आर.आर.पाटील यांची माहिती

RR Patil Mahiti

महाराष्ट्राचे लाडके आबा, हजरजवाबी आणि उत्कृष्ट वक्ते, स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्य, तळागाळातुन वर आलेले आर आर पाटील एक स्वच्छ राजकारणी…. रावसाहेब रामराव पाटील हे त्यांचे मुळ नाव असले तरी देखील आर.आर. पाटील आणि आर आर आबा या नावाने ते जनमानसात परिचीत आहेत.

आर.आर.पाटील यांची माहिती – RR Patil Biography in Marathi

RR Patil

आर.आर.पाटील यांच्या अल्पपरिचय – R .R . Patil Information in Marathi

नाव:  रावसाहेब रामराव पाटील
जन्म:  १६ ऑगस्ट १९५७
मुळगांव:  अंजनी तालुका तासगांव जिल्हा सांगली
आई:  भागिरथी पाटील
पत्नी:  सुमन
अपत्य: मुलगा रोहित आणि कन्या स्मिता
भाऊ:  सुरेश पाटील, राजाराम पाटील
मृत्यु:  १६ फेब्रुवारी २०१५

आर.आर.पाटील राजकीय करियर –  RR Patil Political Career

आर आर आबा १९९० पासुन तासगांव विधानसभेचे आमदार होते (१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४) सलग सहा वेळा ते तासगावचे आमदार म्हणुन निवडुन आले होते.आपल्या धाडसी आणि धडाकेबाज निर्णयांमुळे देखील ते स्मरणात राहातात.

डांन्सबार बंदी आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त भागाचे पालकत्व स्विकारणे यांसारखे धाडसी निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. डान्सबार बंदीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर चौफेर टिका देखील झाली परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम राहीले. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आबांनी बेजवाबदार वक्तव्य केले.

तेव्हां त्यांच्यावर खुप टिका झाली होती आणि त्यांना त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. जिल्हा परिषद सदस्यापासुन सुरू झालेला त्यांचा प्रवास तब्बल सहा वेळा आमदार त्यानंतर ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा होत गेला.

तरी देखील आर आर आबा अखेरपर्यंत आबाच राहिले. सामान्यांमधे त्यांची हीच ओळख अखेरपर्यंत राहीली. त्यांचा कधीही आबासाहेब झाला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकार मधे आर आर आबांकडे ग्रामविकास मंत्रीपद असतांना त्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान गावागावांमधे राबवुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली केली.

त्यांच्या या ग्रामस्वच्छता अभियानाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने देखील घेतली होती. गृहमंत्रीपद सांभाळतांना डान्सबार बंदीचा निर्णय घेतल्यामुळे अनेक संसार सावरले गेले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चौफेर टिका देखील झाली पण ते मागे हटले नाहीत.

आर.आर.पाटील यांच्या विषयी आणखी काही – About RR Patil

गाडगे महाराज स्वच्छता अभियानाप्रमाणेच गृहमंत्री असतांना त्यांनी राबविलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान देखील आगळंवेगळं होतं.

आबा ग्रामीण भागाशी जोडले गेले असल्याने आणि गरिब शेतकरी कुटूंबातुन आल्यामुळे राजकारणात राहुन देखील ते सहज सच्चे आणि साधेच राहिले.

मिळत गेलेल्या विविध पदांचा अभिमान त्यांना कधीही शिवला नाही. गडचिरोली जिल्हयातील पालकमंत्री पदाची जवाबदारी त्यांनी स्वतःहुन मागुन घेतली होती. या जिल्हयाचा कायापालट करण्याची त्यांची मनस्वी ईच्छा होती.

त्यांच्यावर सोपविलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी देखील त्यांनी उत्तम पार पाडली.

तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहुन त्यांच्याशी संवाद साधत पक्ष मोठा केला.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या विचारांचा आर आर आबांवर फार मोठा पगडा होता.

पक्षाचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जात असे.

सत्तेत राहुन देखील सत्ता अंगात न भिनलेल्या या नेत्याकडुन महाराष्ट्र राज्याला फार अपेक्षा होत्या परंतु कर्करोगाशी चाललेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आणि वयाच्या ५७ व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले.

आशा करतो आपल्याला या लेखाद्वारे आर आर पाटलांविषयी अधिक माहिती मिळाली असेल, आवडल्यास या लेखाला फेसबुक वर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here