• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information City Information

जळगाव जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Jalgaon Jilha Mahiti

सातपुडा पर्वतरांगांनी घेरलेला जळगांव जिल्हा! तापी नदीने वेढलेला जळगांव जिल्हा! शिक्षणाचा ’श’ देखील माहित नसतांना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिध्द झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगांव जिल्हा! बालकवी ठोंबरेंचा जळगांव जिल्हा!

जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असुन सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेला आहे, याच्या दक्षिणेकडे अजिंठा पर्वत रांगा आहेत.

कापसाच्या उत्पादनाकरता येथील शेती उपयुक्त असुन चहा, सोने, डाळी, कापुस,आणि केळींकरता प्रमुख बाजारपेठ म्हणुन जळगांव ची ओळख आहे.

तापी नदीचे विशाल पात्र डोळयांत मावत नाही, महाराष्ट्रातील इतर नद्यांचा उगम पश्चिम घाटांमघे होतो आणि त्या पुर्वेकडे बंगाल च्या खाडीपर्यंत वाहातात परंतु तापी पुर्वेकडुन पश्चिमेकडे वाहाते आणि पुढे अरबी समुद्राला जाउन मिळते.

जळगाव जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Jalgaon District Information in Marathi

Jalgaon District Information in Marathi

जळगांव जिल्हयातील तालुके – Jalgaon District Taluka List

जळगांव जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत.

  1. जळगांव
  2. अमळनेर
  3. भडगांव
  4. भुसावळ
  5. बोदवड
  6. चाळीसगांव
  7. चोपडा
  8. धरणगांव
  9. एरंडोल
  10. जामनेर
  11. मुक्ताईनगर
  12. पाचोरा
  13. पारोळा
  14. रावेर
  15. यावल

जळगांव जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Jalgaon Jilha Chi Mahiti

लोकसंख्या 42,29,917 क्षेत्रफळ 11,765 वर्ग कि.मी. साक्षरता 85ः1000 पुरूषांमागे 933 स्त्रिया राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 211 या शहरातुन गेले आहेत. या जिल्हयाला पुर्वी खान्देश म्हणुन ओळखल्या जायचे.

या जिल्हयातुन तापी नदी गेली असुन या नदीची एकुण लांबी 724 कि.मी. आहे यातील 208 कि.मी. महाराष्ट्रात आहे. या नदिच्या अनेक उपनद्या असुन या नदीचे पात्र फार मोठे आहे. याशिवागिरणा आणि वाघुर या देखील प्रमुख नद्या आहेत.

अहिराणी ही येथील प्राचीन आणि मुख्य भाषा असुन, मराठी, खानदेशी भाषा देखील येथे मोठया प्रमाणात बोलल्या जातात. मध्यप्रदेश लगतचा समुदाय हिंदी भाषेचा उपयोग करतो.

या जिल्हयात साधारण 700 मि.मी. पाउस पडत असुन उन्हाळयात तापमान 45 ते 48 डिग्री सेल्सीयस पर्यंत देखील पोहोचते, थंडीच्या काळात वातावरण सुखदायक असते.

केळी, गहु, बाजरी, लिंबु, भुईमुग, कापुस आणि उस ही येथील मुख्य पिकं आहेत.पारंपारीक यात्रांमधे कार्तिक महिन्यात राम राठोत्सवाची यात्रा, नवरात्रात महालक्ष्मीची यात्रा, मुक्ताईनगर पासुन 6 कि.मी. दुर चांगदेवाची यात्रा आणि मुक्ताईनगर येथील कोठळीत मुक्ताईची यात्रा पारंपारीक आणि उत्साहाने दरवर्षी साजरी होते.

जळगांव जिल्हा बहिणाबाई चैधरींमुळे देखील प्रकाशझोतात आला,त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मुलाने बहिणाबाई चैधरींच्या अहिराणी भाषेतील कविता प्रकाशीत केल्या आणि अवघेजन अवाक् झाले.

एका अशिक्षीत शेतकरी महिलेने जिवनाचे सार तिच्या कवितांमधुन व्यक्त केले आणि समाजाला विचार करायला भाग पाडले आज उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ कवियत्री बहीणाबाई चैधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय म्हणुन ओळखले जाते यातच सर्व आले. इतके मोठे व्यक्तीमत्व त्याच्या मृत्युपश्चात नावारूपाला यावे हा केवढा दैवदुर्विला!

जळगांव जिल्हयातील विशेष व्यक्तिमत्व

  • बहिणाबाई चैधरी ग्रामिण महिला शेतकरी यांच्या अहिराणी भाषेतील कवितांनी सातासमुद्रापार अहिराणी भाषा लोकप्रीय केली.
  • बालकवि ठोंबरे यांच्या कवितांनी जिल्हयातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृध्द केले.
  • ना.धों महानोर पद्म पुरस्कार प्राप्त एक मराठी कवी. निसर्गावर केलेलं यांच ग्रामीण बाजाचं काव्य फार लोकप्रीय आहे.
  • अजीम प्रेमजी . . . . एक सफल उद्योजक ज्यांनी विप्रो लिमीटेड ची स्थापना केली.
  • भवंरलाल जैन . . . . जैन एरिगेशन सिस्टिम चे निर्माता (उद्योजक).
  • हेमंत कोठारी . . . .निर्माता (उद्योजक).
  • एकनाथ खडसे . . . राजनेता.
  • गिरीश महाजन . . . . . राजनेता आणि कॅबिनेट मंत्री (भारतिय जनता पक्ष).
  • प्रतिभाताई पाटील . . . . पहिल्या महिला राष्ट्रपती.
  • उज्वल निकम . . . . . प्रसिध्द सरकारी वकील (हायप्रोफाईल हत्या आणि आतंकवाद यांसारख्या खटल्यावर यशस्वीपणे सरकारच्या वतीने काम केले).
  • पांडुरंग सदाशिव साने . . . भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक लेखक , शिक्षक आणि कार्यकर्ता.

जळगांव जिल्हयातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Tourist places in Jalgaon

श्री क्षेत्र पद्मालय जळगांव शहरापासुन साधारण 30 कि.मी. अंतरावर हे देवस्थान असुन या देवालयात भगवान गणेशाच्या दोन मुर्ती विराजमान आहेत. या स्वयंभु मुर्ती असुन संपुर्ण जिल्हयात आणि जिल्हयाबाहेर देखील या मंदीराची ख्याती ऐकावयास मिळते.

मंदीराचे बांधकाम दगडाचे असुन उंच डोंगरावर हे मंदीर आहे, आजुबाजुला लहान मंदीर असुन पद्मालय नावाचा तलाव देखील आहे हा तलाव कमळाच्या फुलांनी भरलेला असुन त्यामुळे याला पद्मालय हे नाव पडले असावे.

या मंदीरात श्री गोविंद महाराजांच्या पादुका स्थापीत असुन 440 कि.ग्राम वजनाची भव्य घंटा बघायला मिळते. पौराणीक कथेनुसार या ठिकाणी भिम आणि बकासुराचे युध्द झाले ज्यात भिमाने बकासुराला पराजित केले, तहान लागली असतांना भिमाने या ठिकाणी आपल्या शक्तीसामथ्र्याने तलावाची निर्मीती केली ज्याला आज भिमकुंड म्हणुन ओळखले जाते.

या परिसरात वेगवेगळया औषधी आणि जडीबुटी देखील मिळतात. या ठिकाणी दर्शनाला येण्याकरता जवळचे रेल्वेस्थानक जळगांव आहे, त्याशिवाय जळगांव, एरंडोल आणि पारोळा येथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बस ने देखील येथे पोहोचता येते.

गरम पाण्याचा झरा ’उनपदेव’ – Unapdev

सातपुडा पर्वतरांगांमधे वसलेलं हे देवस्थान जळगावकरांच्या लोकप्रीय स्थानांपैकी एक स्थान असुन या ठिकाणी गोमुखातुन सतत गरम पाण्याचा झरा वाहात असल्यामुळे याला एक आश्चर्य देखील मानल्या जातं.

रामायण या महाकाव्यात या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला आहे, 14 वर्ष वनवासात असतांना प्रभु रामचंद्र या ठिकाणी येउन गेल्याचे या ठिकाणी दाखले मिळतात.

इथल्या गोमुखातुन निघणा.या गरम पाण्यामुळे त्वचेचे आजार बरे होत असल्याचे भाविक सांगतात. हे स्थान रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडले गेले असल्याने येथे येणे सोयीचे आहे.

जवळचे रेल्वेस्थाने जळगाव हेच असुन खाजगी वाहनाने देखील येथे पोहोचता येते. चोपडा तालुक्यातुन बसेस उपलब्ध आहेत.सातपुडा पर्वतरांगांमधे या व्यतिरीक्त ’सनपदेव’ आणि ’निजार्देव’ हे देखील गरम पाण्याचे झरे प्रसिध्द आहेत.

फर्कांडे येथील झुलणारे टाॅवर्स – Swinging Towers in Jalgaon

उटावाडी नदीच्या किनारी एरंडोल तालुक्यापासुन 16 कि.मी. अंतरावर असलेले हे झुलणारे टाॅवर्स पुरातन निर्मीतीचे एक उत्तम उदाहरण आहे. हे दोन्ही टाॅवर 15 मिटर उंच असुन ज्यावेळी यातील एका टाॅवर ला फिरवले जाते त्यावेळी दुसरे टाॅवर आपोआप हलते, हे एक आश्चर्य असुन जुन्या बांधकामातील एक वैशिष्टयपुर्ण आणि आश्चर्य वाटण्यासारखे बांधकाम आहे.

याची निर्मीती जवळपास 250 वर्षांपुर्वीची असल्याचे सांगितले जाते. येथे पोहोचण्याकरता एरंडोल येथुन बसेस उपलब्ध होतात तसच खाजगी वाहनाने देखील हे स्थळ पाहाण्याकरता येता येते.

संत मुक्ताबाई मंदीर – Sant Muktabai Temple Jalgaon

प्राचीन देवस्थानांपैकी एक असे संत मुक्ताबाईंच्या मंदीराला भेट देण्याकरता फार दुरून भाविक येथे येत असतात. मुक्ताबाईंचे दोन मंदीरं या ठिकाणी असुन एक मेहुण मंदीर आणि मुक्ताईनगर या ठिकाणी तयार झालेले नवे मुक्ताबाई मंदीर.

संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातल्या लोकप्रीय संत होउन गेल्या त्या देशस्थ ब्राम्हण परिवारातल्या पहिल्या वारकरी संत, संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण, त्यांनी जवळपास 41 अभंगांची निर्मीती केली त्यात ’’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’’ हे संत ज्ञानेश्वरांना म्हणजे आपल्या बंधुरायांना आर्त विनवणी करणारं काव्य फार लोकप्रीय झालं.

मुक्ताबाई म्हणायच्या की संत तो आहे जो इतरांच्या कटु वचनांना सहन करू शकेल आणि स्विकारू शकेल म्हणुनच त्या म्हणतात ’’संत जेणे व्हावे, जग बोलेन सोसावे’’ हे ठिकाण मुक्ताईनगर तालुक्यात असल्याने येथे येण्याकरता वाहनांची सोय सहजतेने होते.

मनुदेवी मंदीर – Manu devi Temple Jalgaon

जळगांव जिल्हा आपल्या देखण्या संस्कृतीकरता आणि धार्मीक स्थानांकरता प्रसिध्द आहे.तापी नदीच्या तिरावर सातपुडा पर्वतरांगांच्या देखण्या आणि हिरव्यागार वातावरणात श्री मनुदेवी विराजमान आहे.

येथील ब.याच कुटुंबांची ही कुलदेवता देखील आहे. यावल चोपडा राज्य महामार्गावरून या ठिकाणी पोहोचता येते. अडगांव कासारखेडा येथुन आल्यानंतर मंदीराचे अंतर जवळपास 9 कि.मी. आहे. येथे येण्याकरता जवळपास 10 कि.मी. रस्त्याचे बांधकाम मंदीर समिती आणि ट्रस्टींनी केले आहे.

मंदीर 500 मिटर उंचीवर असुन वरचा परिसर संपुर्ण हिरवळीने आणि प्राकृतिक सौंदर्याने अतिशय देखणा दिसतो. मनुदेवीच्या दर्शनाकरता जळगांव वरून बसेस उपलब्ध आहेत.

गांधी तिर्थ (गांधी रिसर्च फाउंडेशन) – Gandhi Teerth Jalgaon (Gandhi Research Foundation)

गांधी तिर्थ ( गांधी रिसर्च फाउंडेशन ) महात्मा गांधीजींच्या जीवनावर दृष्टीक्षेप टाकण्याच्या दृष्टीकोनातुन याची निर्मीती भंवरलाल जैन यांनी केली.या गांधी तीर्थाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 25 मार्च 2012 ला झाले.

या ठिकाणी ऑडिटोरियम, अ‍ॅम्पी थिएटर, बैठकगृह, संग्रहालय, ग्रंथालय असुन अतिशय विस्तीर्ण परिसरात शांतीपुर्ण वातावरणात हे गांधी तिर्थ उभारण्यात आले आहे.

खादी वस्त्र, हस्तनिर्मीत वस्तु,आणि गांधीवादी साहित्याच्या विक्रीकरता येथे एक दुकान आहे.

या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युवल सिस्टिम, टच स्क्रिन, जैवस्कोप, हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामुळे महात्मा गांधीजींच्या जीवनाचे यथार्थ वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वातानुकुलीत संग्रहालय देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहे .
अनुभवी गाईड च्या मदतीने संपुर्ण परिसर पाहाण्याकरता जवळपास अडीच तासांचा कालावधी लागतो.

अजून अशा प्रकारचे अजून लेख पाहण्यासाठी आमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.

Editorial team

Editorial team

Related Posts

Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
June 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
June 17, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved