• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 16, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

चक्क गुगल च्या नोकरीला लाथ मारून पहा काय केले या युवकाने

He Quit Google to Sell Samosas

संपूर्ण देशात आज रोजगार एक मुद्दा बनलेला आहे, कारण प्रत्येकाला पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही उद्योग करावा लागतोच मग तो जन्मता गरीब व्यक्ती असो कि श्रीमंत. पण बरेचदा आपल्या कानावर काही अश्या गोष्टी येतात कि आपल्याला त्या गोष्टी जाणून घेण्यास आनंद होतो, आणि त्या गोष्टीविषयी एक उत्सुकता निर्माण होते.

आजच्या लेखात सुद्धा असेच काहीतरी आहे जे आपण जाणून आश्चर्यचकित होणार, लेखाच्या शीर्षकावरून आपल्याला कळले असेलच कि एका व्यक्तीने चक्क गुगल ची नोकरी सोडली. हो आपण बरोबरच वाचले, एका व्यक्तीने जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक कंपनी गुगल ची नोकरी सोडली. आता आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, कि कोण आहे हि व्यक्ती आणि त्याने गुगल ची नोकरी का सोडली? तर चला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहूया.

या व्यक्तीने चक्क गुगल ची नोकरी सोडली, आता पहा काय करतेय ती व्यक्ती – “Munaf Kapadia” He Quit Google to Sell Samosas

Munaf Kapadia
Munaf Kapadia

मुनाफ कपाडिया हि तीच व्यक्ती आहे ज्यांनी गुगल ची नोकरी सोडली, मुनाफ मुंबईचे रहिवासी असून त्यांनी MBA मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे, जेव्हा त्यांचे MBA चे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्यांनी २०११ ला विदेशाचा रस्ता पकडला यादरम्यान त्यांनी गुगल मध्ये इंटरव्यूव दिला आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती गुगल मध्ये सेल्स डिपार्टमेंट ला झाली. ते गुगल मध्ये अकाउंट स्ट्रैटजिस्ट पदावर कार्यरत होते.

गुगल ची नोकरी का सोडली? – Quit Google

गुगल मध्ये नोकरी मिळणे हे बऱ्याच युवकांचे स्वप्न असते. पण मुनाफ ने गुगल ची नोकरी सोडली. पण नोकरी वर असतानाच त्यांनी डिलिव्हरी किचन ची सुरुवात केली होती. त्यांच्या कंपनीचे नाव होते “द बोहरी किचन”.

या डिलिव्हरी किचन मध्ये त्यांनी आपल्या आईच्या हातच्या डिशेश सुरु केल्या, आईने बनविलेल्या डिशेश लोकांना एवढ्या आवडायला लागल्या कि त्यांना ऑर्डर वर ऑर्डर येवू लागल्या. त्यामधील एक डिश होती ती म्हणजे सामोसा.

एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना वाटायला लागले कि आता त्यांनी गुगल ची नोकरी सोडून त्यांचा पूर्ण वेळ त्यांच्या डिलिव्हरी किचन ला द्यावा. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी गुगल ची नोकरी सोडली. गुगल ची नोकरी सोडल्या त्यानंतर त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेयर केली ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते, “मी तो व्यक्ती आहे ज्याने सामोसे विकण्यासाठी गुगल ची नोकरी सोडली”

कठीण काळ आला तेव्हा…

२०१६ मध्ये जेव्हा मनोज ला कंपनी मध्ये लॉजिस्टिक, योग्य स्टाफ, तसेच पेमेंट या सर्व गोष्टींची अडचण होत होती, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या काळातच त्यांच्या जवळील सेविंग्स सुद्धा संपत होत्या,

आता त्यांनी या सर्व गोष्टी सोडून देऊन पुन्हा नोकरी कडे वळण्याचा विचार केला होता, पण या दरम्यान २०१७ मध्ये त्यांच्या कडे एक फोन कॉल येतो आणि तो फोन कॉल असतो फोर्ब्स मॅग्झीन मधून आणि त्यांचे म्हणणे असते कि आम्ही आपल्याला “अंडर ३० अचीवर्स” च्या लिस्ट मध्ये कवर पेज वर देणार आहोत. आमच्या मते आपण त्याचे दावेदार आहात.

या गोष्टीला ऐकून मनोज यांच्यात एक नवी उर्जा आली त्यांनतर त्यांनी ठरवले कि आता काहीही झाले तरीही माघार घ्यायची नाही, काही दिवस कठीण गेले पण पुन्हा त्यांनी नवीन जोशाने कामाला सुरुवात केली. आणि कंपनीला एका नवीन उंचीवर घेऊन गेले.

द बोहरी किचन – The Bohri Kitchen (TBK)

मुनाफ, बोहरा समाजाचे असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव द बोहरी किचन दिले. आणि बोहरा किचन हि आईच्या आणि मनोज त्यांच्या मेहनतीने उभी झालेली त्यांची कंपनी आहे, कारण आईच्या हाताचा स्वाद आणि मनोज ची मेहनत या दोन्ही गोष्टींनी द बोहरी किचन ला एक वेगळी ओळख मिळाली. आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओवर ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सोबतच मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. सेलिब्रेटिंपासून तर ५ स्टार हॉटेल्स पर्यंत त्यांच्या किचन चे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

मनोज यांना भविष्यात त्यांच्या कंपनीचा टर्न ओवर ३ करोड पेक्षा जास्त घेऊन जायचा आहे. एखाद्या ग्राहकाला जर त्यांच्या बोहरी किचन मध्ये जेवण करायचे असेल तर १५०० रुपये मोजावे लागतात, सोबतच त्या जेवणाची ऑर्डर दोन आठवडे अगोदरच द्यावी लागते.

जेवणासोबतच आणखी काही पदार्थ त्यांच्या येथे बनविल्या जातात जसे मटन समोसा, नर्गिस कबाब डब्बा गोश्त इत्यादी. आपल्याला हे पदार्थ आवडत असतील तर आपणही या जेवणाचा आनंद घेऊ शकता.

तर आजच्या लेखात आपण पाहिले गुगल ची नोकरीला सोडून या व्यक्तीने कश्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved