Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भंडारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Bhandara District

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा! तलावांचा जिल्हा अशी या शहराची ओळख, जवळपास 3,648 लहान मोठी तळी या शहरात आहेत.

तलावांचा जिल्हा जशी या शहराची ओळख तसच हा जिल्हा ओळखला जातो तो सुगंधी तांदुळासाठी! मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन या जिल्हयात घेतले जात असुन सुगंधी तांदुळाचे विपुल प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

भंडारा जिल्हाची संपूर्ण माहिती – Bhandara District Information In Marathi

Bhandara District Information in Marathi

महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य भागात हा जिल्हा वसलेला आहे. भंडारा जिल्हयाच्या उत्तरेला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा पुर्वेकडे गोंदिया दक्षिणेला चंद्रपुर आणि पश्चिमेला नागपुर जिल्हा आहे.

वैनगंगा ही या जिल्हयातील मुख्य नदी असुन तीचा प्रवाह अगदी उन्हाळयात देखील कोरडा पडत नाही.

तांबे या धातुचे उत्पादन या जिल्हयात मोठया प्रमाणात होत असल्याने या शहराला ‘ब्रास सिटी’  देखील म्हंटल्या जाते.

भंडारा जिल्हयातील तालुके – Bhandara District Taluka List

  1. भंडारा
  2. साकोली
  3. तुमसर
  4. पवनी
  5. मोहाडी
  6. लाखनी
  7. लाखांदुर

भंडारा जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Bhandara District Information

लोकसंख्या 12,00,334

क्षेत्रफळ 3,716 वर्ग कि.मी.

1000 पुरूषांमागे 979 स्त्रिया

राष्ट्रीय महामार्ग 6 या शहरातुन गेला आहे.

सुगंधी तांदुळ आणि तांबे या उत्पादनाकरता हा जिल्हा ओळखला जातो.

येथील मुख्य व्यवसाय शेती असुन शेती आणि जंगलांपासुन मिळणा.या उत्पन्नावर येथील अर्थव्यवस्था अवलंबुन आहे.

बावनथडी, चुलबंद, कन्हान, बाघ, आणि गोसे धरण ही या जिल्हायातील धरणं आहेत

चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या तांदळाच्या सुगंधी जाती विशेषतः भंडारा जिल्हयात होतात.

तलावांचा जिल्हा म्हणुन देखील हा जिल्हा प्रसिध्द आहे इतके तलाव महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात नाहीत.

ऑर्डनंस् फॅक्ट्री या जिल्हयात असल्याने देखील या शहराला एक वेगळं महत्व आहे.

भारतीय सशस्त्र बलाकरता तेथे दारूगोळा बनवण्यात येतो.

पर्यटनस्थळं – Tourist Places In Bhandara District

  1. श्री भृशुंड गणेश मंदीर
  2. उमरेड कहरंदला अभयारण्य
  3. पवनराजे किल्ला
  4. अंबागड किल्ला
  5. कोरंभी देवी मंदीर
  6. इंदिरा सागर प्रकल्प

अंबागड किल्ला – Ambagarh Fort

भंडारा जिल्हयातील तुमसर तालुक्यातील हा अंबागड किल्ला तुमसर पासुन सुमारे 13 कि.मी. लांब आहे. या किल्ल्याचे निर्माण 1700 व्या शतकात देवगाध चे शासक बखबुलंद शाह यांच्या राजा खान पठाण यांनी केले होते त्यांनतर हा किल्ला नागपुर चे राजा रघुजी भोसले यांच्या ताब्यात आला. त्यांनी याचा उपयोग कैद्यांकरता जेल च्या रूपात केला त्यानंतर ब्रिटीशांनी हा किल्ला हस्तगत केला.

इंदिरा सागर प्रकल्प (गोसेखुर्द) – Indira Sagar Gosikhurd Dam

इंदिरा सागर प्रकल्प ज्याला गोसेखुर्द धरण म्हणुन देखील ओळख आहे. या धरणाचे भुमीपुजन तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी 23 ऑक्टोबर 1984 रोजी केले होते.

नागपुर भंडारा आणि चंद्रपुर जिल्हयातील शेती ओलीताखाली यावी याकरता या धरणाची निर्मीती करण्यात आली.  सध्या या पाण्यामुळे येथील शेतीला तर फायदा झालाच आहे शिवाय या पाण्यावर वीजनिर्मीती देखील केली जात आहे.

या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील गावांजवळ वैनगंगा नदीवर सुमारे 11.35 कि.मी. लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. यामुळे भंडारा नागपुर आणि चंद्रपुर जिल्हयातील सुमारे 2,50,800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

श्री भृशुंडी गणेश मंदीर – Bhrushund Ganesh Temple

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री भृशुंडी गणेशाचे मंदीर एक पावन तिर्थस्थळ आहे. अतिशय प्राचीन अश्या या विनायकाचे नाव भृशुंड ऋषींमुळे पडले आहे. एका मोठया वडाच्या झाडाखाली ऋषींचा आश्रम होता, ऋषी भगवान गणेशाचे निस्सिम भक्त होते.

आज या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनाकरता गर्दी करतात. या मंदीराव्यतीरिक्त हनुमानाचे आणि महादेवाचे देखील मंदीर या ठिकाणी आहे प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भाविक दुरदुरून या ठिकाणी भेट देतात.

नवसाला पावणारा अशी या विनायकाची ख्याती सर्वदुर पसरली आहे. या ठिकाणी भेट द्यायची असल्यास सर्व वाहनसुविधा उपलब्ध आहे.

उमरेड कहरंदला अभयारण्य – Umred Karhandla Abhayaranya

नागपुर पासुन साधारण 58 कि.मी. आणि भंडा.यापासुन 60 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य वसलेले असुन निसर्ग सौंदर्याने मुक्त हस्ते उधळण केल्याने पर्यटकांची नेहमीच इथे गर्दी पहायला मिळते.

हे ठिकाण वाघांच्या प्रजनना करता सुरक्षीत केल्याने इथे वाघांची संख्या देखील गेल्या काही दिवसांमधे वाढलेली आढळुन आली आहे.  दुर्लभ आणि नामशेष होत चाललेल्या प्रजाती देखील इथल्या सुरक्षीत आणि प्राकृतिक वातावरणात वाढलेल्या आढळतात.

वैनगंगा नदीच्या किना.याला लागुन असलेले हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला देखील जोडलेले आहे.  या ठिकाणाला भेट देण्याचे जर तुमच्या मनात असेल तर राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस इथे येण्याकरता उपलब्ध असतात आणि शिवाय खाजगी वाहनाने देखील इथे पोहोचता येते.

कोरंभी देवी मंदीर – Pingleshwari Devi Temple

भंडा.याचे ग्रामदैवत पिंगेश्वरी देवी! वैनगंगा नदीच्या तिरावर वसलेली ही देवी बोम्बलेश्वरी देवीचे प्रतिरूप असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

भंडारा शहरापासुन अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर विराजमान झालेली ही देवीची मुर्ती 400 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं.

एकाच शिळेपासुन देवीची मुर्ती तयार झाल्याचे बोलले जाते. चैत्र नवरात्रात देवीची मोठी जत्रा भरते त्यावेळी भाविकांची मोठया प्रमाणात या यात्रेला गर्दी झालेली पहायला मिळते. मंदीर उंच डोंगरावर वसलेले असुन जवळपास 251 पाय.या चढुन मंदीरात पोहोचता येतं.

देवी शिवपींडीवर विराजमान असल्याने तिचे नाव पिंगलेश्वरी पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवी पुर्वाभिमुखी असुन सुर्याचे पहिले किरण देवीच्या मुखावर पडत असल्याचे सांगितले जाते.

देवीची मुर्ती इतकी पुरातन असुन नेमकी देवीची मुर्ती किती काळ आधीची आहे हे नेमके कुणालाही ठाउक नाही. जे भाविक छत्तीसगड राज्यात उंच टेकडीवर वसलेल्या बोंबलेश्वरी देवीचे दर्शन घेउ शकत नाहीत त्यांच्याकरता ही देवी खुप महत्वाची मानली जाते.

छत्तीसगढ राज्यातुनही मोठया संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात.

भंडारा शहराला लागुन असल्याने सर्व वाहन व्यवस्था या ठिकाणी येण्याकरता उपलब्ध आहे.

महासमाधी भुमी – Mahasamadhi Bhumi Bhandara

महासमाधी भुमी ची निर्मीती पवनी तालुक्यात 1987 ला केली गेली. पवनी एक प्राचीन ठिकाण असुन सम्राट अशोक यांच्या काळापासुन बौध्द संस्कृतीच्या मुख्य केंद्रांपैकी एक आहे, बौध्द धर्माच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीकरता याची निर्मीती करण्यात आली.

दरवर्षी महासमाधी भुमीच्या धम्म मोहोत्सवाकरता लोक मोठया संख्येने एकत्र येतात. या ठिकाणी वैनगंगा नदीच्या तिरावर महासमाधी भुमी महास्तुपाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2007 ला करण्यात आले. या उद्घाटना प्रसंगी उत्सवात सहभागी होण्याकरता बौध्द भिक्खु आणि देशविदेशातुन नामवंत व्यक्तिमत्व आले होते. ही महासमाधी भुमी बौध्द मुर्तीकलेचा एक उत्तम नमुना आहे.

Previous Post

नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी

Next Post

चंद्रपुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Chandrapur District Information in Marathi

चंद्रपुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Dasara Information in Marathi

विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाबद्दल संपूर्ण माहिती

Vajan Kami Karayche Upay Marathi

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

Cycle Information in Marathi

तुम्हाला माहिती आहे? काय आहे सायकल चा इतिहास

Nashik District Information in Marathi

नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved