जाणून घ्या १२ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 12 August Dinvishes

मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिन हा संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेला जागरूकता दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे उद्दीष्ट म्हणजे गरीबी संपुष्टात आणण्यासाठी आणि टिकाऊ विकासाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी युवकांच्या भूमिकेविषयी चर्चा करणे. याची सुरुवात सन १२ ऑगस्ट २००० सालापासून करण्यात आली.

याशिवाय, आज आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती तसचं निधन वार्ता आणि त्यांचे कार्य इत्यादी घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १२ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 12 August Today Historical Events in Marathi

12 August History Information in Marathi
12 August History Information in Marathi

१२ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 August Historical Event

 • इ.स. १८३३ साली अमेरिकेतील शिकागो शहराची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १८५१ साली आयझॅक सिंगर(Isaac Singer) यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
 • इ.स. १९०८ साली हेनरी फोर्ड यांच्या कार कंपनीने पहिल्या आपल्या पहिल्या गाडीचे मॉडल तयार केले.
 • सन १९२० साली शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरु केले.
 • सन १९२२ साली राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास चार वर्षानंतर त्यांनी लिहिलेल्या ‘राजसंन्यास’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
 • सन १९४२ साली चाले जाव चळवळीच्या वेळी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार करण्यात आला होता त्यात सुमारे दोन नागरिक ठार तर सोळा जन जखमी झाले होते.
 • सन १९८९ साली कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे पार पडली.
 • सन १९९८ साली भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना ‘राजीव गांधी खेलरत्न‘ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१२ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८०१ साली इंग्लंड येथील चॉकलेट व्यवसाय कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी(John Cadbury) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८१ साली अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल बी डीमिल(Cecil B. DeMille) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८७ साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन-आयरिश भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्रॉडिंगर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९२ साली प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व ग्रंथपाल एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन.
 • सन १९१९ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतराळ संस्थेचे जनक, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मदिन.
 • सन १९२४ साली पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख व माजी सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्मदिन.
 • सन १९४८ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, कवी, समिक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी उर्फ फ.मुं. शिंदे यांचा जन्मदिन.
 • सन १९५९ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बुद्धिबळ पटू प्रवीण ठिपसे यांचा जन्मदिन.

१२ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९४५ साली थेओसोफिकल सोसायटीचे अध्यक्ष व लिबरल कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू भारतीय इंग्रजी क्रांतिकारक जॉर्ज सिडनी अरुंडेल(George Arundale) यांचे निधन.
 • सन १९६४ साली जेम्स बाँड मालिका आणि गुप्तचर कादंबऱ्याकरिता प्रसिद्ध असणारे ब्रिटीश लेखक, पत्रकार आणि नौदल बुद्धिमत्ता अधिकारी इयान फ्लेमिंग(Ian Fleming) यांचे निधन.
 • सन १९७३ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचे निधन.
 • सन १९८२ साली अमेरिकन चित्रपट अभिनेता हेनरी फोंडा(Henry Fonda) यांचे निधन.
 • सन १९८२ साली प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ञ व हिंदी साहित्यकार भागवत शरण उपाध्याय यांचे निधन.
 • सन २००५ साली श्रीलंकन तमिळ वकील व राजकारणी तसचं, श्रीलंकेचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री लक्ष्मण कादीरगिर यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top