संत रामदास स्वामी रचित “मारुती स्तोत्र”

Maruti Stotra

महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक असलेले समर्थ रामदास स्वामी हे संत तुकाराम महाराज यांच्या समकालीन महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले एक महान संत होते. संत रामदास महाराज यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर असून त्यांचा जन्म चैत्र शुक्लपक्ष  नवमीला शके १५३० म्हणजेच २४ मार्च १६०८ साली जालना जिल्ह्यांतील जांब या गावी झाला. संत रामदासांचा जन्म झाला त्या दिवशी रामनवमी होती. शिवाय, रामदास हे लहानपणापासून रामभक्त होते.

त्यामुळे त्यांची प्रभू रामचंद्र आणि हनुमानजी यांच्या प्रती खूप श्रद्धा होती.  स्वामी रामदास यांनी ब्रह्मचर्य पत्कारून भारत भ्रमण केलं. यादरम्यान त्यांनी अनेक स्थळी राहून लोकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तसचं, हनुमान भक्त असलेले रामदास स्वामी दरोरोज हजारो सूर्य नमस्कार घालून परमेश्वराचे ध्यान करीत बसत असत. यामुळे त्यांना खूप लहान वयातच परमेश्वर प्राप्ती झाली होती.

मित्रांनो, या ठिकाणी संत रामदास स्वामी यांच्या बद्दल माहिती सांगण्याचे कारण हेच की, या लेखात लिखाण करण्यात येत असलेल्या मारुती स्तोत्राची रचना स्वत: रामदास स्वामी ने केली आहे.

संत रामदास स्वामी रचित “मारुती स्तोत्र” – Maruti Stotra (Hanuman)

Maruti Stotra
Maruti Stotra

भीमरूपी महारुद्रा,
वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता,
रामदूता प्रभंजना ।।१।।

महाबळी प्राणदाता,
सकळां उठवीं बळें।
सौख्यकारी शोकहर्ता ,
धूर्त वैष्णव गायका।।२।।

दिनानाथा हरीरूपा,
सुंदरा जगदंतरा।
पाताळदेवताहंता,
भव्य सिंदूरलेपना।।३।।

लोकनाथा जगन्नाथा,
प्राणनाथा पुरातना।
पुण्यवंता पुण्यशीला,
पावना परतोषका।।४।।

ध्वजांगे उचली बाहू,
आवेशें लोटिला पुढें।
काळाग्नी काळरुद्राग्नी,
देखतां कांपती भयें।।५।।

ब्रह्मांड माईला नेणों,
आवळें दंतपंगती।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा,
भृकुटी त्राहिटिल्या बळें।।६।।

पुच्छ तें मुरडिलें माथां,
किरीटी कुंडलें बरीं।
सुवर्णकटीकासोटी,
घंटा किंकिणी नागरा।।७।।

ठकारे पर्वताऐसा,
नेटका सडपातळू।
चपळांग पाहतां मोठें,
महाविद्युल्लतेपरी।।८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें,
झेपावे उत्तरेकडे।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू,
क्रोधे उत्पाटिला बळें।।९।।

आणिता मागुता नेला,
गेला आला मनोगती।
मनासी टाकिलें मागें,
गतीस तूळणा नसे।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडा,
येवढा होत जातसे।
तयासी तुळणा कोठें,
मेरुमंदार धाकुटें।।११।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे,
वज्रपुच्छ घालूं  शके।
तयासि तूळणा कैचीं,
ब्रह्मांडीं पाहतां नसे।।१२।।

आरक्त देखिलें डोळां,
गिळीलें सूर्यमंडळा।
वाढतां वाढतां वाढे,
भेदिलें शून्यमंडळा।।१३।।

धनधान्यपशुवृद्धी,
पुत्रपौत्र समग्रही।
पावती रूपविद्यादी,
स्तोत्र पाठें करूनियां।।१४।।

भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही।
नासती तूटती चिंता,
आनंदें भीमदर्शनें।।१५।।

हे धरा पंधराश्लोकी,
लाभली शोभली बरी।
दृढदेहो निसंदेहो,
संख्या चंद्रकळागुणें।।१६।।

रामदासी अग्रगण्यू,
कपिकुळासी मंडण ।
रामरूपी अंतरात्मा,
दर्शनें दोष नासती।।१७।।

।।इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं
मारुतिस्तोत्रं संपूर्णम्।।

।।श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु।।

मित्रांनो, संत रामदास स्वामि नी रचलेल्या या मारुती स्तोत्रांत त्यांनी शरीरसौष्टी वाढविणे तसचं, आपल्या अंगात नवीन उर्जा निर्माण करण्यावर जास्त भर दिला आहे. तसचं, बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून त्यांनी हनुमांजीची उपासना करण्याचा बहुमोलाचा सल्ला दिला आहे. या मारुती रायाची उपासना करण्याचा एक भाग म्हणजे स्तोत्र होय. या स्तोत्रामध्ये त्यांनी हनुमानजी यांच्या अंगी असलेल्या विविध शारीरिक पैलूंचे वर्णन केले आहे.

मित्रांनो, आपणास देखील संत रामदास महाराज यांच्या शब्दांत रचलेल्या मारुती स्तोत्राचा लाभ व्हावा व त्या स्तोत्राचे महत्व समजावे याकरिता आम्ही देखील या लेखात खास आपल्यासाठी मारुती स्तोत्राचे लिखाण केलं आहे. तरी, आपण या लेखाचे वाचन करून इतरांना देखील हा लेख पाठवा. आश्या आहे आपणास आमचा हा लेख आवडला असेल. धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here