जाणून घ्या ६ जुलै रोजी येणारे दिनविशेष

6 July Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे. सन १८९२ साली आजच्या दिवशी”ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया” आणि “भारताचे अनौपचारिक राजदूत” म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय पारशी विद्वान, व्यापारी आणि राजकारणी दादाभाई नौरोजी यांची ब्रिटनच्या संसदेवर लिबरल पक्षाचे संसद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. अश्या पदावर विराजमान होणारे ते पहिले भारतीय नागरिक व पहिले अश्वेत व्यक्ती ठरले.

त्यांची नियुक्ती झाल्याने भारतातील स्वातंत्र्य सैनिकांना आपले म्हणने ब्रिटनच्या सरकारला सांगणे खूप सोपे झालं होत. भारतीय स्वातंत्र्य कालखंडाच्या इतिहासात घडलेली ही सर्वात मोठी घटना होती. याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता व त्यांचे कार्य यांची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यामतून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ६ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 6 July Today Historical Events in Marathi

6 July History Information in Marathi
6 July History Information in Marathi

६ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 July Historical Event

 • इ.स १७३५ साली मराठा शासक मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांनी राजपुताण्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
 • इ.स. १७८५ साली अमेरिकेतील डॉलर या चलणास अधिकृत चलनाचा दर्जा देण्यात आला. डॉलर हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित आहे.
 • इ.स. १८८५ साली फ्रेंच वैज्ञानिक लुई पास्चर(Louis Pasteur) यांनी प्लेगच्या रोगावर शोधलेल्या रेबीजच्या लसीचा पहिल्यांदा वापर केला.
 • इ.स. १८९२ साली भारतीय समाजसुधारक दादाभाई नौरोजी हे ब्रिटनच्या संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय व अश्वेत नागरिक बनले.
 • सन १९४४ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून संबोधलं.
 • सन १९४७ साली रशिया मध्ये एके-४७ रायफल्सची निर्मिती सुरु करण्यात आली.
 • सन १९८२ साली पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान त्याकाळील भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा रेल्वे वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला.
 • सन २००६ साली चीनच्या युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट देशाला जोडणारी नथुला खिंड जवळपास ४४ वर्षानंतर व्यापारासाठी उघडण्यात आली.

६ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७८१ साली ब्रिटीश राजकारणी, माजी डच ईस्ट इंडीजचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि बेनकॉलेनचे लेफ्टनंट गव्हर्नर तसचं, सिंगापूर देशाचे संस्थापक सर थॉमस स्टॅमफोर्ड बिंगले रॅफल्स (Thomas Stamford Raffles) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८३७ साली प्रसिद्ध भारतीय विद्वान, संस्कृत विद्या पंडित, प्राच्यविद्या संशोधक इतिहासकार व समाजसुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८१ साली भारतीय महाराष्ट्रीयन हिंदू संत गुलाबराव महाराज यांचा जन्मदिन.
 • सन १९०१ साली भारतीय राजकारणी, कायदेपंडित व शिक्षणतज्ञ, माजी केंद्रीय मंत्री तसचं, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली  राष्ट्रसेविका समिती नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, ‘इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ संस्थेचे उभारक व ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक डॉ. विनायक महादेव दांडेकर उर्फ वी. म. दांडेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली साहित्य पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कथा, कादंबरी व पटकथा लेखक व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्मदिन.
 • सन १९३० पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कर्नाटकी गायक, संगीतकार, बहु-वाद्य, पार्श्वगायक, संगीतकार आणि चरित्र अभिनेते मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण यांचा जन्मदिन.
 • सन १९४६ साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व अमेरिका देशाचे माजी (४३ वे) राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (George W. Bush) यांचा जन्मदिन.
 • सन १९५२ साली भारतीय साहित्यकार रेखा शिवराम बैजल यांचा जन्मदिन.

६ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 July Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १६१४ साली कच्छ प्रांताचे राजपूत राजा व मुघल बादशाहा अकबर यांचे विश्वासू सेनापती राजा मं सिंह यांचे निधन.
 • इ.स. १८५४ साली प्रसिद्ध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ जॉर्ज सायमन ओहम (Georg Ohm ) यांचे निधन.
 • सन १९५४ साली ब्रिटीश कालीन भारतात कायद्याची पदवी ग्रहण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कॉर्नेलिया सोरबजी (Cornelia Sorabjee) यांचे निधन.
 • सन १९६२ साली नोबल पारितोषिक वेजेता प्रख्यात अमेरिकन कादंबऱ्या, लघुकथा, पटकथा, निबंध व नाटक लेखक विलियम फाकनर(William Faulkner) यांचे निधन.
 • सन १९८६ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व बिहार राज्याचे राजकारणी तसचं, भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन.
 • सन १९९७ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक तसचं, नवकेतन फिल्म्सचे सह-संस्थापक चेतन आनंद यांचे निधन.
 • सन १९९९ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिम्हा यांचे निधन.
 • सन २००२ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी याचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here