“जिल्हा परिषदच्या या शिक्षकाला मिळाले ७ कोटी रुपये !

Ranjitsinh Disale Global Teacher Award

आपल्या देशात कौशल्य आणि प्रतिभेची कमी नाहीच, जागतिक स्तरावर भारताचे नाव उंच तर आहेच पण देशातील काही प्रतिभावान व्यक्ती आपल्या मेहनती आणि कौशल्याच्या बळावर देशाची मान आणखी ताठ करत आहेत.

आता पहा ना, सोलापूरच्या परतेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंग डिसळे यांना “ग्लोबल टीचर” चा ७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. मागील महिन्यात संपूर्ण जगातील फक्त १० शिक्षकांची निवड करण्यात आली होती, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे रणजितसिंग डिसळे यांचे सुद्धा नाव होते.

ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी नामांकन आणि पुरस्कार.

जे सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत २००९ पासून शिक्षक आहेत, त्यांनी २०१६ ला QR कोडेड पुस्तकांची निर्मिती करून देशातीतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील विधार्थ्यांसाठी शिक्षणाचा एक नवीन मार्ग शोधला होता,

त्यांनी या नवीन गोष्टीला २०१६ मध्ये राज्य सरकार समोर मांडले, आणि राज्य सरकारने या QR कोडेड च्या कल्पनेला केंद्र सरकार समोर मांडली. हि कल्पना आणि उपक्रम शिक्षण क्षेत्रात खूप मोठा बदल घडविणारी होती तेव्हा केंद्र सरकारने या गोष्टीची दखल घेत (NCRT) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी QR कोडेड पुस्तकांना मान्यता देत २०१८ ला पुस्तकांमध्ये QR कोड प्रणाली सुरु केली.

त्यांच्या या प्रणालीमुळे देशातीलच नव्हे तर जगातील विधार्थ्यांना याचा फायदा होत आहे. युनेस्को च्या वर्की फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवार्ड” या पुरस्काराला शिक्षण क्षेत्रातील “नोबल पुरस्कार” म्हणून ओळखल्या जातं.

या पुरस्कारासाठी १४० देशांतील १२ हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी मागील महिन्यात या पुरस्कारासाठी १० शिक्षकांची निवड करण्यात आली होती. आणि ३ डिसेंबर २०२० ला या पुरस्काराचा विजेता घोषित करण्यात येणार होता. या पुरस्काराची एकूण किमंत होती ती ७ कोटी रुपये.

३ डिसेंबर २०२० ला लंडनच्या हिस्ट्री म्युझियम मध्ये या पुरस्काराचा समारंभ पार पडला, आणि या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्काराच्या विजेत्याचे नाव जाहीर केले. त्यांनी जेव्हा रणजितसिंग डिसळे यांचे नाव जाहीर केले. तेव्हा रणजितसिंग डिसळे यांचा आनंद गगनांत मावेनासा झाला होता,

यानंतर रणजितसिंग सरांनी असे जाहीर केले कि पुरस्काराची अर्धी रक्कम ते सहभागी ९ शिक्षकांमध्ये वाटणार. जेणेकरून बाकी ९ शिक्षक सुद्धा त्यांचे शिक्षण क्षेत्रात सुरु असलेले योगदान देत राहतील.

YouTube video

तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या या गुरुजींनी संपूर्ण जगात देशाची मान आणखी ताठ केली. अशा शिक्षकांवर संपूर्ण देशाला अभिमान आहे, सोबतच माझी मराठीच्या संपूर्ण टीम कडून रणजितसिंग सरांचे मनपूर्वक अभिनंदन.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here