जाणून घ्या ३० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

30 August Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवसाला त्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनेमुळे विशेष महत्व प्राप्त होत असते. भूतकाळात आजच्या दिवशी ज्या घटना घडून गेल्या त्यांनाच आपण इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना म्हणतो. चला तर मग आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडल होत याची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया.

जाणून घ्या ३० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 30 August Today Historical Events in Marathi

30 August History Information in Marathi
30 August History Information in Marathi

३० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 August Historical Event

  • इ.स. १६५९ साली मुघल शासक औरंगजेब यांनी आपला मोठा भाऊ दारा शिकोह यांना फाशी दिली.
  • सन १९२८ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य लीग ची स्थापन करण्यात आली.
  • सन १९८४ साली अमेरिकन अंतराळ यान डिस्कव्हरी ने पहिल्यांदा अवकाशात भरारी केली.
  • सन २००९ साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान-१ मोहीम ही औपचारिकरित्या समाप्त केली.

३० ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १५५९ साली मुघल सम्राट अकबर यांचा मुलगा जहांगीर ४ यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७१ साली अणुचा शोध लावणारे महान ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व नोबल पारितोषिक विजेता अर्नेस्ट रुदरफोर्ड(Ernest Rutherford) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८३ साली भारतातील योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,‘कैवल्यधाम’ योगशिक्षण संस्थेचे संस्थापक व “योग मीमांसा” या त्रीमासिक मासिकाचे प्रकाशक स्वामी कुवलयानंद यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी भाषिक लेखक व कादंबरीकार भगवती चरण वर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९०४ साली प्रख्यात भारतीय व्यावसायिक व उद्योगपती ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष नोएल नवल टाटा यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली जगप्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार,बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसचं, जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरणारे वॉरेन एडवर्ड बफेट(Warren Buffett) यांचा जन्मदिन.

३० ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४७ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी, नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन.
  • सन १९५२ साली भारतीय रिजर्व बँकेचे पहिले गव्हर्नर ओसबोर्न स्मिथ यांचे निधन.
  • सन १९८१ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, महान मानवतावादी, स्वातंत्र्यसेनानी, धर्मगुरू, विश्वकोश विचारवंत आणि  ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक तसचं, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक जे. पी. नाईक उर्फ जयंत पांडुरंग नाईक यांचे निधन.
  • सन १९९४ साली महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, संशोधक व पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ उर्फ शं. गो. तुळपुळे यांचे निधन.
  • सन २००८ साली प्रसिद्ध भरतीय उद्योगपती व बिर्ला कुटुंबातील सदस्य कृष्ण कुमार बिर्ला यांचे निधन.
  • सन २०१४ साली  भारतीय मार्क्सवादी इतिहासकार व आधुनिक भारतातील आर्थिक आणि राजकीय इतिहासातील तज्ञ बिपीन चंद्र यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेख आपल्या करिता स्पर्धात्मक परीक्षेच्या दुर्ष्टीने खूप महत्वाचा आहे. तरी आपण या लेखाचे वाचन करून इतरानाही पाठवा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top