“घालीन लोटांगण, वंदीन चरण” प्रार्थना

Ghalin Lotangan Vandin Charan Lyrics in Marathi

आपली स्तुती केलेली कोणाला आवडणार नाही! सर्वांनाच आवडेल. त्याचप्रमाणे, भगवंतांना सुद्धा त्यांची स्तुती केलेली आवडते. एखाद्या भक्ताने आपली मनोभावे स्तुती केल्याचे पाहनू ईश्वर सुद्धा प्रसन्न होतात.

हिंदू धर्मात एकूण ३३ कोटी देवी देवतांची आराधना करण्यासाठी त्यांची स्तुती करण्यासाठी प्रत्येक देवतांची विशेष अश्या आरतीची रचना करण्यात आली आहे. परुंतू, या सर्व आरत्यांमध्ये एक आरती सर्व सामान्य आहे ती म्हणजे, घालीन लोटांगण.

या आरतीची रचना संत नामदेव महाराजांनी केली असून अगदी सोप्या शब्दांत भगवंतांना विनंती केली आहे. या आरतीमध्ये संत नामदेवांनी एखाद्या लहान मुलाने आपल्या आई बाबांकडे हट्ट करावा अश्या स्वरुपात आरतीची रचना केली आहे. अश्या प्रेमळ शब्दांत जर कोणी आपल्याला विनंती केली तर आपण सुद्धा त्यांच्या मदतीला धवून जातो. मग भगवंत का येणार नाही!

“घालीन लोटांगण, वंदीन चरण” प्रार्थना – Ghalin Lotangan Vandin Charan Lyrics in Marathi

Ghalin Lotangan Vandin Charan Lyrics in Marathi
Ghalin Lotangan Vandin Charan Lyrics in Marathi

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे

आपले प्राचीनधर्म ग्रंथ वाचल्यास आपणास याबाबत अनुभूती येईल. संत नामदेव महाराज हे थोर विठ्ठल भक्त होते. त्यांची भक्ती पाहून साक्षात पांडुरंग त्यांना दर्शन देत असतं. भक्त नामदेव यांच्या मुखातून आपली स्तुती ऐकून पांडुरंग त्यांच्या समोर प्रकट होत असतं तसचं, त्यांनी वाढून आणलेले नैवद्य ग्रहण करत असतं. यावरून हे सिद्ध होते की, भक्तांनी ईश्वराची मनोभावे स्तुती केल्यास साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्या भक्ताच्या भेटीसाठी व्याकूळ होतात.

संत नामदेव यांच्याप्रमाणे संत तुकाराम, संत चोखामेळा, संत एकनाथ महाराज यासारख्या महान संतानी विठ्ठल भक्ती केली आहे. तसचं, आपल्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भगवंतांची स्तुती केली आहे. त्यामुळे या सर्व विठ्ठल भक्तांना परमेश्वर पांडुरंगाने साक्षात दर्शन दिल आहे तसचं, त्यांच्या घरी राहून चाकरी केली आहे. परमेश्वर भक्तीची महिमा खूप महान असून ईश्वराची मनोभावे स्तुती केल्यास आपणास सुद्धा त्याची अनुभूती येईल.

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये भगवंतांची स्तुती करण्यात आलेल्या अनेक प्रकारच्या आरत्या आहेत.  मंदिरात तसचं, आपल्या घरी या आरत्यांचे नियमित पठन करण्यात येते.  घंटा, शंक टाळ, मृदुंग आणि हाताच्या टाळ्यांच्या तालावर आरती म्हटली जाते.  आरती ही एकोप्याने ताला सुरात म्हटली जात असल्याने संपूर्ण वातावरणात आरतीचा सूर पसरतो.

श्रावण आणि भाद्रपद महिन्यात प्रत्येक ठिकाणी आरतीची सूर आपल्या कानी पडतात. श्रावण महिन्यात भगवान महादेव यांची पूजा केली जाते त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण असते. यानंतर भाद्रपद महिन्याच्या अनंत चतुर्दशीला श्री गणेश यांचे आगमन होते.  हिंदू धार्मिक बांधव मोठ्या आनंदाने आपल्या घरी गणेशाचे स्वागत करतात.

भगवान गणेश यांचे मुक्काम दहा दिवसांचे असते. त्यामुळे दहा दिवस सगळीकडे आरत्यांची धूम असते. श्री गणेश लहान बालकांना अति प्रिय असल्याने लहान मुले सुद्धा अति उत्सहाने आरती म्हणत असतात. यानंतर घटस्थापनेला माता दुर्गा यांचे आगमन होते. त्यांचे मुक्काम सुद्धा ९ दिवसांचे असते, त्यामुळे नित्य नियमाने दहा दिवस सगळीकडे आरत्यांची धूम असते.

मित्रांनो, देवी देवतांची आरती करतांना आरतीच्या शेवटी हात जोडून मनोभावे स्वत:भोवती फेरी मारत या आरतीचे पठन करावे. श्री गणेश आणि माता दुर्गा यांच्या आरतीच्या शेवटी या आरतीचे नियमित पठन केले पाहिजे.

भाद्रपद महिन्यात श्री गणेश आणि माता दुर्गा स्वत: आपल्या घरी येत असतात. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी नेहमीच आपण या आरतीचे पठन केलं पाहिजे. वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपणास या आरतीचे महत्व माहित व्हावे या उद्देशाने या आरतीचे लिखाण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here