जाणून घ्या १९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 19 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी देश विदेशात घडलेल्या ऐतिहासिक तसचं आधुनिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महान व्यक्ती तसचं, निधन वार्ता याबद्दल माहिती या लेखाच्या माध्यमातून ग्रहण करणार आहोत.

जाणून घ्या १९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 19 September Today Historical Events in Marathi

19 September History Information in Marathi
19 September History Information in Marathi

१९ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 September Historical Event

 • इ.स. १८९३ साली न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
 • सन १९५२ साली विनोदी कलाकार चार्ली चैप्लिन यांना अमेरिकेत येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध देश विरोधी भावनाला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावण्यात आला.
 • सन १९५७ साली अमेरिकेने पहिल्यांदा नेवादा येथील वाळवंटी भागात भूमिगत अणुबॉम्बची चाचणी केली.
 • सन १९८५ साली मेक्सिको देशांत झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे सुमारे दहा हजार लोक मृत्युमुखी पडले होते.
 • सन २००० साली भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू करनाम मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या.
 • सन २००१ साली महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर.
 • सन २००७ साली भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू युवराजसिंग हे टी -20 क्रिकेट स्पर्धेत एका षटकात सहा षटकार ठोकणारे पहिले क्रिकेटपटू ठरले.

१९ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन सूर्य नमस्कार आणि वैदिक मूल्यांचे समर्थक, लेखक व स्वाध्याय मंडळाचे संस्थापक पंडित श्रीपाद दामोदर सातवलेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९१७ साली महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या पहिल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष, उत्तम साहित्यिक प्रकाशक व कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्मदिन
 • सन १९२७ साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्याचे कवी कुँवर नारायण यांचा जन्मदिन.
 • सन १९५८ साली भारतीय हिंदी चित्रपट गायक-गीतकार, संगीतकार आणि अभिनेता लकी अली यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन अंतराळ यात्री सुनिता विलियम्स यांचा जन्मदिन.
 • सन १९७७ साली भारतीय क्रिकेट भाष्यकार आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांचा जन्मदिन.

१९ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 September Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १८८१ साली अमेरिकेचे 20 वे अध्यक्ष जेम्स अब्राहम गार्फ़ील्ड(James Abram Garfield) यांचे निधन.
 • सन १९३६ साली  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लेखक करणारे महान भारतीय संगीतज्ञ व हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक तसचं,  संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन.
 • सन १९९२ साली महाराष्ट्रीयन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, व साहित्यिक ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे यांचे निधन.
 • सन २००४ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन.
 • सन २००७ साली महाराष्ट्रीयन मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीतकार डी. डी. उर्फ दत्तात्रेय शंकर डावजेकर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here