Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ जून रोजी येणारे दिनविशेष

25 June Dinvishes

मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती, तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

भारताच्या इतिहास काळात आजच्या दिवशी घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असतांना देशांत सन १९७५ साली प्रथमच आणीबाणी लागू करण्यात आली होती. सन २६ जून १९७५ सालापासून सन २१ मार्च १९७७ सालापर्यंत ही आणीबाणी देशांत लागू होती. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दिन अली अहमद यांनी ही घोषणा केली. भारताच्या इतिहास काळातील ही सर्वात मोठी विवादास्पद बाब होती.

जाणून घ्या २५ जून रोजी येणारे दिनविशेष – 25 June Today Historical Events in Marathi

25 June History Information in Marathi
25 June History Information in Marathi

२५ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –25 June Historical Event

  • इ.स. १५२९ साली मुघल शासक बाबर बंगाल प्रांतावर आपला विजय मिळवून राजधानी आग्रा या ठिकाणी पोहचले.
  • सन १९१८ साली कोल्हापुर संस्थानाचे राजे छत्रपती शाहूमहाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा निर्णय जरी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो.
  • सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धात फ्रांस देशाने औपचारिकपणे जर्मनी समोर आत्मसमर्पण केलं.
  • सन १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दिन अली अहमद यांनी देशांत आणीबाणी जाहीर केली.
  • सन १९८३ साली इंग्लंड देशांतील लॉर्डच्या मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ४३ धावाने पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली.
  •  सन २००० साली मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा ते पहिले हिन्दी चित्रपट अभिनेता ठरले.

२५ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६४ साली नोबल पारितोषिक पुरस्कार विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर हरमन नर्नस्ट (Walther Nernst) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६९ साली वीर शहीद भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व लोकमान्य टिळक यांचे अनुयायी दामोदर हरि चाफेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली स्वतंत्र भारतातील अंतिम व्हॉईसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन (Lord Mountbatten) यांचा जन्मदिन.
  • सन १९०४ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी तसचं उत्तरप्रदेश राज्यातील स्वतंत्र उठावाच्या अग्रणी कार्यकर्त्या सुचेता कृपलानी यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार मदनमोहन यांचा जन्मदिन.
  • सन १९३१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व राजनेता तसचं स्वतंत्र भारताचे सातवे पंतप्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, शिवाय उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९५१ साली भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका हास्य कलाकार व अभिनेता सतीश शाह यांचा जन्मदिन.
  • सन १९७४ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली रशियन बुद्धीबळ ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रैमनिक (Vladimir Kramnik) यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली परमवीर चक्र सन्मानित भारतीय लष्कर सैनिक मनोज कुमार पांडेय यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्मदिन.

२५ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९२२ साली प्रसिद्ध बंगाली कवितांचे गायक व कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.
  • सन १९५८ साली इंग्रजी कवी, लघुकथा लेखक आणि नाटककार अल्फ्रेड नोएस (Alfred Noyes) यांचे निधन.
  • सन १९९५ साली नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश-आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट थॉमस सिंटन वॉल्टन(Ernest Thomas Sinton Walton) यांचे निधन.
  • सन २००९ साली प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक व नर्तक मायकल जैक्सन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved