आपल्या जीवनातील खेळाचे महत्व

Khelache Mahatva

मानवाच्या उत्कर्षापासुनच क्रिडा त्याच्या जिवनाचा एक अमुल्य भाग बनला. शिकार करणे, पळण्याची शर्यत लावणे, झाडावर चढणे, पोहणे, नेम लावणे, हवेत पकडणे, उडया मारणे, इत्यादींमधून त्यांच्या खेळाडू वृत्तीचे दर्शन होते.

विविध क्रिडांमधून त्याचे मनोरंजन होते व ज्ञान मिळते.

क्रिडा कोण किती समर्थ याच्या जाणण्याचे साधन होते त्यामूळे प्रत्येकाची कूवत कळायची, त्यामुळे क्रिडा हे एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून मानवाच्या जिवनात अस्तित्वात होती.

खेळ खेळल्यामुळे लहान मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो. त्यांच्यातील आंतरीक कौशल्याचा विकास होतो.

त्याच्या सर्व प्रकारच्या कौशल्यांच्या विकासामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहाते व त्याची वाढ झपाटयाने होते.

आपल्या जीवनातील खेळाचे महत्व – Importance of Sports in Marathi

Importance of Sports in Marathi

खेळ खेळण्याचे फायदे – Advantages of Playing Games

दररोज लहान मुल कोणता ना कोणता खेळ खेळतात त्यातुन त्यांची शारिरीक ऊर्जा खर्च होते त्यामुळे त्यांना अधिक उर्जेची गरज पडते परिणामी त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

खेळांमुळे सहकार्य भावना वाढते मुल आणखी चांगली सामाजिक होतात, एकमेकांसोबत आपले सामंजस्य स्थापीत करतात. खेळांमुळे निर्णय क्षमता विकसीत होते.

बुध्दीच्या सर्व कोशिकामध्ये उर्जा संचारली जाते. खेळांमुळे वर्चस्व व प्रभुत्व मिळविण्याची स्पर्धा लागते, प्रत्येक बाळ आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.

मुलं स्वयंकेंद्रीत बनतात. ते आपले विश्व बनवतात ज्यामध्ये ते जगतात.

 • मुलांमध्ये स्पर्धात्मक गुणांचा विकास होतो.
 • आत्मियभाव निर्माण होण्यास मदत होते.
 • स्वभावात उत्साह वाढून उर्जावान वाटते.
 • शरीरात स्फूर्ती येते.
 • पालकांवर अवलंबून राहण्याची सवय कमी होते.
 • मुलांसाठी बाहेर खेळण्याचे उपाय.
 • मुलांना उत्साहीत करणे.
 • मुलांमध्ये सहकार्य भावना, नेतृत्व क्षमता आणि सामंज्यस्यता आणि स्पर्धात्मक प्रेरणा वाढविणे फार जरूरी आहे. त्यामूळे हे कौशल्य आत्मसात करता येते.
 • कौशल्यांना निखारणे.
 • आपल्या मुलात क्रिडा गुणांचा विकास करणे, त्यांचे शरीर व स्वास्थ्य उत्तम ठेवणे, अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे त्यासाठी उत्साह निर्मीती करणे.

साहाजीकच मुलांना बाहेर खेळायला आवडते कारण बाहेरचे मोकळे वातावरण त्यांना अनुकूल असते, काही मुलं जास्त संवेदनशील असल्यामुळे ते आई वडीलांपासुन दूर जात नाहीत त्यामुळे त्यांना बाहेर खेळवणे एक चांगला उपाय होउ शकतो त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न यशस्वी होतो.

बाहेरील खेळ – Outdoor Games

 • प्राचीन काळापासुन पतंग उडवण्याचा खेळ भारतात खेळला जातो. मुलांना पतंग उडवणे फार आवडते, त्यामुळे बाहेर खेळल्या जाणारा हा एक चांगला खेळ आहे. मुलांसोबत राहून त्याचा उत्साह वाढवता येतो त्यांच्या चुका त्यांना सांगता येतात. त्यांना मार्गदर्शन करता येते. त्यांना बाहेर खेळण्यांस चांगले प्रोत्साहन देता येते. पतंग उडवल्याने दोन्ही हातांची चांगली कसरत होते. तसेच डोळे आणि निर्णय क्षमतेची वाढ होते.
 • मुलांना गार्डन मध्ये सकाळी चालणे व उडया मारणे, धावणे योग साधना करणे इत्यादी आरोग्यदायी क्रिडा प्रकार करवून घेता येतात. उंच व लांब उडया मारणे हा खेळ मुलांना फार आवडतो यामुळे त्याचे शरीर स्वस्थ राहाते व शरीराची चांगली कसरत होते.
 • सायकल चालविणे हा एक चांगला क्रिडाप्रकार आहे. मुलांमध्ये सायकल चालविण्याची विलक्षण आवड असते त्यांना सायकल चालविणे फार आवडते त्यांना योग्य मार्गदर्शन देवून सायकल चालविणे शिकवू शकतो. सायकल चालविण्यामुळे संपूर्ण शरीराची कसरत होते. निर्णय क्षमतेचा विकास होतो. मुलांसोबत राहिल्यास त्यांच्या अंगात समाजाशी एकरूप होण्याची क्षमता विकसीत होते.
 • लपाछपी, लंगडी, हात लावणी, नदी पर्वत, उतरण उडी, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हे काही पारंपारीक व काही व्यावसायिक खेळ मुलांमध्ये खेळवल्यास त्यांच्या कौशल्याचा विकास होतो. त्यांच्यात समाजाशी एकरूप होण्याची भावना, सहकार्याची, नेतृत्व गुणाची भावना वाढते. त्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. तसेच योग्य कौशल्य जोपासल्यास मुले व्यावसायिक दृष्टया खेळाकडे बघू शकतात.

खेळाबाबत सुरक्षा – Game Safety

 • एक पालक म्हणून आपल्या पाल्यांना खेळांमध्ये मार्गदर्शन व योग्य उत्साह निर्माण करणे ही आपली जवाबदारी आहे. त्यांच्या सोबत खेळ खेळतांना मुलांच्या सुरक्षेची जवाबदारी ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे मुलांसोबत राहाणे फार गरजेचे आहे.
 • खेळ खेळण्यासाठी त्यांना उचित मार्गदर्शन व सावधगिरी बाबत संपूर्ण कल्पना दयावी.
 • त्यांच्या चुकांचे निरीक्षण करावे. त्या ओळखुन त्याबाबत उचित सल्ला घ्यावा.
 • खेळांमधील बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांना दयावी.
 • त्यांना आवश्यक सर्व सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून दयावी.

एक पालक म्हणून आपली फार मोठी जवाबदारी आहे. ती आपण नियमीतपणे पाळली पाहीजे.

आपल्या पाल्यांना खेळांविषयी जागृत करून त्यांच्यात त्याप्रती रूची निर्माण करणे जरूरी आहे.

लहानपणापासून मुलांना खेळांविषयी आवड व उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे.

आशा करतो या लेखामुळे आपल्याला खेळाविषयी प्रेरणा मिळेल,

तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here