Wednesday, September 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

निसर्गसुंदर पर्यटनस्थळ “आंबोली घाट”

Amboli Ghat

मित्रांनो, आपल्या मानवी जीवनास आकस्मिक रित्या लाभलेली सर्वात मोठी अमुल्य वस्तू म्हणजे निसर्ग. या निसर्गामुळेच आपल्या मानवी जीवनांत काही तरी नवीन करण्याची उर्जा संचारत असते. निसर्गात आढळणाऱ्या विविध साधनांचा अभ्यासकरूनच मानव प्रगती करू शकला.  आपल्या पुर्थ्वीवरील वातावरण हे या निसर्गावरच अवलंबून आहे. जगाच्या विविध भागातील तापमानात होणारा बदल देखील या निसर्गावरच अवलंबून असतो.  या प्रकारचे अनेक पैलू आपल्या अंगी असणाऱ्या नैसर्गिक स्थळाला भेट देणे कोणाला आवडणार नाही. चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेवूया अश्याच प्रकारच्या एका  नैसर्गिक पर्यटन स्थळाबाबत.

आंबोली घाट विषयी माहिती – Amboli Ghat Information in Marathi 

Amboli Ghat
Amboli Ghat

कोकण म्हटल की आपल्या डोळ्यासमोर प्रथम चित्र उभ राहते ते निसर्गाच,  दूरवर पसरलेली नारळाची झाडे, आंब्याची आमराई, काजूंची झाडे, अश्या प्रकारची कोकणच्या निसर्गात आढळणारी अनेक प्रकारची झाडे आपल्यास दृष्टीस पडतात.  मित्रांनो, आज आपण याच कोकणात अस्तित्वात असलेल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाबाबत जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेस लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि गोवा राज्यास जोडणारा रस्ता म्हणजे आंबोली घाट.

या घाटाला महाराष्ट्राच्या  थंड हवेच्या ठिकाणाची राणी म्हणने वावग ठरणार नाही.  या आंबोली घाटातून प्रवास करतांना पर्यटक घाटात आढळणाऱ्या निसर्गाचा परिपूर्ण आनंद घेत असतात. या घाटात आढळणाऱ्या उंच उंच टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणाऱ्या दऱ्या या सर्व गोष्टींचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत असतात.

सिंधुदुर्ग जिल्हात अस्तित्वात असलेलं आंबोली हे गाव समुद्र सपाटीपासून सुमारे ६९० मी. उंचीवर स्थित असलेलं एक थंड हवेचे ठिकाण आहे. एके काळी हे ठिकाण सावंतवाडी संस्थानाची उन्हाळी राजधानी चे ठिकाण होते. त्याकाळातील भव्य वास्तू आपणास आज देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसचं, ब्रिटीश काळात शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील याच आंबोली घाटातून मार्गस्थ झाले होते.

हा संपूर्ण परिसर घनदाट अरण्यात विखुरलेला असल्याने त्या ठिकाणी आपणास अनेक लहान मोठे धबधबे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली घाटाची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे तेथील डोंगर जणू हिरवा शालू नेसलेल्या नव्या नवरीसारखे दिसतात. पावसळ्यात अनेक पर्यटक प्रेमी या ठिकाणी पर्यटनासाठी येतात.

हिवाळ्यात हा सगळा परिसर पांढऱ्या धुक्याची चादर आपल्या अंगावर ओढल्यासारखा दिसतो. तसचं, उंचावरून पडणारे धबधबे आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात.  या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती, प्राणी, आणि पक्ष्यामुळे येथील वातावरण खूपच मंगलमय वाटते. या ठिकाणी आपणास रानडुकरे, बिबटे, चितळ, सांबर, भेकर, अस्वल, माकडं या सारखी वन्यप्राणी पाहायला मिळतात. तसचं, या सदाहरित आरण्यात मैना, बुलबुल, धनेश, धोबी, चांदोल, राघू असे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. निसर्गात आढळणारी आयुर्वेदिक वनस्पती जसे की, हिरडा, जांभूळ, ऐन, अंजन, करवंद, तमालपत्र, शिकेकाई यासारखी अनेक वनस्पती याठिकाणी आढळतात.

आंबोली घाट ला कसे जाल – How to Reach Amboli Ghat

मित्रांनो, आपणास या पर्यटन स्थळाला भेट द्यायची असल्यास मुंबई वरून हे ठिकाण सुमारे ४९२ किमी. दूर आहे.  तसचं, आपण सिंधदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्याठिकाणी पर्यटकांसाठी खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Devanand Ingle

Devanand Ingle

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved