Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

 सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि समाजशील व्यक्तिमत्व अझीम प्रेमजी

Azim Premji Yanchi Mahiti

माझे वडील हशीम प्रेमजी यांनी  Wipro ची स्थापना केली मी तर केवळ उत्पादनाची संख्या वाढवु शकलो…काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अझीम प्रेमजी यांनी केलेलं हे वक्तव्य त्यांच्यातील विनम्रता दाखवून जातं. 1966 साली वडीलांच्या निधनामुळे  Wipro ची जवाबदारी अझीम जींच्या खांद्यावर येऊन पडली, त्यावेळी ते अवघे 21 वर्षांचे होते. तेंव्हापासून जवळपास 5 दशकं झालीत  Wipro ची जवाबदारी ते आजतागायत अत्यंत यशस्वीपणे सांभाळतायेत.

महान व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांचा जीवनपरिचय – Famous Businessman Azim Premji Biography in Marathi

Azim Premji

अझीम प्रेमजी यांच्या अल्पपरिचय  – Azim Premji Information in Marathi

पूर्ण नांव (Name) अझीम हशीम प्रेमजी
जन्म (Birthday) 24 जुलै 1945
पत्नी (Wife Name) यास्मिन प्रेमजी
मुलं (Childrens Name)रिषद आणि तारिक

अझीम प्रेमजी यांचे जीवन – Azim Premji History in Marathi

मुंबई येथील मुस्लिम कुटुंबात अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. अझीमजींचे वडील हशीम प्रेमजी हे प्रसिद्ध उद्योगपती! “Rice King of Burma” म्हणून त्यांना ओळखलं जायचं. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात हशीम प्रेमजींनी सुमारे 1945 साली  “Western India Products Limited” या कंपनीची सुरुवात केली. सनफ्लावर वनस्पती म्हणून याठिकाणी घरगुती तेलाचं उत्पादन घेण्यात येत असे. शिवाय ७८७ नावाच्या साबणाचं देखील उत्पादन घेतल्या जाई.

पाकिस्तानच्या निर्मितेचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे मोहम्मद अली जिन्ना यांनी अझीमजींच्या वडिलांना पाकिस्तानात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु हशीम प्रेमजी यांनी ही विनंती फेटाळून भारतात राहणं पसंत केलं. 1966 साली हशीम प्रेमजींच्या निधनाची वार्ता ज्यावेळी अझीमजींना मिळाली त्यावेळी ते स्टेनफर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या विषयात विदेशात शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनामुळे ते भारतात परतले आणि कंपनीची जवाबदारी उचलली.

त्यावेळी ही कंपनी “Western India Products Limited” या नावाने आपली उत्पादनं निर्मिती करत होती, पुढे अझीमजींनी बेकरी फेट्स, लायटिंग प्रोडक्ट, हेयर केयर सोप्स, लहान बाळांसाठी उत्पादनं घेण्यास सुरुवात केली. काळाची पावलं ओळखून अझीम प्रेमजींनी अमेरिकेतील सेंटीने या कंपनीच्या मदतीने मिनी कम्प्युटर निर्मितीत पाऊल ठेवलं.

साधारण याच सुमारास त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘Wipro‘ असं ठेवलं. पुढे त्यांनी माहिती तंत्रज्ञानावर आपलं लक्ष केंद्रित केलं. अझीमप्रेमजी यांचा विवाह यास्मिन यांच्याशी झाला. त्यांना रिषद आणि तारिक ही दोन मुलं आहेत. त्यातील रिषद हे  Wipro मधेच कार्यरत असून आयटी विभागात चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर म्हणून जवाबदारी सांभाळत आहेत.

अझीम प्रेमजी यांच्याविषयी महत्वपूर्ण माहिती – About Azim Premji

  • अमेरिकी बिजनेस पत्रिका फोर्ब्स नुसार 1999 ते 2005 पर्यंत अझीम प्रेमजी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते.
  • अझीम प्रेमजी हे आयटी कंपनी Wipro Limited चे चेयरमैन आहेत.
  • आज संपूर्ण देशभर Wipro मधे एक लाख तीस हजार कर्मचारी कार्यरत असून 54 देशांमध्ये कंपनीच्या शाखा आहेत. Wipro ची मुख्य शाखा बैंगलोर येथे आहे.
  • 1966 साली आपल्या वडिलांच्या निधनामुळे अझीम प्रेमजी यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
  • वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाची आणि व्यवसायाची जवाबदारी सांभाळली.
  • अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वात Western India Products Limited या तेल आणि साबण बनवणाऱ्या कंपनीने अनेक उत्पादनांमध्ये गरुड भरारी घेतली आणि आयटी क्षेत्रात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं.
  • त्यांच्या मते गुणवत्ता…निर्मिती…उत्पादनात आपण आंतरराष्ट्रीय मुल्यांकन नजरेसमोर ठेवायला हवे, आणि जोपर्यंत आपण त्या पुढे पोहोचत नाही तोवर थांबायला नको.
  • अझीम प्रेमजी यांच्या आयुष्यात चढ-उतार कमी नव्हते परंतु त्यांनी कधी हार मानली नाही…आपल्या सहकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कायम विश्वास ठेवला… एवढी मोठी कंपनी प्रामाणिकतेच्या बळावर मोठी केली आहे.
  • अझीम प्रेमजी यांना भारतातील बिल गेट्स देखील म्हंटल्या जातं.
  • आज अझीम प्रेमजी हे भारतातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये तिसऱ्या स्थानावर असून संपूर्ण जगातील श्रीमंतांमध्ये ते 41 व्या स्थानावर आहेत.
  • अझीम प्रेमजी यांनी 2001 साली अझीम प्रेमजी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली.
  • अझीम प्रेमजी यांची सामाजिक संस्था ‘Azim Premji Foundation‘ गरीब आणि अनाथ मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याकरता अमुल्य योगदान देते आहे.
  • आजवर अझीम प्रेमजींनी 34% शेयर्स आपल्या फाउंडेशन ला दान केले आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजकार्यासाठी आपली 67 टक्के संपत्ती म्हणजे 45 लाख करोड दान केले आहेत.

अझीम प्रेमजी यांनी निर्माण केलेल्या कंपनी – Azim Premji Company  

  • विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टीम/ Wipro Lighting and Wipro GE Medical Systems -1991
  • विप्रो नेट/ Wipro Net -1999
  • नेटक्रेकर/ Netcracker-2000
  • विप्रो वॉटर/ Wipro water -2008
  • विप्रो इकोएनर्जी / Wipro EcoEnergy -2009

अझीम प्रेमजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान – Azim Premji Awards

  • 2005 साली भारत सरकारनं अझीम प्रेमजी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
  • 2011 या वर्षी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं.
  • 2000 साली मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ने मानद विद्यावाचस्पती ही पदवी त्यांना बहाल केली.
  • नशनल इंस्टीट्युट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग मुंबई यांनी 2006 साली अझीम प्रेमजी यांना बिजनेस व्हिजनरी हा पुरस्कार देऊन गौरव केला.
  • त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत मिडलटाउन इथल्या वेसलेयन विद्यापीठाने 2009 साली मानद विद्यावाचस्पती पदवी देवून त्यांचा यथोचित गौरव केला.
  • 2013 मध्ये प्रेमजी यांना  ‘Economic Times‘ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2015 साली मैसूर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित केलं.
  • बिजनेस वीक मासिकाने Wipro कंपनीला विश्वातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी कंपनी ठरवत अझीम प्रेमजी यांची मोठे उद्योगपती म्हणून दाखल घेतली.
  • India Today या नामांकित मासिकाने 2017 साली आपल्या यादीत भारतातील प्रभावशाली 50 प्रतिष्ठित व्यक्तीमत्वांत अझीम प्रेमजी 9 व्या स्थानी होते.
  • 2000 साली एशियावीक ने सर्वात शक्तिशाली 20 पुरुषांच्या यादीत अझीम प्रेमजी यांची निवड केली होती.
  • Times मासिकानं अझीम प्रेमजी यांचा दोन वेळा 100 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश केला आहे.

काही दिवसांपूर्वी Wipro चे चेयरमैन अझीम प्रेमजी यांनी आपल्या देशातील आर्थिक स्थितीवर भाष्य करतांना आपल्या देशात नेत्यांची कमतरता असल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय क्षेत्रातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. अझीम प्रेमजी यांच्याविषयी विशेष गोष्ट म्हणजे Wipro चे चेयरमैन असून देखील त्यांना विमान प्रवासा दरम्यान इकोनॉमी क्लास मधून प्रवास करायला आवडतं.

याशिवाय मोठमोठ्या हॉटेल मधे थांबण्यापेक्षा कंपनीच्या गेस्ट हाउस मधे थांबणं ते जास्त पसंत करतात. अझीम प्रेमजी यांच्यातील परोपकाराचा गुण त्यांना इतर उद्योगपतींपासून वेगळं करतो. त्यांच्यातील सामाजिक जाणीव, दातृत्व यामुळे त्यांनी आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा समाजकार्या करता दिला आहे. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे कित्येक गरजवंत मुलांना आज शिक्षणाच्या प्रवाहात आणणं शक्य झालं आहे…

भारतातील या बिल गेट्स ला माझी मराठीचा मानाचा मुजरा…

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved