जाणून घ्या १७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 17 September Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवस हा त्या त्या दिवशी घडलेल्या घानेचा साक्षीदार असतो. इतिहास काळात तसचं आधुनिक युगात जगताना विविध घटना घडत असतात. कालांतराने त्या घटना कालाबाधित होतात आणि त्या घटनांच आपण इतिहास असे म्हणतो. अश्याच प्रकारच्या काही घटना आजच्या दिवशी देखील घडल्या आहेत आणि त्याच घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 17 September Today Historical Events in Marathi

17 September History Information in Marathi
17 September History Information in Marathi

१७ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 September Historical Event

  • सन १९४८ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामशाहीतील हैद्राबाद हे संस्थान भारतात विलीन झाले.
  • सन १९४९ साली दक्षिण भारतातील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कझागम (द्रमुख) पक्षाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९७० साली जॉर्डन मध्ये गृह युद्धाला सुरुवात झाली.
  • सन १९७६ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपली पहिली अंतरीक्ष कक्षा (स्पेस शटल) ‘द एन्टर प्राईज’ चे जगासमोर प्रदर्शन केले.
  • सन २००६ साली जर्मन देशांत आयोजित हॉकी विश्वकपच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ४-३ च्या फरकाने नमवून विश्वकप आपल्या नावे केला.
  • सन २०१७ साली भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. वी. सिंधू ही कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

१७ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७९ साली  भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी तसचं, ‘द्रविड चळवळीचे जनक’ पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८२ साली ब्रिटीश कालीन भारतातील महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ‘हिंद महिला समाज’ च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८५ साली भारतात अस्पृश्यता, बालविवाह आणि हुंडा यांसारख्या अंधश्रद्धा आणि सामाजिक दुष्कृत्यांविरूद्ध मोहीम राबविणारे महान समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली अमेरिकन उद्योजक व उद्योगपती तसचं, मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली श्रीलंकेचे माजी पंतप्रधान व श्रीलंकेचे दुसरे राष्ट्रपती पद सांभाळणारे राजकारणी जे. आर. जयवर्धने यांचा जन्मदिन.
  • सन १९१४ साली बाटा शु कंपनीचे मालक थॉमस जे. बाटा यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली भारतातील सर्वोत्कृष्ट पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम. एफ. हुसैन यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली भारतीय क्रिकेटपटू व फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांचा जन्मदिन.

१७ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९५३ साली भारतीय तामिळ अभ्यासक, निबंध लेखक आणि कार्यकर्ते तिरू. वी. कल्याणसुंदरम यांचे निधन.
  • सन १९९९ साली भारतीय चित्रपट गीतकार व हिंदी आणि उर्दू भाषिक कवी हसरत जयपुरी यांचे निधन.
  • सन २००२ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी व संगीतकार वसंत बापट यांचे निधन.
  • सन २००५ साली प्रसिद्ध भारतीय कथकली संगीतकार कलामंडलम हरिदास यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top