Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३१ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 31 July Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.  महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आल्यानंतर त्यांनी गुजरात मधील अहमदाबाद मधील साबरमती नदीच्या किनारी आपला आश्रम बनविला. त्या आश्रमात राहून त्यांनी अनेक नवीन प्रयोग केले जसे, शेती, पशुपालन आणि खादी विणकाम इत्यादी. याच आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा पाया रचला. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध अनेक जन आंदोलन केले.

सत्याग्रह आंदोलनापासून तर दांडी मार्च अश्या अनेक महत्वपूर्ण आंदोलनाचा साक्षीदार असलेला हा आश्रम आहे. परंतु, सन ३१ जुलै १९३३ साली महात्मा गांधी यांनी हा साबरमती आश्रम सोडला. या आश्रमात आज सुधा त्यांच्या अनेक आठवणी जागृत आहेत.

जाणून घ्या ३१ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 31 July Today Historical Events in Marathi

31 July History Information in Marathi
31 July History Information in Marathi

३१ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 July Historical Event

  • इ.स. १६५७ साली मुघलांनी मराठा साम्राज्यातील विजापूर येथील कल्याणी किल्ला जिंकला.
  • इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनले.
  • इ.स. १८५६ साली न्युझीलंड येथील क्राइस्टचर्च शहराची स्थापना करण्यात आली.
  • सन १९३३ साली महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.
  • सन १९४८ साली भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९५६ साली कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व दहा गाडी बाद करण्याचा विक्रम करणारे जिम लिंकर (Jim Laker) हे पहिले इंग्लिश क्रिकेटपटू बनले.
  • सन १९८२ साली सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.
  • सन १९९२ साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसे पुरस्काराने गौरविण्यात आलं.
  • सन २००१ साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहूमहाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

३१ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 31 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८०० साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर (Friedrich Wöhler) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७२ साली महाराष्ट्रातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्मदिन.
  • इ.स, १८८० साली प्रसिद्ध भारतीय आधुनिक साहित्यिक, लेखक व कादंबरीकार धनपत राय श्रीवास्तव उर्फ मुंशी प्रेमचंद यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली भारतातील सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांचा जन्मदिन.
  • सन १९०७ साली भारतीय गणितज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार आणि प्राच्यविद्या पंडित दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन (Milton Friedman) यांचा जन्मदिन.
  • सन १९१८ साली भारतीय संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर उर्फ दादासाहेब वर्णेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९४१ साली गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्मदिन.
  • सन १९६५ साली सुप्रसिद्ध ब्रिटीश चित्रपट निर्माता, लेखक व पटकथा लेखक जे. के. रोलिंग यांचा जन्मदिन.

३१ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 31 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८६५ साली भारतीय दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचे निधन.
  • इ.स. १८७५ साली अमेरिकेचे माजी 17 वे अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन (Andrew Johnson) यांचे निधन.
  • सन १९१२ साली ब्रिटीश कालीन भारतातील इम्पीरियल सिव्हिल सर्व्हिसचे सदस्य राजकीय सुधारक, पक्षीशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक एलन ऑक्टाव्हियन ह्यूम (Allan Octavian Hume) यांचे निधन.
  • सन १९४० साली ब्रिटीश गव्हर्नर मायकेल ओड्वायर यांची लंडन येथे गोळी मारून हत्या करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी उधमसिंग यांचे निधन.
  • सन १९८० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन.
  • सन २०११ साली रोमन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू जोसेफ अल्बर्ट रोजारियो (Joseph Albert Rosario) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved