Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

तरुणांसाठी काही आवश्यक गोष्टी

Advice for Youth

तरुण पण हि माणसाच्या जीवनातील एक अशी अवस्था आहे कि त्या अवस्थेमधेच माणूस स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो आणि तसेच तरुणपणा मध्येच तो आपले भविष्य उद्वस्थहि करू शकतो.

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता शारीरिकरित्या सुदृढ बनणे खूप महत्वाचे आहे, आणि जो तरुण शारीरिक रित्या सुदृढ आहे, त्याच्यावर जवळ जवळ कोणत्याही प्रकारचा रोग हा हावी होत नाही. आणि जो व्यक्ती शारीरिक रित्या सुदृढ नसतो त्यावर कोणताही रोग लवकर हावी होऊन जातो.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि तरुणांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, जेणेकरून त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.

Contents show
1 तरुणांसाठी काही आवश्यक गोष्टी – Advice for Youth in Marathi
1.1 ध्येय निश्चित करा – Decide The Goal
1.2 अनुभवा वरून शिकावे – Learn From Experience
1.3 प्रयत्न करत रहा – Keep Trying
1.4 योग्य वेळी योग्य काम करावे – Do The Right Thing At The Right Time
1.5 व्यसनापासून दूर रहा – Stay Away From Addiction
1.6 वेळेचे महत्व जाणून घ्या! – Learn The Importance Of Time
1.7 डोळ्यासमोर आदर्श ठेवा – Keep Role Model
1.8 प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करा – Read Inspirational Book
1.9 मित्रांची निवड काळजीपूर्वक करा – Choose Friends Carefully
1.9.1 बिनदास्त जगून घ्या – Live Free

तरुणांसाठी काही आवश्यक गोष्टी – Advice for Youth in Marathi

Advice for Youth

तर चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनात लागू करायला हव्या.

  • ध्येय निश्चित करा – Decide The Goal

आपण तरुण आहात तर लक्षात ठेवा, आपल्या जीवनात आपले एक ध्येय निश्चित करा, कारण ध्येय जर ठरवलेले नसेल तर आपल्या जीवनात आपली हवेत बाण मारल्यासारखी वागणूक होत राहील, म्हणजे आपण नेहमी जीवनात मार्ग भटकत राहू.

आणि तेच जर आपण आपल्या जीवनात ध्येय ठरवून पुढे निघालो तर आपण रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सतत पुढे चालत राहू.

त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले ध्येय निश्चित करावे.

  • अनुभवा वरून शिकावे – Learn From Experience

जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते बऱ्यापैकी हुशार असतात, पण जे दुसर्यांच्या अनुभवावरून शिकतात ते बुद्धिमान असतात.

आपण तरुण आहात तर आपल्याला त्या सर्व गोष्टींचे ज्ञान नाही ज्या गोष्टी आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्या शिक्षकांना माहिती आहेत, म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे.

यश हे अनुभवा पासुनच मिळत असते, आणि अनुभव हा वाईट अनुभवापासून, अनुभव हा माणसाचा एक चांगला शिक्षक असतो. आणि नेहमी दुसर्यांच्या अनुभवावरून शिकायचे प्रयंत्न करा.

  • प्रयत्न करत रहा – Keep Trying

अपयश हि यशाची पहिली पायरी आहे. अपयश आल्यानंतर जीवनामध्ये निराश न होता प्रयत्न करत रहा.

कारण यश त्याच व्यक्तीला मिळते जे प्रयत्न करत राहतात. म्हणतात न “प्रयत्नांती परमेश्वर”

तसेच “वाळूचे कण रगळीता तेलही गळे” या सर्व गोष्टींचा अर्थ असाच होतो कि आपण जर प्रयत्न करत राहिलो तर या जगात आपल्यासाठी अशक्य गोष्ट कोणतीही उरणार नाही. त्यासाठी अपयश मिळाल्या नंतर प्रयत्न करणे सोडू नका, प्रयत्न करत रहा, एक दिवस यश मिळणारच!

  • योग्य वेळी योग्य काम करावे – Do The Right Thing At The Right Time

बरेचदा असे होते कि आपण काम नसताना एखाद्या गोष्टीत लक्ष लावतो, तरुण वयात आपल्याला सद्ध्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या!

अनावश्यक गोष्टी कडे जास्त लक्ष्य देऊ नका. जसे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा आहे, कारण एकदा  हि वेळ निघून गेली तर आपल्याला पश्याताप करण्याची वेळ येवू नये म्हणून वेळेचा सदुपयोग करायला शिका. आणि अनावश्यक गोष्टी टाळून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींना महत्व द्या!

  • व्यसनापासून दूर रहा – Stay Away From Addiction

आपण जर तरुण आहात तर सर्वात महत्वाचे आपण कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर रहावे, बरेचदा तणावापासून दूर राहण्यासाठी आजचा युवा वर्ग हा व्यसनाच्या आधीन जातो.

व्यसनाचा प्रादुर्भाव हा आजच्या वेळेला आपल्याला जाणवणार नाही.

पण काही काळानंतर त्या व्यसनाचा प्रादुर्भाव हा आपल्या शरीरावर दिसून येईल त्या साठी आपण कोणत्याही तणावात असाल तर आपण आपल्या मित्रांचा तसेच घरच्यांचा सहारा घेऊन त्या समस्येचे निवारण करा.

जेणेकरून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आपल्याला व्यसनापासून दूर राहण्यास मदत होईल.

  • वेळेचे महत्व जाणून घ्या! – Learn The Importance Of Time

म्हणतात न “गेलेली वेळ पुन्हा येत नाही” त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात सुद्धा वेळेला महत्व द्यायला हवे.

कारण आज आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा येईल सांगितल्या जात नाही.

आपण आज वेळेला महत्व दिले तर भविष्यात वेळ आपल्याला महत्व देईल.

त्यासाठी वेळेचे व्यवस्थित नियोजन करा, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. आणि त्याचा आपण योग्य उपयोग करू शकू.

  • डोळ्यासमोर आदर्श ठेवा –  Keep Role Model

अस म्हटल्या जातं कि उदाहरणा मध्ये खूप मोठी ताकद असते, मी तुम्हाला छोट्याश्या उदाहरणाद्वारे सांगू इच्छितो. कोणीही विचार नव्हता केला कि माउंट एवरेस्टला कोणी सर करू शकेल पण सर्वात आधी १९५३ मध्ये एडमंड हिलरी यांनी माउंट एवरेस्टला सर करण्याचे धाडस केले, आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आज हजारो लोकांनी माउंटेन पर्वताला सर केले आहे. या गोष्टीतून आपल्याला कळेल कि आपल्या समोर कोणतेही उदाहरण असेल तर आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळते. जी आपण करू इच्छित असतो.

तसेच आपल्या जीवनात आपले एक आदर्श व्यक्तिमत्व ठेवा जेणेकरून आपण त्या व्यक्तिमत्वा पासून काहीतरी शिकून आपल्या जीवनात आपल्या ध्येयाकडे चालत राहू.

  • प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करा – Read Inspirational Book

बरेचदा तरुण पणामध्ये ताण-तणावाचा सामना करावा लागतो मग अश्या वेळी आपल्याला सुचत नाही काय करावे ते.

त्यामुळे बरेच तरुण तर त्यांच्या जीवनात व्यसनाला आमंत्रण देताना आपल्याला दिसून येतात.

तर तसे न करता आपण तरुण पणात प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले तर अश्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येणारच नाही कारण पुस्तक माणसाला खूप काही शिकवून जात असते.

तसेच जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा हे आपल्याला पुस्तकेच देत असत.

त्यामुळे आपण जेवढे होईल तेवढे प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे, आपल्याला भविष्यात त्या गोष्टींचा फायदा होईल.

  • मित्रांची निवड काळजीपूर्वक करा – Choose Friends Carefully

“कठीण समय येता कोण कामास येतो”.

संत रामदास स्वामींनी खूप चांगल्या प्रकारे या कवितेतून मित्रांचे वर्णन केलेले आहे.

संकटकाळी कोणीही आपल्या कामात येत नाही, पण जो संकटकाळी आपल्या कामात येतो तोच आपला खरा मित्र असतो.

तरुण पणात आपल्याला बरेच लोक असे भेटतात, कि जे कि आपल्या तोंडावर गोड बोलतील आणि पाठीमागे आपल्या विषयी वाईट बोलतील, तर अश्या काही लोकांपासून सावध रहा.

जेणेकरून आपल्याला भविष्यात पश्चाताप करायची वेळ येणार नाही.

  • बिनदास्त जगून घ्या – Live Free

आपण ऐकलेले असेलच कि “जिंदगी ना मिलेगी दोबारा”  हो खरच आहे कि,  कोणाला हे जीवन पुन्हा मिळणार आहे? त्यासाठी आजचा दिवस आनंदात जागून घ्या! आणि तेही बिनदास्त पणे कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता!  तरुण पण आहेच आनंदात जगण्यासाठी म्हणून बिनदास्त पणे आपला प्रत्येक दिवस जागून घ्या. “हर पल यहा जी भर जियो,  जो है समा कल हो न हो.” 

आपल्या जीवनात ह्या सर्व टिप्स लागू करा, खरोखर आपल्या जीवनात एक वेगळा बदलाव होताना आपल्याला दिसून येईल.

तर आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडलाच असेल आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

तसेच आपल्या आजूबाजूला जेवढाहि तरुण वर्ग राहत असेल त्यांना या लेखाविषयी सांगायला विसरू नका.

कारण ह्या गोष्टी आजच्या तरुण वर्गाला माहिती होणे खूप महत्वाचे आहे.

जेणेकरून त्यांना त्यांचे भविष्य उज्वल होण्यास या लेखाची मदत होईल.

असेच आणखी काही लेख आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू, त्यासाठी कनेक्ट रहा आमच्या माझी मराठी सोबत.

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved