जाणून घ्या १६ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 16 July Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहासकाळात आपल्या भारत देशांत घालेल्या एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. ब्रिटीश कालीन भारतात विधवा विवाह प्रथा होती. आपल्या देशांतील विधवा महिलांना दुसर लग्न करण्याचा कोणताच अहिकार नव्हता. तसचं, त्यांच्यावर अनेक प्रकारचे शारीरिक तसेच, मानसिक अन्याय देखील होत असत. त्यांच्याविरुद्ध कोणीही काही करू शकत नव्हत. त्यांना मानवी समाजात अशुभ मानलं जात असे.

परंतु, कालांतराने काही थोर विचारांच्या भारतीय समाजसुधारकांनी यावर बंदी घालण्यास पुढाकर घेतला. त्यापैकीच एक ईश्वरचंद विद्यासागर हे देखील होत. त्यांनी देशांत हिंदू विधवा विवाहास समाजात स्थान मिळवून देण्यास पुढाकार घेतला. या विधवा विवाह प्रथेला प्रोत्साहण देण्यासाठी त्यांनी स्वत: आपल्या मुलाचे लग्न एका विधवा महिलेशी लावले.

त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे सन १६ जुलै १८५६ साली देशांतील हिंदू विधवा विवाह प्रथेवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली. याशिवाय, आज महात्मा गांधी यांच्या अनुयायी व भारत छोडो आंदोलनाच्या सदस्या अरुणा असफ अली यांचा जन्मदिन. अरुणा असफ अली यांना लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.

जाणून घ्या १६ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 16 July Today Historical Events in Marathi

16 July History Information in Marathi
16 July History Information in Marathi

१६ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 July Historical Event

 • इस. पूर्व ६२२ साली मुस्लीम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांनी मके वरून मादिनाला प्रयाण केलं. या दिवसापासून चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडर ची सुरुवात झाली.
 • सन १९४५ साली अमेरिकेने आपल्या पहिल्या अणुबॉम्ब ची चाचणी केली.
 • सन १९५१ साली ब्रिटन देशाने नेपाल देशाला स्वतंत्र घोषित केलं.
 • सन १९८१ साली भारताने अणुबॉम्ब ची चाचणी केली.
 • सन १९९२ साली भारताच्या राष्ट्रपती पदी डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी यांनी उपराष्ट्रपती पद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद देखील भूषविल होत.
 • सन १९९८ साली गुजरात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे नाव सुद्धा लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
 • सन २००६ साली संयुक्त राष्ट्र परिषदेने कोरिया राष्ट्रावर बंदी घालण्याच्या ठरावास मंजूरी दिली.
 • सन २००७ साली बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना वाजीद यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी कैद करण्यात आलं.

१६ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७२३ साली सुप्रसिद्ध युरोपियन चित्रकार व रॉयल अकॅडमीच पहिले अध्यक्ष व्यंगचित्रकार सर  जोशुवा रेनाल्ड्स(Joshua Reynolds ) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९६ साली नॉर्वे देशांतील प्रसिद्ध राजकीय राजकारणी, कामगार नेते सरकारी अधिकरी व लेखक तसचं, संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस ट्रिग्वे हलवदान ली यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली महात्मा गांधी यांच्या भारत छोडो चळवळीच्या वेळेला मुंबई येथिल गोवालिया टँक मैदानावर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकविनाऱ्या महान राजकीय क्रांतीकारक व शिक्षणतज्ञ अरुणा असफ अली यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली दक्षिण भारतातील ज्योतिर मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा, लोककथा, व बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद इत्यादी साहित्याचे लिखाण करणारे महान विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी उर्फ वा. कृ. चोरघडे यांचा जन्मदिन.
 • सन १९१७ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथुर यांचा जन्मदिन.
 • सन १९६८ साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा जन्मदिन.
 • सन १९८३ साली ब्रिटीश वंशीय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्मदिन.

१६ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 July Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८८२ साली अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन(Abraham Lincoln) यांच्या पत्नी मेरी टॉड लिंकन(Mary Todd Lincoln) यांचे निधन.
 • सन १९८४ साली महाराष्ट्राच्या सीकेपी संघटनेतील थोर इतिहासकार आणि लेखक तसचं, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रा प्रती महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळविणारे वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे निधन.
 • सन १९९३ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रामपूर-सहास्वन घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद निसार हुसैन खान यांचे निधन.
 • सन १९९४ साली नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्विन्गर(Julian Schwinger) यांचे निधन.
 • सन २००५ साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक नाटककार आणि निनासम धर्म संस्था संस्थेचे संस्थापक के. वी. सुबन्ना यांचे निधन.
 • सन २००९ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कर्नाटिक संगीतकार व तमिळ चित्रपट पार्श्वगायिका दमल कृष्णस्वामी पट्टममल यांचे निधन.
 • सन २०१३ साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसचं,  सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक-संचालक बरुण डी यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here