Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती

Jalna Jilha Mahiti

मराठवाडा भागातील एक जिल्हा जालना! एक विशेष गोष्ट म्हणजे हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तरेला येतो.

जालना हा जिल्हा पुर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता पण मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्हयामधील एक तालुका झाला आणि पुढे 1 मे 1981 रोजी तो जिल्हा म्हणुन उदयाला आला.

जिल्हयाच्या पुर्वेला परभणी आणि बुलढाणा जिल्हा, पश्चिमेला औरंगाबाद, उत्तरेला जळगाव आणि दक्षिणेला बीड जिल्हा आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामामधे हिरीरीने सहभाग घेउन जालना वासियांनी महत्वाची भुमिका बजावली होती, जनार्दन मामा नागपुरकर यांनी मातृभुमीकरता आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती – Jalna District Information in Marathi

Jalna District Information in Marathi

जालना शहराचा इतिहास – Jalna Shahar History  

जालनाजिल्हयातील तालुके – Jalna District Taluka List

जालना जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.

  1. जालना
  2. अंबड
  3. भोकरदन
  4. बदनापूर
  5. घनसावंगी
  6. परतूर
  7. मंठा
  8. जाफ्राबाद

जालना जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Jalna Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या 19,58,483
  • क्षेत्रफळ 7,687.39 वर्ग कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण 71.52ः
  • जिल्हयाचे वार्षीक सरासरी पर्जन्यमान 650 ते 750 मि.मी.
  • हा जिल्हा हायब्रीड सीडस्साठी प्रसिध्द असुन स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दालमिल, बी.बियाणे, तसच मोसंबीसाठी देखील प्रसिध्द आहे.
  • हा जिल्हा संकरित बियाणे प्रक्रिया सारख्या कृषि आधारित उद्योगांसाठी प्रसिध्द आहे, महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्हयात आहेत.
  • जालन्याला स्टिल ऑफ  सिटी आणि बियाण्यांची राजधानी देखील संबोधण्यात येतं.
  • येथे हातमाग आणि यंत्रमाग व्दारे कापड बनविण्याचे महत्वाचे केंद्र आहे.
  • जालना जिल्हयातील जनतेने ‘मराठा मुक्ती संग्रामामधे’ महत्वाची भुमिका पार पाडली होती.
  • जिल्हयाचा उन्हाळा कडक असतो आणि हिवाळा देखील कडाक्याच्या थंडीचा असतो.
  • जिल्हयाचा 95ः भाग हा गोदावरी नदीच्या खो.यात येतो.
  • ज्वारी, गहु, इतर धान्य आणि कापुस ही येथील मुख्य पिकं आहेत.
  • या जिल्हयात केंद्र सरकारच्या वतीनं 500 हेक्टर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारला जात असुन मराठवाडयातील शेतमाल आणि औद्यागिक उत्पादनं थेट मुंबईतील  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
  • मुंबई, नागपुर समृध्दी महामार्ग या जिल्हयातुन जाणार आहे.

पर्यटन आणि धार्मिक स्थळं – Tourist Places in Jalna

जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर, मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर, राजुर चा गणपती, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान, जाम (तालुका घनसावंगी), प्रसिध्द दर्गा रऊनापराडा ता. अंबड (या ठिकाणी दरवर्षी मोठा ऊरूस भरतो), चक्रधर स्वामींचे मंदीर (वालसावंगी), येथीलच विठ्ठल रूक्मिणी मंदिर.

राजुरचा गणपती – Rajur Ganpati

  • मराठवाडया मधील अष्टविनायकांपैकी एक राजुरचा श्री.गणेश संपुर्ण जिल्हयात आणि आसपासच्या परिसरात प्रसिध्द गणपती आहे.
  • जालना शहरापासुन साधारण 25 कि.मी. अंतरावर हे मंदीर असुन दर चतुर्थी ला आणि गणेश उत्सवात 10 दिवस या ठिकाणी खुप गर्दी होते.
  • गणेश पुराणात राजुरचा गणपती संपुर्ण पिठ असल्याचं नमुद आहे त्यामुळे देखील या गणेशाची महिमा वाढली आहे,
  • इतर पिठं जसे मोरगांव, चिंचवड हे अर्ध पिठ असल्याचे पुराणात सांगितले आहे.
  • या मंदिराचा आता जिर्णोध्दार केला जात असुन हे मंदीर आणि आसपासचा परिसर कात टाकु लागला आहे.

मत्स्योदरी मंदीर अंबड – Mmatsyodari Devi Temple

  • जालना शहरापासुन साधारण 21 कि.मी. दक्षिणेला हे मंदीर असुन अतिशय प्राचीन असे हे मंदिर जालना वासियांचे श्रध्दास्थान आहे.
  • या मंदिराला मत्स्योदरी म्हणण्याचे कारण हे मंदिर ज्या उंच डोंगरावर आहे त्या डोंगराचा आकार मास्यासारखा असल्याने या ठिकाणाला मत्स्योदरी हे नाव पडले.
  • नवरात्रात या मंदिरात असंख्य भाविकांची दहा ही दिवस गर्दी पहायला मिळते.
  • भक्तनिवासाची सोय संस्थान कडुन करण्यात आली असुन अंबड या ठिकाणी बरेच हाॅटेल्स आणि लाॅजची सोय देखील आहे.
  • येथे येण्याकरता जालना शहरातुन बऱ्याच बसेस आणि खाजगी वाहनं देखील उपलब्ध आहेत.

गुरूगणेश तपोधाम – Guru Ganesh Tapodham Jalna

  • जैन धर्मीयांचे पावन तिर्थस्थळ गुरू गणेश तपोधाम जालना शहरातील जैन धर्मीयांचे एक महत्वाचे तिर्थस्थळ आहे.
  • गुरू गणेशांना कर्नाटक केसरी म्हणुन देखील ओळखले जाते.
  • “श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’’ या संस्थानाचे दैनंदिन व्यवहार आणि व्यवस्था चोखपणे पार पाडत आहे.  या ट्रस्ट च्या अंतर्गत शाळा, अंध विद्यालय, ग्रंथालय, गोशाळा, चालवल्या जातात.
  • मराठवाडा विभागातील सर्वात मोठी गोशाळा म्हणुन या ठिकाणच्या गोशाळेचा नावलौकीक आहे.
  • भक्तनिवासाची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे.

जांब समर्थ घनसावंगी – Jamb Samarth Jalna

  • समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान जांब ! जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यातील हे ठिकाण.
  • रामदास स्वामींचा जन्म चैत्र शुक्ल नवमी ला दुपारी बारा वाजता झाला ( याच दिवशी याच वेळी रामप्रभुंचा जन्म झाला असल्याचे सांगण्यात येते ).
  • त्यांच्या वडिलांचे नाव सुर्याजीपंत ठोसर कुलकर्णी आणि आई राणुबाई. रामदासस्वामींचे नाव ‘नारायण’.
  • येथील रामदास स्वामींच्या घरात श्री रामाचे मंदीर आहे या ठिकाणी दरवर्षी रामनवमी च्या उत्सवाला मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होते.
  • समर्थ रामदास स्वामींच्या स्मृतीप्रीत्यर्थ इथे त्यांचे एक मंदीर देखील बांधण्यात आले आहे.  नानासाहेब देव यांनी 1943 साली स्थापन केलेली ट्रस्ट या संस्थानचा कारभार पाहाते आहे,  या ट्रस्ट मधे जवळजवळ 55 मेंबर असुन 11 ट्रस्टी आहेत.  संस्थानजवळ स्वतःची 240 हेक्टर जमिन देखील आहे.
  • येथे भक्त निवासाची सोय असुन अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राणीबाई होळकर यांनी या ठिकाणी निवासाची सोय करून दिली.
  • या ठिकाणी येण्याकरता जालना आणि घनसावंगी या ठिकाणावरून बसेस सहज उपलब्ध आहेत.  खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते.

मम्मा देवी मंदिर – Mamma Devi Temple

  • जालना शहरातील मम्मा देवी मंदीर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे देवी दुर्गेचे एक रूप म्हणुन मम्मा देवी पुजनीय आहे.
  • देवीच्या नवरात्रा व्यतिरीक्त चैत्र महिन्यातील नवरात्रात देखील येथे मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होते.
  • मनपसंत वर मिळण्याकरता आणि पतिला दिर्घायुष्य मिळण्याकरता देखील महिला या ठिकाणी दर्शनाला येतात.
  • या व्यतिरीक्त काळया दगडांनी बनलेली काली मस्जीद देखील मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान आहे.  ही मस्जीद जवळपास 400 वर्षांपुर्वीची असल्याचे सांगितल्या जाते.
  • मोती बाग आणि मोती तलावाला देखील आपण भेट देउ शकता.
  • भाविक आनंदी स्वामींच्या मंदीरात देखील दर्शनाला जातात, सुमारे 250 वर्षांपुर्वी मराठा योध्दा महादजी शिंदे यांनी या मंदिराची निर्मीती केली होती.

या लेखाबद्दल आपले काही अभिप्राय असल्यास आमच्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आमच्या माझी मराठी ला एकदा अवश्य लॉगिन करा.

Previous Post

“डिजिटल इंडिया” विषयी काही घोषवाक्ये

Next Post

सौंदर्यवाढविण्यासाठीचे घरगुती सोपे उपाय

Editorial team

Editorial team

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
how to look younger naturally

सौंदर्यवाढविण्यासाठीचे घरगुती सोपे उपाय

Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम महाराजांचे चरित्र

Indian Flag Information in Marathi

एकतेचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती

Anti Alcohol Slogans Marathi

"मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये"

Soyarabai

छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी: सोयराबाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved