Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

8 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसेच, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजच्या दिवशी भारताच्या इतिहास घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे भारत छोडो आंदोलन. सन १९४२ साली मुंबई इथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाला मंजुरी देण्यात आली. ब्रिटीश सरकार आपल्या मागण्या मान्य करत नसून देशांतील नागरिकांवर अत्याचार करीत असत त्यांना अनेक वेळा विनंती करून देखील त्यांनी आपले म्हणने मान्य केलं नाही. म्हणून महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलन सुरु करण्यात आलं.

देशाच्या अनेक भागातील नागरिक या आंदोलनांत सहभागी झाले होते. त्यांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितल आम्हाला पूर्ण स्वराज्य पहिजे. या आंदोलनात युवक, शालेय विद्यार्थी, महिला कामगार असे अनेक लोक या आंदोलनांत सहभागी झाले होते.

जाणून घ्या ८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 8 August Today Historical Events in Marathi

8 August History Information in Marathi
8 August History Information in Marathi

८ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 August Historical Event

  • इ.स. १५०९ साली महाराज कृष्णदेव राय विजय नगर साम्राज्याचे सम्राट बनले.
  • सन १९४२ साली मुंबई येथील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सभेत भारत छोडो प्रस्ताव पारित करण्यात आला.
  • सन १९४७ साली पाकिस्तान देशाने आपल्या राष्ट्रध्वज स्वीकारला.
  • सन १९९८ साली  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
  • सन २००० साली महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर
  • सन २००८ साली चीन ची राजधानी बीजिंग येथे आयोजित २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

८ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७९ साली अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डॉ. बॉब स्मिथ(Bob Smith) यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वरी देवी यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली जागतिक कीर्तीचे भारतीय फलज्योतिषी बैंगलोर वेंकट रमन यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक,  नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, व पटकथा लेखक दादा कोंडके यांचा जन्मदिन.
  • सन १९४० साली माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९४८ साली भारतीय राजकारणी व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य कपिल सिब्बल यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली भारतीय राजकारणी व ओडिशा राज्यातील बिजू जनता दला पक्षाचे सदस्य तथा राज्यसभा सदस्य प्रसन्ना आचार्य यांचा जन्मदिन.
  • सन १९८१ साली स्विस व्यावसायिक टेनिस खेळाडू रॉजर फेडरर (Roger Federer) यांचा जन्मदिन.

८ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८२७ साली ब्रिटीश राजकारणी व ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉर्ज कॅनिग(George Canning) यांचे निधन.
  • इ.स. १८९७ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ विक्टर मेयर(Viktor Meyer) यांचे निधन.
  • सन १९९८ साली वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.
  • सन १९९९ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.
  • सन २००० साली भारतातील कर्नाटक इथील एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावणारे कर्नाटकचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved