आहेत. वैनगंगेच्या पाण्याचा उपयोग अनेक गावांना झाला आहे.

गडचिरोली, भंडारा, अंभोरा ही व्यापार-उदीमाची प्रमुख केंद्रे वैनगंगेच्या खोऱ्यातच उदयास आली आहेत.

अशा प्रकारे वैनगंगा नदीने विदर्भाच्या पूर्व भागाची तहान भागवून तेथील विकासाला हातभार लावण्याचे कार्य केले आहे.

वैनगंगा नदीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Wainganga River 

प्रश्न. वैनगंगा नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवणी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत वैनगंगा नदीचा उगम आहे.

प्रश्न. वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वाहते?

उत्तर: महाराष्ट्राच्या विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून वाहते.

प्रश्न. नागपूर जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी वैनगंगा, कन्हान, आंब या तीन नद्यांचा संगम आहे?

उत्तर:  नागपूर जिल्ह्यातील आंभोरा या ठिकाणी.

प्रश्न. वैनगंगेला वर्धा नदी मिळाल्यावर पुढे हा प्रवाह कोणत्या नावाने ओळखल्या जातो?

उत्तर: प्राणहिता.

प्रश्न. वैनगंगेवर बांधण्यात आलेल्या एका मोठ्या प्रकल्पाचे नाव काय आहे व तो कोठे आहे?

उत्तर:  ‘गोसेखुर्द’ ता. पवनी, जि. भंडारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top