फणस बद्दल माहिती मराठी

Jackfruit chi Mahiti

“गरे घ्या गरे ,गोड गोड गरे “ हे वाक्या बरेचदा आपल्या कानावर पडते. गरे आवडीने खाणारी लोक व फणसाची भाजी तर कोणी फणसाचे लोणचे खाणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. फणसाला बाहेरील काटेरी कवच असते तर आत गोड गरे असतात.

फणस बद्दल माहिती मराठी – Jackfruit Information in Marathi

Jackfruit Information in Marathi
Jackfruit Information in Marathi
हिंदी नाव : कटहल
इंग्रजी नाव : Jackfruit

वर्णन :

कोकण आणि गोवा येथे फणसाची पुष्कळ झाडे आहेत. हे झाड साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास फूट उंच व सरळ वाढते. त्याला अनेक फांद्या फुटतात. याची पाने हिरवी, जाड व लंबगोल असतात.

फणसाच्या खोडालाच फळे येतात. या फळांचा आकार साधारणपणे शहाळ्या (असोल्या नारळा) एवढा असतो. या फळांवरील काट्यांच्या आकारावरून जाणकार लोक तो फणस कोणत्या जातीचा आहे हे ओळखतात. काही फळे खूप मोठी म्हणजे वजनदार असतात. या फळांचा मोसम पौष महिन्यापासून ज्येष्ठ-आषाढापर्यंत असतो.

जाती :

फणसाच्या कापा आणि बरका अशा दोन जाती आहेत.

औषधी उपयोग : 

मोडशी या रोगावर फणसाच्या झाडाची साल उगाळून देतात. हगवण, सूज येणे, कंठरोगावर फणसाचा उपयोग होतो.

फणस खाण्याचे फायदे – Benefits of Jackfruit

फणसा मध्ये Anti-oxide चे प्रमाण आहे. तसेच त्या मध्ये विटामिन -ए, विटामिन -बी 6 आणि विटामिन सी हे महत्वाची घटक आहेत.

  • कॅन्सर पासून बचाव होतो.
  • हुद्यविकार चा त्रास दूर होण्यास मदत होते.
  • डोळ्याच्या समस्या दूर होतात.
  • पोट साफ होणे.
  • हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे.
  • टाईप -2 मधुमेह होण्याचे टळतो.
  • हाडे तसेच मासपेशी मजबूत राहतात.
  • रक्त दाब सुधा नियंत्रित राहतो.

इतर उपयोग :

फणस पिकल्यावर त्यांचा सुवास सर्वत्र पसरतो. फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात. या गांपासून पोळ्या, गऱ्यात तांदळाची कणी मिसळून सांदण करतात, ती ताजी खाण्यास चांगली लागतात. हिरव्या फणसाची भाजी करतात. कच्च्या फणसाचे गरे बारीक चिरून, खोबऱ्याच्या तेलात तळून त्याला तिखट, मीठ लावतात. हे खाण्यास कुरकुरीत व चविष्ट लागतात. काही ठिकाणी याच्या गऱ्यांपासून आईस्क्रीम बनवतात.

फणसाच्या आतील बीला आठळी म्हणतात. या आठळ्या भाजून तसेच मीठ घालून उकडून खातात किंवा आठळ्यांची भाजी करतात,

फणसाची टरफले (चारखंड) गाई-म्हशींना खायला देतात; त्यामुळे त्या भरपूर दूध देतात, याचे लाकूड टिकावू असते. घरे बांधण्यासाठी, फर्निचर, होड्या इ. साठी याचा उपयोग करतात.

याला पोषक असे उष्ण व दमट हवामान, तसेच तांबडी माती कोकण व गोवा येथे असल्याने तेथेच ही फळे मोठ्या प्रमाणावर येतात.

फणस याबद्दल काही प्रश्ने – Quiz about jackfruit

Q 1. फणस लागवड कोणकोणत्या देशात आढळते ?

उत्तर: भारत, बंगला देश, मॉरिशस, ब्राझील, युगांडा, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, श्रीलंका अश्या बऱ्याच देशात फणसाची लागवड प्रामुख्याने दिसून येते.

Q 2.फणसाच्या फुलांची विशेषता काय ?

उत्तर: फणसाची फुले प्रामुख्याने एकलिंगी असतात, नर -मादी असे विभागलेले असतात. त्यामुळे नर – मादी असे वेगवेगळी फुले वेगवेगळ्या फुलोऱ्यांत उगवतात. नर-फुलांचे फुलोरे नलिकाकृती असून ते पानांमागे दडलेले असतात तर मादी फुलांचे फुलोरे समोरच्या बाजूस मोठे व काटेरी असतात. 

Q 3.फणसाच्या झाडाच्या लाकडाची विशेषता काय ?

उत्तर: फणसाचे झाडाचे लाकूड हे जाकवूड नावाने प्रसिद्ध असून त्याची मोठ्या प्रमणावर फर्निचर साठी वापरले जाते कारण याला वाळवी हि कीड लागत नाही आणि बरेच वर्ष टिकवू राहते.

Q 4.फणसा पासून कोणती उत्पादणे म्हणून बनवली जातात ?

उत्तर: पाक, लोणचे, जाम व जेली इत्यादी खाद्यपदार्थ उत्पादनासाठी बनवली जातात.

Q 5.फणसाचे मुख्य जाती कोणकोणत्या ?

उत्तर: साधरणता भारतात कापा व बरका लागवड आठळून येते, तामिळनाडू मध्ये रुद्राक्षी तर श्रीलंका मधून आलेलेई सिंगापुरी नावाची जात भारतात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here