Home / Marathi Biography / निळु फुले यांचा जीवन परिचय

निळु फुले यांचा जीवन परिचय

Nilu Phule Biography in Marathi

मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत निळु फुले! दोन ही क्षेत्रामध्ये निळु फुलंेनी आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, या प्रकारच्या भुमिका त्यांनी केल्या असल्या तरी देखील ’खलनायक’ म्हणुन ते ठळकपणे आपल्या लक्षात राहातात. त्यांनी साकारलेला ’खलनायक ’ एवढा जिवंत वाटायचा की स्त्री वर्ग तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायचा.

Nilu Phule Biography in Marathi

निळु फुले यांचा जीवन परिचय – Nilu Phule Biography in Marathi

 • नाव: निळकंठ कृष्णाजी फुले
 • जन्म: 1930, पुणे
 • वडिल: कृष्णाजी फुले
 • आई: सोनाबाई कृष्णाजी फुले
 • पत्नीचे नाव: रजनी फुले
 •  कन्या: गार्गी फुले
 • कार्यक्षेत्र: अभिनय
 • गाजलेले नाटक: सखाराम बाईंडर
 • महत्वाचे चित्रपट: पिंजरा, सामना
 • पुरस्कार: संगीत नाटक अकादमी
 • मृत्यु: 13 जुलै 2009 पुणे

राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकामधुन निळु भाऊंचा अभिनयाला नवे कोंदण लाभले. ’कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटयातुन त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर ’पुढारी पाहिजे’ ’बिन बियांचे झाड’ या लोकनाटयांमधनं त्यांच्या अभिनयाला नवे कंगोरे लाभले.

सिंहासन, पिंजरा, एक गांव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

सखाराम बाईंडर या विजय तेंडुलकरांच्या नाटकातील त्यांचा अभिनय एवढया जबरदस्त ताकदीचा होता की त्याला तोड नाही.

पुढे बेबी, रण दोघांचे, पुढारी पाहिजे, राजकारण गेलं चुलीत, सुर्यास्त, प्रेमाची गोष्ट या निळु भाऊंच्या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

त्यांच्या सुर्यास्त या नाटकाकरीता त्यांना नाटयदर्पण अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

निळु फलेंना वाचनाची प्रचंड आवड होती. एकदा पुस्तक हातात घेतले की ते त्याच दिवशी संपवायचे असा त्यांचा हट्ट असायचा. वाचनाच्या आवडीमुळेच त्यांच्यातील कलावंतामधे अभिनयाची ही प्रगल्भता आणि सहजता आली असावी.

मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायक म्हणुन आपल्या डोळयासमोर पहिले आणि शेवटचे नाव येते ते निळु फुले यांचेच. त्यांच्या खलनायकी भुमिकेचा मराठी प्रेक्षकांवर एवढा प्रभाव का पडला ? हा एक प्रश्नच आहे.

त्यांच्या नंतर मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक कुणी आलं नाही असं नाही. कुलदीप पवार, दिपक शिर्के, राहुल सोलापुरकर, अशी कितीतरी नावे सांगता येतील देखील! परंतु अभिनयाची जी उंची निळु फुले यांना गाठता आली तिथवर कुणीही पोहोचु शकले नाही हे निर्वीवाद सत्य आपल्याला मान्य करावेच लागेल. मराठी सिनेसृष्टीतील खलनायकाची पोकळी ख.या अर्थाने निळु फुलेंनी भरून काढली.

त्यांच्यातला खलनायक जनमानसात एवढा खोलवर रूजला होता की सहज म्हणुन देखील ते एखाद्या गावात गेले तरी आया.बाया त्यांच्या नावाने बोटं मोडीत असत.

मिळालेले पुरस्कार -Nilu Phule Award

महाराष्ट्र शासनाने निळु फुलेंच्या अभिनयाकरीता त्यांना सलग 3 वर्ष पुरस्कार दिला. (1972, 1973, 1974)

संगीत नाटक अकादमीचा 1991 साली भारत सरकातर्फे दिला जाणारा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.

सुर्यास्त या नाटकातील अभिनयाकरता नाटयदर्पण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

सामाजिक चळवळीत देखील निळु भाऊंचा सक्रिय सहभाग होता. सत्यशोधक चळवळ, अंधश्रध्दा निर्मृलन, हमाल पंचायत, दलित.आदिवासी.ग्रामीण साहित्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.

आयुष्याच्या अखेरीस ते अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

निळु फुले यांचे काही मराठी चित्रपट – Nilu Phule Movies

पिंजरा, बिनकामाचा नवरा, सिंहासन, सामना, माझा पति करोडपती, गोष्ट छोटी डोंगराऐवढी, एक होता विदुषक, गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, जैत रे जैत, कदाचित, मोसंबी नारंगी, भालु, भुजंग, माल मसाला, हळद रूसली कुंकु हसलं, बायको असावी अशी, भिंगरी, कळत नकळत, पुत्रवती, चटक चांदणी, लक्ष्मीची पाउले,

निळु फुले यांचे काही हिंदी चित्रपट:

सारांश, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, बिजली, जरासी जिंदगी, नरम गरम, सौ दिन सांस के, कब्जा, मां बेटी, औरत तेरी यही कहानी, सुत्रधार, हिरासत, दो लडके दोनो कडके, मशाल, तमाचा, मेरी बिवी की शादी, मोहरे, इन्साफ की आवाज, भयानक, पुर्णसत्य, सर्वसाक्षी, कांच की दिवार, दिशा.

Check Also

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती…

Sant Muktabai Information in Marathi महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *