देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra Fadnavis Mahiti

महाराष्ट्राचे तरूण तडफदार राजकारणी व्यक्तिमत्व आणि २०१४ या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणारे अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणजे श्री. देवेंद्र फडणवीस! कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, आर्थिक धोरणांसह अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग उत्तम आहे.

नगरसेवक, सगळयात कमी वयाचे महापौर, आमदार, भारतीय  जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि २०१४ पासुन मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री.देवेंद्र फडणवीस!

देवेंद्र फडणवीस यांची माहिती – Devendra Fadnavis Biography in Marathi

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय – Devendra Fadnavis Information

नाव (Name): देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
जन्म (Birthday): २२ जुलै १९७० नागपुर
शिक्षण (Education):
  • विशेष गुणवत्तेसह देवेंद्र फडणवीस यांनी लॉचे शिक्षण पुर्ण केले पुढे व्यवस्थापन शास्त्राची पदवी देखील मिळवली.
  • जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ  प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
वडिल (Father Name):  गंगाधरराव फडणवीस
आई (Mother Name): सरीता फडणवीस
पत्नी (Wife Name): अमृता फडणवीस
कन्या:  दिविजा

देवेंद्र फडणवीस राजकीय करियर – Devendra Fadnavis Political Career

वारसा हक्कानं राजकारण मिळालं असलं तरीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली कारकिर्द स्वबळावर निर्माण केली आहे. अभ्यासु व्यासंग असल्याने राजकारणाचे सखोल ज्ञान त्यांनी मिळविलेले आहे.

त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि जनसंघात कार्यरत होते या व्यतिरीक्त ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते. देवेंद्र फडणवीस यांनी लॉ ची पदवी मिळवलेली आहे व बिजनेस मॅनेजमेंट चा देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे.

आपल्या महाविद्यालयीन जीवनात अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सक्रिय सदस्य होते. या पदावर असतांना राजकारणी व्यक्तिमत्वांशी त्यांचा जवळुन संबंध आला. १९९९ पासुन आतापर्यंत चारवेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सदस्य राहिले आहेत.

विशेष बाब ही की १९९२ ते २००१ नागपुर महानगरपालिकेचे सदस्य म्हणुन त्यांची निवड झाली आहे. दोन वेळा नागपुर चे ते महापौर झाले असुन मेयर इन कौन्सिल या पदावर त्यांची फेरनिवड झाली आहे.

अश्याप्रकारचा सन्मान मिळविणारे राज्यातील ते एकमेव आहेत. श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे १८ वे मुख्यमंत्री असुन आपल्या वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.

त्यांच्यापुर्वी वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार हे महाराष्ट्राचे पहिले सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरलेत. निवडणुकीच्या वेळी दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा फार लोकप्रीय ठरली आणि प्रत्यक्षात देखील उतरली.

देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत जीवन – Devendra Fadnavis Family History

२००६ साली देवेंद्र फडणवीस यांचा विवाह अमृता फडणवीस यांच्याशी झाला. त्या नागपुर येथील अक्सिस बॅंकेच्या असोसिएट उपाध्यक्ष आहेत.

त्यांचे आईवडिल नागपुर येथे डॉक्टर म्हणुन कार्यरत असुन त्यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. उभयतांना एक कन्या असुन तीचे नाव दिवीजा असे आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक योगदान – Devendra Fadnavis Social Work

  • ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशियारीज चे ते सचिव आहेत.
  • नागपुर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत
  • नागपुर विद्यापिठाचे ते सिनेट सदस्य आहेत.
  • नागरी पायाभुत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकिय व्यवस्थानाच्या मुद्यांबाबतचे रिसोर्स पर्सन.
  • नाशिक मधील भोसला मिलीटरी स्कुल चे उपाध्यक्ष.
  • संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य.

देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार – Devendra Fadnavis Awards

  • सर्वोत्कृष्ट संसदपटुचा वार्षिक पुरस्कार (कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन).
  • पुर्णवाद परिवार नाशिक यांचा राजयोगी नेता पुरस्कार.
  • पुण्यातील मुक्तछंद संस्थेतर्फे प्रमोद महाजन स्मृतिप्रीत्यर्थ पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटु पुरस्कार.
  • वादविवाद स्पर्धेत (आंतरराष्ट्रीय विद्यापिठ) सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार.
  • रोटरी क्लब चा मोस्ट चॅलेजिंग युथ विभागीय पुरस्कार.
  • नागभुषण फाऊंडेशन नागपुर चा ’’नागभुषण’’ पुरस्कार.

आशा करतो या लेखाला वाचून आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली असेल, आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top