Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १४ मे रोजी येणारे दिनविशेष 

14 May Dinvishes

मित्रांनो, आज चा दिवस हा आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांसाठी खूपच महत्वाचा दिन आहे. आजच्या दिवशी सन १६६५ साली छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म रायगड किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र व मराठा साम्राज्याचे दुसरे शासक होते. त्यांनी आपल्या जीवनांत लढलेल्या लढाईत ते कधीच पराजित झाले नाहीत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुघल शाहीला हैराण करून सोडलं होत. अश्या या महान मराठा शासकाचा आज जन्मदिवस.

शिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळातील काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही व्यक्तींचे जन्मदिवस, निधन आणि त्यांचे शोध कार्य याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १४ मे रोजी येणारे दिनविशेष – 14 May Today Historical Events in Marathi

14 May History Information in Marathi
14 May History Information in Marathi

१४ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 May  Historical Event

  • सन १९४८ साली इजराईल देशाला स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करून त्याठिकाणी एक अस्थायी सरकारची स्थापना करण्यात आली होती.
  • १९५५ साली झालेल्या शीत युद्धादरम्यान सोवियत संघांसम्वेत कम्युनिस्ट पक्षाच्या आठ सदस्य देशांनी वारसा संधी नामक पारस्पारिक रक्षा संधीवर हस्ताक्षर केलं होत.
  • सन १९६३ साली कुवैत राष्ट्र हे सयुक्त राष्ट्राचे १११ वे सदस्य राष्ट्र बनले.
  • १९८१ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अवकाशातील लोकांकरिता वाहतुकीसाठी अंतराळ वाहन एस-१९२ ची निर्मिती केली.
  • सन २००१ साली भारत आणि मलेशिया या दोन राष्ट्रांमध्ये सात करार हस्ताक्षरीत करण्यात आले.

१४ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६६५ साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पहिल्या पत्नी राणी सईबाई यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
  • १८८३ साली भारतीय वकील दीवान बहादूर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली पश्चिम बंगाल मधील भारतीय स्वातंत्र्य सेनानी अरुण चंद्र गुहा यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली ख्यातनाम आंतरराष्ट्रीय पुरातत्वशास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे, चे माजी कुलगुरू तसचं, गांधीनगर येथील मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सचे महासंचालक भारतीय विनोदी सम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्मदिन.
  • १९२३ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील उत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी-बंगाली भाषिक चित्रपट निर्माता मृणाल सेन यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्मदिन.
  • १९८१ साली भारतीय संगणक वैज्ञानिक व शोधक, तसचं सॅमसंग स्टार लॅबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव मिस्त्री यांचा जन्मदिन.
  • सन १९८४ साली फेसबुक चे संस्थापक मार्क इलियट झुकरबर्ग यांचा जन्मदिन.

१४ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९२३ साली पश्चिम भारतातील अग्रगण्य हिंदू सुधारक स्वातंत्र्य सेनानी नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन.
  • १९४३ साली भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व राजकारणी अल्लाह बक्स मुहम्मद उमर सोमरी यांचे निधन.
  • सन १९७८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथुर यांचे निधन.
  • २०१० साली भारताच्या साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखक विंदा करंदीकर यांचे निधन.
  • सन २०१३ साली भारतीय सुधारवादी-लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व भारतीय अभियंता असगर अली यांचे निधन.
  • २०१६ साली भारतीय तमिळ भाषिक विद्वान व लेखक कंडासामी कुप्पुसामी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved