• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 16, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या ३० मे रोजी येणारे दिनविशेष

30 May Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा भारतीय हिंदी वृत्तपत्रिकांच्या इतिहासा करिता अति महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी भारतातील पहिल्या हिंदी भाषिक साप्ताहिक वर्तमानपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ चे प्रकाशन जुगलकिशोर शुक्ल यांनी कलकत्ता या शहरात केले.आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही इतिहास कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३० मे रोजी येणारे दिनविशेष – 30 May Today Historical Events in Marathi

30 May History Information in Marathi
30 May History Information in Marathi

३० मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 May  Historical Event

  • इ.स. १४९८ साली इटालियन सागरी खलासी कोलंबस आपल्या सहा जहाजांसोबत अमेरिकेच्या प्रवासाला निघाले.
  • इ.स. १५५६ साली मुघल बादशाहा अकबर यांचा मुलगा सलीम व मेवाड चे राजा राणा प्रताप सिंह यांच्यात हळदीघाटचे युद्ध झाले.
  • इ.स. १८६६ साली मुस्लीम धर्मीय विद्वान मुहम्मद क़ासिम नानोत्वी यांनी उत्तरप्रदेश मधील देवबंद या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मदरस्याची स्थापना केली.
  • सन १९२२ साली अमेरिकेतील वॉशिंगटन डीसी मध्ये लिंकन यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला.
  • सन १९७५ साली युरोपियन देशांतील आंतरराज्यीय संस्थेच्या २२ सदस्य देशांनी मिळून पॅरिस देशांत युरोपियन अंतराळ संस्था स्थापन केली.
  • सन १९८७ साली गोवा या राज्यास भारतीय घटक राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • सन २०१२ साली भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळ पटू होण्याचा मान पटकावला.

३० मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९४ साली प्रसिद्ध भारतीय इतिहास संशोधक व महाराष्ट्रीयन मराठी-कोकणी लेखक पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि कथा लेखक पंडित मुखराम शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली पौराणिक कथा, इतिहास, सामाजिक प्रश्न, मानवी भावना आणि राजकारण अश्या प्रकारच्या साहित्यातील विविध बाबी आपल्या चित्रकारी शैलीतून चित्रित करणारे महान भारतीय चित्रकार दिनानाथ दलाल यांचा जन्मदिन.
  • सन १९४० साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसचं, बंगाल क्रिकेट असोसिएशन चे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली भारतीय औषध शास्त्रज्ञ, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक आणि ज्योतिषशास्त्र सल्लागार विद्याधर ओक यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, विनोदकार आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभेचे माजी सदस्य परेश रावल यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली भारतीय वंशीय अमेरिकन जैविक अभियंता, साहित्य वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रशासक सुब्रा सुरेश यांचा जन्मदिन.
  • सन १९६४ साली भारतीय सेवानिवृत्त क्रिकेट पंच के. एन. राघवन यांचा जन्मदिन.

३० मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30  May Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १६०६ साली शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचे निधन.
  • सन १९१२ साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधूंपैकी एक विल्बर राईट यांचे निधन.
  • सन १९९१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी तसचं, माजी भारतीय कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल व कर्नाटक राज्याचे माजी राज्यपाल उमा शंकर दीक्षित यांचे निधन.
  • सन १९५५ साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी तसचं, लाला लाजपत राय यांच्यासमवेत ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचे निधन.
  • सन १९८९ साली प्रख्यात शीख संतकवी दर्शन सिंह जी महाराज यांचे निधन.
  • सन २००० साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय पुरोगामी साहित्यिक समिक्षक, भाषाविज्ञानी, कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांचे निधन.
  • सन २०१३ साली सर्वोत्कृष्ट बंगाली भाषिक चित्रपटा करिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि गीतकार ऋतुपर्णो घोष यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved