Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

14 April Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा आपण सर्वांकरिता खूप अभिमानाचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी सन १८९१ साली भारतीय संविधानाचे निर्माते व रचनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या जीवनांत अनेक सामाजिक कामे केली आहेत. बाबासाहेब हे स्त्रिया, शेतकरी, शेतमजूर तसचं, दलितांचे कैवारी होते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावे याकरिता त्यांनी अनेक चळवळी केल्या. तसचं, दलितांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. शिवाय शेतकरी, शेतमजूर व श्रमजीवी यांच्याकरिता ते खंबीरपणे लढले. अश्या या महामानवाचा आज जन्मदिन.

तसचं, आज अग्निशमन सेवा दिवस देखील आहे. सन १९४४ साली व्हिक्टोरीया डॉक मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे स्फोटक वाहून आणणाऱ्या जहाजास आग लागली होती. ही आग इतकी मोठी होती कि, ती विझवित असतांना मंबई अग्निशमन दलाचे जवान व काही अधिकारी शहिद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपुर्ण भारतात अग्निसेवा दिन व सप्ताह पाळण्यात येतो.

जाणून घ्या १४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 14 April Today Historical Events in Marathi

14 April History Information in Marathi

१४ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –14 April Historical Event

  • इ.स. १६६१ साली प्रिन्स सेसि या शास्त्रज्ञानी सर्वप्रथम दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
  • सन १६६५ साली मुघल शासक औरंगजेब यांचे सेनापती दिलेरखान यांनी दिलेल्या पुरंदरच्या वेढ्यामध्ये वज्रमाळ हा किल्ला जिंकला.
  • इ.स. १७३६ साली मराठा साम्राज्याचे सेनापती चिमाजी आप्पा पेशवे यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
  • सन १९१२ साली ब्रिटीश प्रवासी जहाज आर.एम.एस. टायटॅनिक संध्याकाळी हिमशैलला धडकले आणि उत्तर अटलांटिकच्या बर्फाच्छादित पाण्यात बुडले. त्या जहाजातील सुमारे २,२२३ प्रवासी आणि क्रू मेंबर्समधील जवळपास 1,517 व्यक्ती ठार झाले.
  • इ.स. २००८ साली भारतातील कोलकत्ता व बांगलादेशाची राजधानी ढाका या दोन देशादरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
  • सन २०१० साली पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड आणि बिहार राज्यात आलेल्या चक्रवर्ती वादळामुळे सुमारे १२३ लोकांचे निधन झाले.

१४ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६७५ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम भोसले यांच्या दुसऱ्या पत्नी राणी ताराबाई भोसले यांचा जन्मदिन.
  • सन १८३३ साली व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता रॉस लोव्हिस मंगल्स व्हीसी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९१ साली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक तसचं, दलित चळवळीचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन.
  • सन १८९८ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारमधील प्रसिद्धी व प्रचार प्रमुख सुब्बीर अप्पादुराई यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०७ साली भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रारंभिक नेते व माजी सरचिटणीस पूरणचंद जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली सरोद वाजवण्याच्या कलेत प्रगत असलेल्या मैहर घराण्यातील भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व सरोद वादक अली अकबर खान यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३३ साली सर्जनशील कला अकादमीचे संस्थापक-प्राचार्य अनिल कुमार दत्ता यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली महाराष्ट्रीयन विनोदी कवी आणि पटकथा लेखक तसचं, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५७ साली भारतीय मल्याळम स्त्रीवादी लेखिका आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९५७ साली भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष तसचं, विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे माजी संचालक कैलासावादिव शिवन यांचा जन्मदिन.

१४ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –14 April  Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९५० साली विसाव्या शतकातील महान संत आणि समाजसेवक ऋषी रमण महर्षी यांचे निधन.
  • इ.स. १९६२ साली भारतरत्न सन्मानित भारतातील महान अभियंता व राजनेता मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे निधन.
  • सन १९६३ साली भारतीय प्रवास प्रवासी साहित्याचे जनक व हिंदीचे प्रमुख साहित्यकार राहुल सांकृत्यायन यांचे निधन.
  • इ.स. १९९८ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक, छायाचित्रकार व पटकथालेखक नितीन बोस यांचे निधन.
  • सन २०१३ साली भारतीय आरपीजी समूहाचे संस्थापक, अध्यक्ष व उद्योगपती राम प्रसाद गोयंका यांचे निधन.
Previous Post

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू राहतील देशातील ह्या सुविधा

Next Post

मधुमेह आहे म्हणून काय झालं? तरीही हरवू शकलो कोरोनाला.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
This Person with Diabetes Overcomes Corona

मधुमेह आहे म्हणून काय झालं? तरीही हरवू शकलो कोरोनाला.

Thanks for Birthday Wishes in Marathi

धन्यवाद करण्यासाठी सुंदर मराठी Thank you Message

15 April History Information in Marathi

जाणून घ्या १५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Way to Spend Your Time in Lockdown

५ गोष्टींना फॉलो करा लॉक डाऊन चा कंटाळा येणारच नाही

16 April History Information in Marathi

जाणून घ्या १६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved