व्हॉलीबॉल खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Volleyball Information in Marathi

मानवाचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. या खेळांपैकी काही घरगुती तर काही खेळ मैदानी असतात. मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा छान व्यायाम तर होतोच शिवाय आरोग्यही उत्कृष्ट राहण्यास मदत होते.

मैदानी खेळांत टेनिस, हॉकी, फुटबॉल आणि इतरही खूप खेळ प्रसिद्ध आहेत. याच यादीतील आणखी एक खेळ म्हणजे व्हॉलीबॉल. होय, व्हॉलीबॉल हा देखील एक मैदानी खेळ आहे.

अनेकांना या खेळाचा इतिहास आणि नियम कदाचित माहित नसतील. चला तर मग बघुयात व्हॉलीबॉल खेळाबद्दल संपूर्ण माहिती.

व्हॉलीबॉल खेळाबद्दल संपूर्ण माहिती – Volleyball Information in Marathi

व्हॉलीबॉल खेळाचा इतिहास – Volleyball History

व्हॉलीबॉल खेळाचा शोध अमेरिकेत १८९५ साली लागला. अमेरिकेतील क्रीडा प्रशिक्षक विलियम मोर्गन यांनी या खेळाचा शोध लावला असल्याचे समजते. सुरुवातीला व्हॉलीबॉल मैदानावर न खेळता घरातील खेळ म्हणून खेळला जायचा.

हळूहळू या खेळात उत्क्रांती होत गेली. हल्ली हा खेळ मैदानावर तसेच समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात खेळला जातो. इतकेच काय तर अगदी गल्लीबोळात देखील व्हॉलीबॉल खेळतांना आपण पाहू शकतो.

व्हॉलीबॉल खेळासाठी लागणारे साहित्य – Facilities and Equipment of Volleyball

खेळासाठी अतिशय कमी साहित्याची गरज आहे. आपल्याला फक्त एक चेंडू, एक जाळी आणि पुरेशा जागेची आवश्यकता आहे. परंतु खेळाची स्पर्धा असेल तर आपल्याला साहित्या संबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते.

व्हॉलीबॉलच्या एका संघात किती खेळाडू असतात – How many players to a Volleyball Team

हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ६-६ खेळाडू असतात. मैदानाच्या मध्ये असलेल्या जाळीच्या दोन्ही बाजूंना एक संघ असतो. संघातील खेळाडू विरुद्ध संघाकडे व्हॉलीबॉल फेकतो. विरुद्ध संघ हा व्हॉलीबॉल परत करण्याचा प्रयत्न करतो.

परत करत असतांना तो बॉल जमिनीला टेकणार नाही याची काळजी प्रत्येक संघ घेत असतो.

व्हॉलीबॉल खेळाचे नियम – Volleyball Rules

मैदानात ६ खेळाडू ३-३ चा गट करून उभे राहतात. यांपैकी ३ खेळाडू समोर आणि ३ खेळाडू मागे उभे असतात. जो संघ नाणेफेक जिंकतो, तो आधी बॉलला फटका मारतो, ज्याला सर्विंग असे म्हणतात. मागील ३ खेळाडूंपैकी जो खेळाडू उजव्या बाजूला उभा असतो, तो सर्वप्रथम सर्विंग करतो. सर्विंग करताना खेळाडू बॉलला केवळ एकदाच स्पर्श करू शकतो.

सर्विंग करतांना बॉल विरुद्ध संघाच्या मैदानाला किंवा जमिनीला टेकवा असा उद्देश असतो. विरुद्ध संघ सुद्धा हा बॉल परत करत असतांना हाच उद्देश ठेवतो.

जो पर्यंत बॉल मैदानाला स्पर्श करत नाही, तो पर्यंत खेळ सुरूच असतो. बॉल मैदानाला टेकला तर विरुद्ध संघाला गुण दिले जातात. जो संघ आधी २५ गुण मिळवितो, तो संघ विजयी ठरतो. याशिवाय व्होलीबॉल जाळीला देखील स्पर्श करणार नाही याची काळजी खेळाडूंना घ्यावी लागते.

व्होलीबॉल खेळाचे मैदान : Volleyball Ground Measurement

खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात. मैदान सपाट आयताकृती असते, ज्याची लांबी १८ मी आणि रुंदी ९ मी असते. मैदानाच्या मधोमध जाळी बांधलेली असते. जाळी बांधण्यासाठी २ खांब उभे असतात. जाळीपासून ३ मी वर एक रेष आखलेली असते. याला फ्रंट झोन असे म्हणतात. फ्रंट झोन पासून शेवटपर्यंत ६ मी मैदानाला बॅक झोन म्हणतात. बॅक झोन पासून मागे ३ मी अंतरावर सर्विस एरिया असतो.

व्हॉलीबॉलमधील जाळीचे मोजमाप आणि उंची : Volleyball Net Measurement and Height

खेळामध्ये दोन संघांच्या मध्ये एक जाळी बांधण्यात येते. ही जाळी ९.५ ते १० मी लांब आणि १ मी रुंद असते. मैदानावर ही जाळी खांबांच्या मदतीने बांधण्यात येते. पुरुषांसाठी नेट ची उंची २.४३ मी तर महिलांसाठी ही उंची २.२४ मी असते.

व्हॉलीबॉल खेळाचा चेंडू :

खेळत वापरल्या जाणाऱ्या चेंडूसाठी देखील काही मानके ठरविण्यात आलेली आहेत. चेंडूचे वजन २८० ग्राम पेक्षा जास्त नसावे, तसेच चेंडूचा परीघ ६५ ते ६७ सेमी असावा.

भारतातील व्हॉलीबॉल खेळाडू :

  1.  अमित बलवान सिंह
  2. रणजित सिंह
  3. विनीत कुमार
  4. गगन कुमार
  5. जेरोम चार्ल्स इ.

व्हॉलीबॉल खेळाबद्दल काही महत्वाचे प्रश्न :

१. व्हॉलीबॉल खेळाचा शोध कुणी व कुठे लावला ?

उत्तर: या खेळाचा शोध विलियम मोर्गन यांनी १८९५ साली अमेरिकेत लावला.

२. व्हॉलीबॉल खेळाचे किती प्रकार आहेत ?

उत्तर: या खेळाचे एकूण २ प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे मैदानी व्हॉलीबॉल आणि दुसरा समुद्र किनाऱ्यावरील व्हॉलीबॉल.

३. व्हॉलीबॉल हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का ?

उत्तर: होय.

४. व्हॉलीबॉल खेळातील जाळी जमिनीपासून किती उंचीवर असते ?

उत्तर: महिलांसाठी २.२४ मी आणि पुरुषांसाठी २.४३ मी.

५. व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबी व रुंदी किती असते ?

उत्तर: व्हॉलीबॉलचे मैदान आयताकृती असून त्याची लांबी १८ मी आणि रुंदी ९ मी असते.

६. व्हॉलीबॉलचे वजन किती असावे ?

उत्तर: व्हॉलीबॉलचे वजन २८० ग्रामपेक्षा जास्त नसावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here